कस्तुरबा विद्यालयात शिक्षण नवोपक्रमाचा नवरात्रोत्सव

0
14

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस शिक्षणाचा जागर साजरा करत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक नवोपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने ‘शैक्षणिक नवरात्रोत्सव’ साजरा केला.
विद्यालयात शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये विविध शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबविले जातात. त्यात विद्यालयातील आठवीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी नवरात्रोत्सव निमित्त ‘नऊ दिवस नऊ नवोपक्रम’ राबविण्यात आले. त्यात घटस्थापनेपासून तर विजया दशमीपर्यंत उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विकास, मूल्यशिक्षण, स्व मेहनत, प्रश्न मंजुषा, निबंध स्पर्धा, शास्त्रज्ञ माहिती, गणितीय संकल्पना, क्रांतिकारक- समाज सुधारकांची माहिती, औषधी वनस्पती उपयोग, मैत्री संगणकाशी, पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. असे विविध उपक्रम राबवून नऊ दिवस शिक्षणाचा जागर करत आगळावेगळा नवरात्रोत्सव विद्यालयात साजरा केला.

त्यात १६ रोजी वर्ग सजावट, टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर, विविध शैक्षणिक पोस्टर लावत वर्ग सजावट करण्यात आली. १७ ला प्रश्न मंजुषा स्पर्धा, १८ ला भारताची संसद, चांद्रयान -३, जी २० शिखर परिषद विषयांवर निबंध स्पर्धा, १९ ला शास्त्रज्ञांची माहिती गोळा करून विद्यार्थ्यांना सांगितली, २० ला गणितीय संकल्पना यात वर्ग घन पाठांतर, सात्मिकरण घेण्यात आले. २१ ला एक क्रांतिकारक, समाजसुधारक यांच्या माहितीवरून मनोगत व्यक्त केले. २२ ला परिसरातील औषधी वनस्पतींचे उपयोग माहिती घेत पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. २३ रोजी मैत्री संगणकाशी याद्वारे विद्यार्थ्यांना संगणकबाबत मूलभूत माहिती देऊन संगणकाची ओळख हा उपक्रम घेण्यात आला. २५ ला बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

हा शिक्षणाचा नवोपक्रमाचा नवरात्रोत्सव विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका रेश्मा दिवसे यांनी मुख्याध्यापक एस.एल.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये नऊ दिवस नवं चैतन्याचे वातावरण होते. उपक्रमाचे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ.स्मिता पाटील, समन्वयक आर.डी.साठे आदींनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here