साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव नगरीचे माजी आमदार तथा महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री सुरेशदादा जैन यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन माजी महापौर जयश्री महाजन तसेच माजी विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांच्यावतीने दादांच्या निवासस्थानी केले होते. आपल्या आजपर्यंतच्या राजकारणातील यशाचे संपूर्ण श्रेय म्हणजेच दादांचा आशीर्वाद असे मानून महाजन दाम्पत्याकडून दादांना एक किलो चांदीची गदा स्नेह भेट म्हणून देण्यात आली. सलग ९ वेळा जळगाव शहराचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे सुरेशदादा यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. जळगाव शहराच्या विकासात त्यांचा सर्वात मोठा वाटा राहिलेला आहे. त्यांच्या स्वप्नातील शहर घडविण्याचे व्रत घेतलेल्या जळगाव नगरीच्या माजी महापौर जयश्री महाजन यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त दादांना ८१ किलो…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ७२ वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यात होत आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्याकडून आलेल्या सुचनांवर काम करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हे संमेलन यशस्वी होईलच, असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला. या साहित्य संमेलनात वाचक, साहित्यिक, प्रकाशक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव नगरीचे ग्रामदैवत तथा वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथयात्रेचे कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून जळगाव नगरी श्रीराम रथोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या दिवशी पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी भारतात संविधान विरोधी शक्ति अधिक सक्रिय आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार मनुस्मृतीने चालतो का संविधानाने? या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयात केसही सुरु आहे. तेव्हा सर्व संविधानप्रेमी जनतेने संविधान गौरवार्थ अधिक संघटित व सक्रिय व्हावे, असे आवाहन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव समिती जळगावतर्फे आयोजित संविधान गौरव रॅलीनिमित्त तांबापुरा येथील बौद्ध वस्तीत प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते. ते पुढे म्हणाले की, जळगाव शहरात संविधान गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. विविध सामाजिक, राजकीय संघटना त्यात सहभागी होत आहेत. त्यात आपणही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे सांगितले.…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी आजचे वहन आहे रामभक्त मारुतीरायाचे. जय वीर हनुमान बळ शक्ती सामर्थ्य व बुद्धिमत्ता यांचा सुरेख समन्वय असलेले बजरंग बली. गावागावात पारा पारावर विराजमान होऊन सर्वांनी शक्तिशाली बना असा संदेश देणारे मारुतीराय. रामभक्त हनुमान सदैव रामसेवेत सादर असणारा रामदूत सेवक मारुतीराय. भक्तीचा शक्तीचा युक्तीचा बुद्धीचा सेवेचा आदर्श पाठ घालून देणारा, सगळ्या भक्तांचे भूषण असणारा मारुती हनुमंत. म्हणूनच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, शरणं शरणं हनुमंता । तुज आलो रामदूता ॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ शूर आणि धीर । स्वामी कार्यापै सादर । तुका म्हणे रुद्रा । अंजनीच्या कुमरा ॥ पवन पुत्र वीर हनुमान…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने २०२१-२२ मध्ये राबविलेल्या महाआवास अभियानात जळगाव जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत विविध संवर्गात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात जळगाव जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांना महा आवास अभियान विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, गुरूवारी, २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील निवृत्ती नगरमधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदिर रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी खुले करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरपासून कार्तिका पौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदिर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर आहे. ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठ्या प्रमाणात येत असतात. अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था केली आहे. येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या कार्तिकी पौर्णिमा उत्सवाची तयारीला सुरूवात करण्यात आली. कार्तिक नक्षत्र ११वा.१० सकाळी सुरू होत असून दु.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनानुसार जळगाव जिल्हा काँग्रेसचे व्ही. जे. एन. टी. सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष देशमुख जाधव यांची तेलंगणा राज्यात निरीक्षक म्हणून विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती ए. आय. सी. दिल्ली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून करण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण, तेलंगणा राज्याची होत असलेली सार्वत्रिक निवडणूक २०२३ साठी कसे विकासासाठी फायदेशीर ठरणार आहेत. यासाठी सुभाष देशमुख जाधव यांची तेथील विधानसभा क्षेत्रासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सुभाष जाधव यांना गेल्या वीस वर्षांचा राजकारणाचा गाढा अभ्यास असल्याने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासह राजकारणात आपली उत्तम छाप…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धरणातील पाणी चोरी करणाऱ्यांवर पाटबंधारे विभाग, वीज महावितरण कंपनी तसेच ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. धडक कारवाईचे लोहारा परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. दैनिक ‘साईमत’ने १८ नोव्हेंबर रोजी ‘लोहारा धरणातील अवैध उपसा त्वरित थांबवावा’ अशा ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची गंभीर दखल घेत लघु पाटबंधारे, जलसंपदा विभाग अंतर्गत असलेल्या लोहारा धरणातील अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल महाजन, वीज महावितरण कंपनीचेे सहाय्यक अभियंता श्री.पाटील तसेच लोहारा ग्रामपंचायतचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोई यांच्या माध्यमातून धरणातील पाणी चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील साईबाबा मंदिरात स.नं.झवर विद्यालयातील २००५-०६ मधील दहावीच्या (ब) वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. तब्बल १७ वर्षानंतर माजी विद्यार्थी मेळाव्यात एकत्र आल्याने शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येवून एकमेकांशी संपर्क करून मेळाव्यात आलेल्या मित्र-मैत्रिणींनी उपस्थिती दिली. याप्रसंगी एकत्र आलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी साईबाबांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी प्रत्येकाने आपला परिचय करून दिला. त्यानंतर मित्रांवर आधारीत हिंदी, मराठी चित्रपटातील गाणे गायली. तसेच प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची आदी शालेय स्पर्धेसारखे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सर्व मित्र एकत्र आल्याने स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ग्रुपमधील लोकनियुक्त सरपंचपदी निवडून…