मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या

0
22

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी खडकी बायपास येथे सकाळी ९ ते ११ सलग दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सलग १७ दिवस आमरण उपोषण केले होते. त्या आमरण उपोषणाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडवताना मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शब्द दिला होता. यावेळेस शासनाला एक महिना वेळ द्या आपल्या सर्व मागण्या पूर्ण करू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ४० दिवस होऊनही राज्याचे मुख्यमंत्री व राज्य सरकारने जरांगे यांनी केलेल्या मागणीबाबत कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटी येथे मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा म्हणून चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ सलग २ तास रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी गणेश पवार म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाने भाजपला निवडून आणून सत्तेत बसवा. मराठा समाजाला ६ महिन्यात आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांनी आरक्षण दिलेले मराठा आरक्षण हे फसवे आरक्षण असल्यामुळे सुप्रीम कोर्टात टिकले नाही. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे तर केंद्रात भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण का देत नाही. हा प्रश्‍न महाराष्ट्रातील मराठा समाज आंदोलनातून शासनाला विचारत आहे. काही ठिकाणी आरक्षणाचे आंदोलन संवैधानिक पध्दतीने सुरू असताना आंदोलन दडपण्याचे काम गृहमंत्री करत आहे. मराठा समाजावर गृहमंत्री अन्याय करत असल्याचेही ते म्हणाले.

यांनीही व्यक्त केले मनोगत

प्रमोद पाटील म्हणाले की, सरकार केवळ बैठका घेत आहे. ते आरक्षणावर तोडगा काढत नसल्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक होत आहे. आंदोलनाची झळ शासनाला बसल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. देवीदास जाधव म्हणाले की, मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना शासन त्याची दखल घेत नाही. हा मराठा समाजावर एक प्रकारचा अन्यायच आहे. तमाल देशमुख म्हणाले की, जारंगे पाटील यांना उपोषण स्थळापासून उचलून नेऊन आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न शासनाने केला तर त्याचे दुरगामी परिणाम होतील. प्रा. चंद्रकांत ठाकरे म्हणाले की, मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केली तरी सरकारच्या कानटळ्या बसल्या जर आक्रमक आंदोलन केले तर सरकारचे काय होईल, त्याचा विचार सरकारने करावा, असे सांगितले.

यांचा होता आंदोलनात सहभाग

रास्ता रोको आंदोलनात गणेश पवार, अरुण पाटील, तमाल देशमुख, प्रमोद पाटील, विनायक मांडोळे, सुजित गायकवाड, नाना तांबे, देवीदास जाधव, नाना शिंदे, किशोर देशमुख, गोरख साळुंखे, ॲड.राहुल जाधव, माणिक शेलार, खुशाल बिडे, ज्ञानेश्‍वर कोल्हे, छोटु अहिरे, मुकुंद पवार, बापु डोखे, कुणाल पाटील, विजय पाटील, अजय पाटील, प्रशांत गायकवाड, राजु शिंदे, सुनील पाटील, राकेश राखुंडे, भागवत पाटील, योगेश पाटील, संजय कापसे, सतीश पवार, दादा पाटील, नंदकिशोर पाटील, निवृत्ती कवडे, प्रदीप मराठे, सचिन पाटील, सचिन गायकवाड, सुधीर पाटील, निखिल देशमुख, मंगेश वाबळे, प्रमोद चव्हाण, महेश देशमुख, किरण देशमुख, विजय देशमुख, योगेश पवार, सतीश पवार, अनिल पवार, शरद पवार, संतोष फडतरे, खुशाल सूर्यवंशी, संतोष देशमुख, धनंजय मराठे, रावसाहेब पाटील, जगदीश पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, शेखर पाटील, हनुमान पाटील, प्रतिभा पवार, सोनाली बोराडे, अनिता शिंदे, आशाबाई पाटील, सुनिता भोसले, वर्षा पाटील यांच्यासह खडकी, तांबोळे, बिलाखेड, आडगाव, तरवाडे, खरजई गावासह मराठा बांधव, भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here