साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर
भडगाव तालुक्यातील कजगाव येथील गावातील रस्ते पावसामुळे अत्यंत खराब झाल्याने वृद्ध व्यक्ती, नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून डास, मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साथीच्या रोगाची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. रस्त्यावर तसेच खड्डयात मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात यावी, याकडे ग्रामपंचायतने व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी कजगाव येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत मात्र गौणखनिज टाकण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे कजगावच्या सरपंचांनी सांगितले.