साईमत, जळगाव : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जळगाव मनपा क्षेत्रातील १४, १७, १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा शिवछत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेत सिद्धीविनायक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सिद्धीविनायक फाउंडेशनच्या संचालिका डॉ.अमृता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी, विशाल फिरके, सिद्धीविनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. पी. खोडपे, प्रशांत जगताप, अनिल माकडे, रणजीत पाटील, सरस्वती ढाके, दिगंबर महाजन आदी उपस्थित होते.
झपाट्याने वाढणाऱ्या यांत्रिकी जीवनात आट्यापाट्यासारखे देशी खेळ खेळून विद्यार्थ्यांनी आपली शारीरिक क्षमता सुदृढ करावी, असे क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी सांगितले. डॉ.अमृता सोनवणे यांनी मनोगतात खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मनपाचे क्रीडा अधिकारी दीनानाथ भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेसाठी पंच म्हणून अनिल माकडे, विशाल फिरके, सायली बडगुजर, अक्षय टेमकर, लीलाधर पाटील, महेश पाटील, देवेश पाटील, स्वप्निल महाजन, रोहित नवले, सचिन भंगाळे, दीपेश पाटील, भूपेंद्र भारंबे, चैताली चौधरी, हर्षदा तायडे, नेहा कंगटे, नकुल बोने यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल असा-
१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात सिद्धीविनायक विद्यालय (प्रथम), सेंट लॉरेन्स हायस्कूल (द्वितीय), श्रीराम माध्यमिक विद्यालय (तृतीय), १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात सिद्धीविनायक विद्यालय (प्रथम), श्रीराम माध्यमिक विद्यालय (द्वितीय), न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (तृतीय), १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात सिद्धीविनायक कनिष्ठ महाविद्यालय (प्रथम), नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालय (द्वितीय), स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (तृतीय), १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात सिद्धीविनायक विद्यालय (प्रथम), ला.ना.सार्वजनिक विद्यालय (द्वितीय), न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (तृतीय), १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात श्रीराम माध्यमिक विद्यालय (प्रथम), सिद्धीविनायक विद्यालय (द्वितीय), न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (तृतीय), १९ वर्षे मुलींच्या गटात सिद्धीविनायक कनिष्ठ महाविद्यालय (प्रथम), स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (द्वितीय), न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (तृतीय) असा स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.