Author: Sharad Bhalerao

साईमत, कासोदा, ता. एरंडोल : वार्ताहर एरंडोल तालुक्यातील उत्राण अ.ह. येथे मुस्लिम बांधवांच्या शादी घराची (जानूसा) नुकतीच पायाभरणी करण्यात आली. यासाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर धोंडू आमले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुस्लिम बांधवांच्या लग्नात वराडला उतरण्यासाठी गावात कोणतीही अशी जागा नव्हती. ही समस्या लक्षात घेऊन ज्ञानेश्‍वर आमले यांनी मुसलमानांच्या लग्नाच्या वराडांसाठी व्यवस्था केली. याबद्दल आमले यांचे मुस्लिम बांधवांनी आभार मानून गावात कौतुक होत आहे. उत्राण अ.ह. गावात सर्व पुढाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शादी घर (जानूसा) करण्याचे काम आम्ही करून देऊ, असे आश्‍वासन मुसलमान बांधवांना दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कोणीही पूर्ण न केल्याने ते हवेतच विरले होते. त्यामुळे ज्ञानेश्‍वर आमले…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही धरणगाव तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर तिच्या वडिलांनी…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील फुलगावजवळील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी, ३१ ऑक्टोबर रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भुसावळ शहरातील आनंद नगरात उमाकांत मुरलीधर परदेशी (वय ३९) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उमाकांत परदेशी हा आपला मित्र भूषण राजेंद्र बिऱ्हाडे यांच्या सोबत दुचाकीने भुसावळ तालुक्यातील फुलगावजवळील राष्ट्रीय महामार्गाने भुसावळला येणासाठी दुचाकीने येत होते. त्यावेळी महामार्गावरील पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारी कार (क्र.एमएच १४ बीसी ४९६०) ने…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु. येथील ग्रामस्थांच्यावतीने बसथांब्याजवळ खुल्या व्यासपीठावर बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. याप्रसंगी ‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष’ ‘एक मराठा-लाख मराठा’च्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी तालुक्यातील अनेक मराठा संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. खडकीचे पोलीस पाटील तथा समाजसेवक विनायक मांडोळे यांनी मराठा समाजाची सद्यस्थिती व आरक्षणाची गरज यावर बोलत असताना सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, सगळे मराठे हे कुणबीच आहेत. म्हणून मराठा समाजाचा कुणबी म्हणून ओबीसीत समावेश करावा,…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात चोपडा तालुका शारीरिक शिक्षण आणि क्रीडाशिक्षक महासंघाची सभा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश जाधव होते. याप्रसंगी चोपडा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा ग.स.सोसायटीचे संचालक मंगेश भोईटे, चोपडा तालुका क्रीडा संयोजक राजेंद्र आल्हाट, चोपडा तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष अशोक साळुंखे, क्रीडाशिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा संघटक प्रा.ईकबाल मिर्झा, क्रीडाशिक्षक महासंघाचे सहसचिव देविदास महाजन, अनिल माकडे, यावल तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक के.यु.पाटील, धरणगाव तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष के.एस.पाटील, सचिव सचिन सूर्यवंशी, एरंडोल तालुका क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव सचिन महाजन, जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रात रस्त्यावर अपघाताची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित मृत्युंजय दूत नागरिकांनी करावयाची मदत याबाबतीत प्रथमोपचार प्रशिक्षणाद्वारे धडे देण्यात आले. यावेळी जळगाव इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या उज्ज्वला शर्मा यांनी जखमी व्यक्तींचा जीव वाचविण्यासाठी कसे प्रयत्न करावे, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक विभागाचे डीवायएसपी प्रदीप मैराळे, धुळे विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, एपीआय राजेंद्र सोनवणे यांनी अपघात घडल्यानंतर पोलीस रुग्णवाहिका व दवाखान्यात दाखल करण्याबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करून अपघातस्थळी मदत कार्य करण्यास तत्पर असणाऱ्या मृत्युंजय दूत यांना ओळखपत्र वाटप केले.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव स्विमिंग असोसिएशनची वार्षिक स्नेहमिलन सभा आणि कोजागिरी कार्यक्रम नुकताच उत्साहात घेण्यात आला. सभेत स्विमिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र मांडे, उपाध्यक्षपदी दिगंबर (काळूशेठ) दायमा तर सचिवपदी ॲड.रणजीत पाटील यांची फेरनियुक्ती केली आहे. यावेळी स्विमिंग असोसिएशनच्या कार्याचा वार्षिक आढावा रंजीत पाटील यांनी घेतला. तसेच योगा व व्यायामाचे महत्त्व योगशिक्षक नारायण मांडवडे यांनी सांगितले. चाळीसगावकर जलतरण व्यायाम प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने पोहण्याचा व्यायाम करावा, आपले आरोग्य उत्तम ठेवण्याबरोबरच आपला परिवार आणि समाज निरोगी कसा राहील, याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे जलतरण तलाव नियमित सुरु रहावा, यासाठी प्रशासन व व्यायामप्रेमी यांचे एकत्रित योगदान असल्यास चाळीसगावचा जलतरण तलाव उत्तम स्थितीत राहून चाळीसगावच्या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खडकी बु.ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या दुवामहल यासिनीनगर सबस्टेशन भागातील वार्ड क्रमांक ३ मध्ये सांडपाणी व घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे मशिद भागातील गल्लीत डेंग्यू, मलेरिया, टाईफाईड, हिवतापासारख्या दहा ते बारा रुग्णांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दुवामहल परिसरात डेंग्यूचा कहर सुरु झाला आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरात त्वरित स्वच्छता करुन फवारणी करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे. दुवामहल परिसरमधील गल्लीत मागच्या बाजूला राहत असलेले नासिरभाई यांच्या घराच्या आजूबाजूला सांडपाणी व परिसरात घाण वाढल्याने याभागात डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामपंचायत याभागात कधी स्वच्छता करत…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्रातील मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी खडकी बायपास येथे सकाळी ९ ते ११ सलग दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सलग १७ दिवस आमरण उपोषण केले होते. त्या आमरण उपोषणाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडवताना मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शब्द दिला होता. यावेळेस शासनाला एक महिना वेळ द्या आपल्या सर्व मागण्या पूर्ण करू, असे आश्‍वासन…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील नाचणखेडा रस्त्यावरील शिवाजी ओंकार धनगर यांच्या शेतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत महिला शेती दिनानिमित्त नुकताच कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी एस.एस.वळवी, कार्यालयीन कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाला पहुरच्या मंडळ कृषी अधिकारी कु. निता घाडगे, कृषी पर्यवेक्षक किशोर पाटील, कृषी सहाय्यक के.पी. महाजन, पी.पी.पवार, एस.ए. गायकवाड, पंचायत समितीच्या माजी सभापती नीता कमलाकर पाटील, पाळधीच्या पोलीस पाटील वैशाली प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोज नेवे, बचत गटातील महिला, सी.आर.पी.महिला, इतर महिला भगिनी यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते. महिला शेती दिनानिमित्त शेताचे मालक योगेश शिवाजी धनगर यांचा सपत्नीक शाल,…

Read More