साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बिलाखेड येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्यावतीने गुरुवारी, २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान सीबीएसई प्रादेशिक ९ कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ५२पेक्षा अधिक सीबीएसई शाळांमधील ७५० विद्यार्थी सहभाग घेणार असल्याची माहिती पालक संघाचे पीटीपी कमेटीचे उपाध्यक्ष डॉ. सुनील राजपूत यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला शाळेच्या मॅनेजर सिस्टर मेरी कोईकरा, प्रिन्सीपल सिस्टर डॉ. बिंदू अँटनी, क्लार्क विजय चौधरी आदी उपस्थित होते. कबड्डी स्पर्धेला गुरुवारी, २६ ऑटोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होईल. याप्रसंगी खा.उन्मेष पाटील, सीबीएससीचे जळगाव शहर समन्वयक सुषमा कांची, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी भारतीय राज्यघटना आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. लोकशाही व्यवस्थेत कायद्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. सुजाण नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय वयातच कायद्याचा संस्कार रुजविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमुर्ती श्री.चामले यांनी केले. पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी हक्क आणि कर्तव्य, पोस्को, राष्ट्रीय प्रतिके, महापुरुष यांच्याप्रती आपण आदरभाव ठेवला पाहिजे, असे सहन्यायाधीश श्री.काळे, सह न्यायाधिश श्री.सूर्यवंशी यांनी आवाहन केले. प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांची…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस शिक्षणाचा जागर साजरा करत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक नवोपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने ‘शैक्षणिक नवरात्रोत्सव’ साजरा केला. विद्यालयात शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये विविध शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविले जातात. त्यात विद्यालयातील आठवीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी नवरात्रोत्सव निमित्त ‘नऊ दिवस नऊ नवोपक्रम’ राबविण्यात आले. त्यात घटस्थापनेपासून तर विजया दशमीपर्यंत उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विकास, मूल्यशिक्षण, स्व मेहनत, प्रश्न मंजुषा, निबंध स्पर्धा, शास्त्रज्ञ माहिती, गणितीय संकल्पना, क्रांतिकारक- समाज सुधारकांची माहिती, औषधी वनस्पती उपयोग, मैत्री संगणकाशी, पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. असे विविध उपक्रम राबवून नऊ दिवस शिक्षणाचा जागर…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी साडेतीन मुहूर्तापैकी दसरा सण एक मुहूर्त या पवित्र तिथीला माजी आमदार आर. ओ. पाटील यांचा जन्मकाळ सोहळा मंगळवारी, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात तात्या साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला गं. भा. कमल पाटील, सौ. वैशाली सूर्यवंशी, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, डॉ. सुरेश पाटील, डॉ.जे.सी राजपूत, डॉ.डी. आर. देशमुख, सुरेश पाटील, मेहताबसिंग नाईक, दिलीप भांडारकर आदी मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण पुष्पचक्र तथा फुलांच्या वर्षाव करून यथाविधी पूजन करण्यात आले. यावेळी निर्मल सीडस्चे संचालक डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, तात्या साहेबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांचे कार्य कर्तृत्त्वाचा सामाजिक बांधिलकीच्या तसेच हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्दता, कौटुंबिक,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील संत सावता माळी माळीवाडा येथे क्षत्रिय माळी समाजाचे अध्यक्ष तथा लोकमान्य विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक, उपक्रमशिल कलाशिक्षक मनोहर भगवान महाजन यांना सामाजिक मुखपत्र ‘माळी भूषण’ यांच्यातर्फे दिल्या जाणारा मानाचा ‘समाज भूषण’ पुरस्कार समारंभपूर्वक नुकताच प्रदान करण्यात आला. मनोहर महाजन हे क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळात (महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात) वीस वर्षांपासून कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच क्षत्रिय काच माळी समाज मंडळावर ते तीस वर्षांपासून पदाधिकारी आहे. ते अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत. संत सावता माळी सेवा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आहे. त्या माध्यमातून सतत समाजसेवेच्या कार्यात ते सक्रिय असतात. समाज संघटन, शिक्षण, पर्यावरण अशा त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जगाचा पोशिंदा शेतकरी आपल्या कुटुंबासह अहोरात्र काम करत आहे. शेतीला पाण्याची अत्यंत गरज असतांना आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीचे सावट असतांना, वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे पिके करपुन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वीज महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या भावना समजुन घेऊन सहकार्य करावे. अन्यथा जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. त्यामुळे जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विश्वजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहुरला महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले. शेतीसाठी ८ तास वीज हा महावितरणाचा निर्यण फक्त कागदावरच दिसुन येत आहे. शेतीसाठी नियोजित ८ तास वीज असतांना वीज महावितरणाचे कर्मचारी नेहमी फॉल्ट शोधण्याचे काम करतात. शेतकऱ्यांशी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुका काँग्रेस कमिटीची नुकतीच बैठक घेण्यात आली. सुरवातीला पंचायत समितीचे माजी सभापती स्व.अजय भाऊसाहेब पाटील यांना आदरांजली वाहिली. बैठकीत तालुकाध्यक्ष अनिल निकम यांनी तालुक्यात काँग्रेसच्या विविध विभागांची माहिती सांगुन विभागात अध्यक्ष पदासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांची माहिती विविध विभागांचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे पाठवून नियुक्ती संदर्भात शिफारस करण्यात येईल, असे सांगितले. तसेच चाळीसगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी काँग्रेसच्या विविध विभागांची माहिती व जबाबदारी समजावून सांगितली. बैठकीला आर.जी.पाटील, भगवान रणदिवे, रणजीत मगर, कल्याणराव देशमुख, गोरे आप्पा, मंगलसिंग कछवा, दादाभाऊ पाटील, डॉ.आधार महाजन, मनोज सोनवणे, अनिल आमले, निवृत्ती एरंडे, संतोष कऱ्हाळे, रवींद्र मुलमुले, रवींद्र निकुंभ, रवींद्र…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी राज्यातील ६५ हजार सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करा, जिल्हा परिषदेच्या १४ हजार ७८३ शाळा बंद करू पाहणारी समूह शाळा योजना रद्द करा, कंपन्यांचा सी.एस.आर. फंड शासनाकडे जमा करा, राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी भरीव तरतूद करावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील सर्व आस्थापनाच्या सर्व शिक्षक संघटनातर्फे तहसील कार्यालयासमोर सोमवारी, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ वाजे दरम्यान धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना संघटना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी शिक्षक नेते आर.एच.बाविस्कर, ग. स.चे संचालक मंगेश भोईटे, संभाजी पाटील, देवेंद्र पाटील आदींनी शासनाचे धोरण विद्यार्थी आणि पालकांसाठी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बी.पी. आर्ट्स, एस.एम. ए. सायन्स आणि के.के. सी. कॉमर्स महाविद्यालयात ४८ महाराष्ट्र बटालियन यांच्या आदेशानुसार ‘एनसीसी विभाग’, ए. बी. बॉईज हायस्कूलचा एनसीसी विभाग आणि ए. बी. गर्ल्स हायस्कूलचा एनसीसी विभाग या तीनही विभागाच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ च्या निमित्त रॅली तसेच व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमानिमित्त तृणधान्यांवर आधारित माहितीचे पोस्टर बनवून रॅलीत त्याचा उपयोग केला. रॅली महाविद्यालयापासून निघून आजूबाजूच्या परिसरात जनजागृती करून पुन्हा महाविद्यालयात विसर्जित करण्यात आली. रॅलीचे उद्घाटन ए. बी. बॉईज हायस्कूलचे चेअरमन आणि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक उद्योगपती योगेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तृणधान्याचे महत्त्व एनसीसी छात्र सैनिकांना सांगून…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग ए.टी.डी.प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक अर्पिता नरेंद्र पाटील, द्वितीय क्रमांक तडवी आमीर राजु, तृतीय क्रमांक शिंदे चैताली शांतीलाल, चतुर्थ क्रमांक साळुंखे शितल संभाजी, पाचवा क्रमांक सीमा वासुदेव पाटील यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा कुसुम मित्रा, प्राचार्य संदीप पाटील, सचिव नरेश मित्रा, प्रा.महेंद्र पाटील, प्रा. मनोज मालचे, ज्येष्ठ कलाशिक्षक प्रमोद पाटील, सुबोध कांतायान, विजय पाटील, राहुल सोनवणे, जितू काळे, चुडामण पाटील, चैतन्य नवगिरे, अशोक सोनार, निलेश शिंपी, राहुल पाटील, शैलेश कुलकर्णी, संदीप परदेशी, परशुराम पवार, चारुदत्त मोरे, पारोळा यांच्यासह…