साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह मंदिरात श्री गणेशात्सवानिमित्त गणेश महायागाचे आयोजन केले होते. दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान दोन सत्रात पार पडलेल्या महायागाचे विविध क्षेत्रातील ९ मानकरी सपत्नीक सहभागी झाले होते. गणेशोत्सवात यंंदा प्रथमच आयोजिलेल्या अतिशय चैतन्य व भक्तिमय वातावरणातील महायागावेळी हजारो भाविकांची साक्ष नेत्रदीपक ठरली. मंगळग्रह देवाचा नऊ हा शुभांक मानला जातो. या पार्श्वभूमीवर गणेशाची आकर्षित अन् तितकीच मनोहारी उत्सवमूर्तीसह विविध फुलमाळांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. महायागाच्या प्रारंभी गणपती पुण्याहवाचन मंडल, गौर्यादि मातृका मंडल, चतु:षष्ट योगिनी मंडल, वास्तु मंडल, क्षेत्रपाल मंडल, सर्वतोभद्र मंडल, सूर्यादि नवग्रह मंडल, चतुषष्टि भैरव देवता मंडल व ईशान्य रुद्र मंडल…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील गलवाडे रोड प्रताप मिल नगरमधील अनियमित पाणी पुरवठा विरोधात न.पा.च्या मुख्याधिकाऱ्यांच्या बंगल्यावर महिलांनी हंडा मोर्चा काढून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते योगिराज संदनाशिव, दीपक चौघुले, महेश कासार, भैया नाईक, गोपाल सर, संजू चौधरी, मुस्ताक शेख, चंद्रकांत देवकते, रवि सोनवणे, प्रभाकर साबळे, नासिर मुजावर, राहुल पोकळे, गंगू आजी, पद्मा देवकते, सिंधु मराठे, जया साबळे, संगीता चौगुले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. शहरातील झामी चौकातील पाण्याची टाकी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून जीर्ण झाल्याने पाडून पाइप लाइन वळविण्याचे काम सुरू होते. दरम्यान वळविलेली पाइप लाइन पुन्हा फुटल्याने दुरुस्ती कामी पाणी पुरवठा थांबविण्यात आला.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मध्य भारत संयुक्त खान्देश लाड सुवर्णकार समाजातर्फे गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवसाचे औचित्य साधून सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून दीपक मुरलीधर पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सतिष मुंडके होते. याप्रसंगी सर्वश्री दिलीप कुळथे, बाळू पांडव, शिवाजी कुळथे, अविनाश पांडव, हेमंत पवार, डॉ.राजेंद्र सोनार, संजय मुंडके, गिरीश सराफ, कुलदीप मुंडके, योगेश पांडव, कुणाल सोनार, हिमांशु सोनार, मितांशु सोनार, राहुल सोनार, तुषार सोनार, विलास सोनार, डॉ.विजय पवार, शिरीष डहाळे, कैलास नागोरे, निलेश नागोरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा योगिता डहाळे, शितल सोनार यांच्यासह समाज बांधव, भगिनी उपस्थित होते. गणरायाच्या महाआरतीनंतर सतिष मुंडके यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था केली होती.…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे उत्साहाला उधाण आणि तसेच बाप्पाला निरोपही तेवढ्याच जोशात दिला जातो. अशा जोशात रंगाचा भंग होऊ नये, म्हणून पोलीस, होमगार्ड, एसआरपी व इतर सर्वांचा खडा पहारा साऱ्या चोपडा शहरात असतो. स्वतःच्या गरजा, घरचा गणपती सारे बाजूला सारून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’साठी कर्तव्य बजावणारे हेच सारे बांधव सामान्य जनतेसाठी खरे विघ्नहर्ता असतात. त्यांच्या कर्तव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि शारदा मॅथ्स परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल ५०० पॅकेट शिरा आणि पोहे यांचा स्वादिष्ट नाश्ता व सोबत पाण्याच्या बॉटलचे वितरण करण्यात आले. शारदा मॅथ्स परिवाराच्या विद्यार्थ्यांनी सर्व पॅकिंग आणि वितरणाची जबाबदारी सांभाळली. त्यात विद्यार्थिनींचा…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी पूर्वीच्या काळी शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर असे होते. तिथे खरोखरच जीवनाचे शिक्षण तेव्हा मिळत होते. तेव्हा विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्यांच्यावर संस्कार केले जात होते. आज मात्र पालकांच्या अवास्तव अपेक्षा, मुलांवर सांगितला जाणारा मालकी हक्क यामुळे मुलांची भावनात्मक कोंडी होऊ लागली आहे. त्यातून मुलांच्या आत्महत्येची संख्या वाढू लागली आहे. मुलांना शाळेतही व्यक्त होता येत नाही. त्यांच्या आवडी, कल, कौशल्य लक्षात न घेता त्यांच्यावर करियरसाठी लहान वयातच दबाव वाढत आहे. एक प्रकारे समाजाला ‘करिअरचा कॅन्सर’ जडला आहे, असे परखड मत मांडताना ‘शिक्षकांनी संवादी बनावे’ असे धरणगाव येथील विक्रम ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा. रमेश महाजन यांनी व्यक्त केले. आनंदराज…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करावा, यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी उपोषणाच्या सातव्या दिवशी चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ‘डफ बजाओ’ आंदोलन करण्यात आले. उपोषणस्थळी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रचारक धर्मभूषण नानासाहेब बागुल यांनी नुकतीच भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला भगिनी, विद्यार्थ्यांनी बुधवारी, २७ सप्टेंबरपर्यंत साखळी उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाल्याने तत्कालीन राज्य सरकार विरोधात मराठा समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मराठा समाजातून आरक्षणाची…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाटणा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी नंबर १ येथे महिला डॉक्टर, दोन कंपाऊडर आहेत. त्यांनी गेल्या २२ सप्टेंबर २०२३ रोजी पाटणा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना पत्राद्वारे नवीन नळ कनेक्शन द्यावे आणि गावातील काही नागरिक तेथेच शौचास बसत असल्याची तक्रार केली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यातील दरवाजे, खिडक्यांची काही जण तोडफोड करतात. यासोबत मद्यपी मद्यप्राशन करुन बाटल्याही फोडतात. त्याचा त्रास दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी महिला कर्मचारी डॉक्टरांनी सरपंचांसह ग्रामसेवकांना लेखी पत्र दिले आहे. मात्र, लेखीपत्र देऊनही त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. यासंदर्भात सरपंच, ग्रामसेवकांनी लेखीपत्राची त्वरित दखल घेऊन नवीन नळ…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी कुंभार समाज बहुउद्देशिय विकास संस्थेतर्फे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ.मंगेश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यासाठी जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील दहावी, बारावीत ६० टक्क्यांच्यावर गुण मिळालेले विद्यार्थी तसेच पदवीधर, पदव्युत्तर, डिप्लोमा, आयटीआय उत्तीर्ण, डॉक्टर इंजिनियर्स, फार्मसी, एम.बी.ए., अन्य उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत शुक्रवारी, ६ ऑक्टोबरपर्यंत जमा करावी. तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी सरकारी, निमसरकारी सेवेतून सेवानिवृत्त समाजबांधव, शैक्षणिक सामाजिक क्षेत्र संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या समाजबंधूनीही आपली नावे आयोजकांकडे कळवावीत. गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत उत्तमराव काळे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस्, एस. एम. ए. सायन्स अँड के.के.सी. कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये कला मंडळाचे उद्घाटन आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस.खापर्डे, कला मंडळ प्रमुख डॉ. पंकज नन्नवरे, उत्सव समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी मनोगतात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास साधण्याचे कला मंडळ हे एक उत्कृष्ट साधन आहे. कला ही जीवन कसे जगावे, हे शिकविते, असे सांगितले. तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जामनेर तालुका अंतर्गत तालुक्यातील पहुर येथील जि.प.केंद्रीय मुलांच्या शाळेतील पटांगणावर मंगळवारी सकाळी आरंभ पालक मेळावा उत्साहात घेण्यात आला. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान कार्यक्रमाची घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक दमयंती इंगळे (बालप्रकल्प अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी, जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालप्रकल्प अधिकारी शिलाबाई पाटील, बाल प्रकल्प अधिकारी एस.एस.सोनार, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, ईश्वर देशमुख, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, शरद पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सुषमा चव्हाण, सोनाबाई हुडेकर, विद्या कुमावत, अर्चना पाटील, वंदना खैरनार, संगीता पडोळ,…