तृतीयपंथी चांद सरवर बनणार राज्यातली पहिली पिंक ऑटो रिक्षा चालक

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

भुसावळ येथील तृतीयपंथी चांद सरवर तडवी महाराष्ट्रातील पहिली रिक्षा चालक होणार असून मराठी प्रतिष्ठान मार्फत ऑटो रिक्षा प्रशिक्षण, लायसन्स,परमिट,बॅच विनामूल्य बनवून दिले जाणार असल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी दिली.

उच्चशिक्षित चांद सरवर तडवी हिने सन्मानाने पैसे कमवाव्ो या विचारधारेतून ऑटोरिक्षा चालक बनण्याचा निर्णय घेतला आहे. पिंक ऑटो रिक्षा चालक रंजना सपकाळे यांनी तिला प्रोत्साहित केले. चांद सरवर तडवीची लायसन्स प्रक्रिया आज पूर्ण झाली असून पुढच्या आठवड्यामध्ये कच्चे लायसन प्राप्त होणार आहे. त्यानंतर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तिला ट्रेनिंग दिले जाणार आहे. एखाद्या सहकारी बँकेतून िंकवा राष्ट्रीयकृत बँकेमधून चांद तडवी हिला कर्ज प्रकरण करू दिले जाईल. तसेच पक्के लायसन्स परमिट याकरता सर्व पाठपुरावा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे करणार आहेत.

चांद तडवी हिला डाऊन पेमेंट भरण्याकरता सुद्धा शहरातील दानशूर व्यक्तींना भेटून मदत करण्याचे आवाहन प्रतिष्ठान करणार आहे. पुरुष आणि स्त्रियांच्या बरोबरीत आम्ही सुद्धा ऑटो रिक्षा उत्तम प्रकारे चालऊ शकतो. त्यातून उदरनिर्वाह करून सन्मानाने जगू शकतो अशी भावना चांद सरवर तडवी हिने व्यक्त केली. कागदपत्र तयार करताना चांद सरवर, तृतीयपंथी राखी सूर्यवंशी, पिंक आटो चालक रंजना सपकाळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here