साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनानुसार जळगाव जिल्हा काँग्रेसचे व्ही. जे. एन. टी. सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष देशमुख जाधव यांची तेलंगणा राज्यात निरीक्षक म्हणून विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती ए. आय. सी. दिल्ली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून करण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण, तेलंगणा राज्याची होत असलेली सार्वत्रिक निवडणूक २०२३ साठी कसे विकासासाठी फायदेशीर ठरणार आहेत. यासाठी सुभाष देशमुख जाधव यांची तेथील विधानसभा क्षेत्रासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
सुभाष जाधव यांना गेल्या वीस वर्षांचा राजकारणाचा गाढा अभ्यास असल्याने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासह राजकारणात आपली उत्तम छाप पाडली आहे. पक्षाची ध्येयधोरण व प्रचार याबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, याकरिता काँग्रेसने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, आ.शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, प्रतिभा शिंदे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नानाभाऊ कोळी, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, डॉ. अनिल शिंदे, संदीप घोरपडे, गोकुळ बोरसे, प्रा. सुभाष पाटील, डी. डी. पाटील, मनोज पाटील आदींनी कौतुक केले आहे.