साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुका काँग्रेस कमिटीची नुकतीच बैठक घेण्यात आली. सुरवातीला पंचायत समितीचे माजी सभापती स्व.अजय भाऊसाहेब पाटील यांना आदरांजली वाहिली. बैठकीत तालुकाध्यक्ष अनिल निकम यांनी तालुक्यात काँग्रेसच्या विविध विभागांची माहिती सांगुन विभागात अध्यक्ष पदासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांची माहिती विविध विभागांचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे पाठवून नियुक्ती संदर्भात शिफारस करण्यात येईल, असे सांगितले. तसेच चाळीसगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र जाधव यांनी काँग्रेसच्या विविध विभागांची माहिती व जबाबदारी समजावून सांगितली.
बैठकीला आर.जी.पाटील, भगवान रणदिवे, रणजीत मगर, कल्याणराव देशमुख, गोरे आप्पा, मंगलसिंग कछवा, दादाभाऊ पाटील, डॉ.आधार महाजन, मनोज सोनवणे, अनिल आमले, निवृत्ती एरंडे, संतोष कऱ्हाळे, रवींद्र मुलमुले, रवींद्र निकुंभ, रवींद्र एरंडे, शंकरराव पाटील, रोहिदास, असलम सय्यद, अकील शेख यांच्यासह तालुक्यातून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.