साईमत, फैजपूर : प्रतिनिधी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी व प्रामाणिक अभ्यासाद्वारे स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होता येत असल्याचे प्रतिपादन यूपीएससीच्या कॅटेगिरीमध्ये प्रथम उत्तीर्ण झालेल्या शुभम मनोहर सरदार यांनी व्यक्त केले. जळगाव येथील सूर्य जीवनी अभ्यासिकाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कमलेश तायडे होते. यावेळी ॲड. राजेश झाल्टे, सुखदेव तायडे, सामाजिक नेते मुकुंदराव सपकाळे, संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष एस.के.केदारे, सचिव भीमराव अडकमोल आदी उपस्थित होते. शुभम सरदार म्हणाले की, स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता, अद्ययावत माहिती यासह सर्वांगिण विषयाचे अवलोकन यामुळे स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते. यावेळी शुभम सरदार यांच्या हस्ते सूर्यजिवनी अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चोपडा : प्रतिनिधी सध्याचे केंद्र सरकार कामगार विरोधी ४ कामगार संहिता लादत आहेत. त्याला कामगारांचा विरोध आहे. या संहिता अदानी आणि अंबानी या दोन प्रमुख उद्योगपतींना समोर ठेवून तयार केल्या आहेत. कामगार संहिता नोकरीची शाश्वती पेन्शन आदी मूलभूत विचारांना थारा नाही. कामगार संघटना आणि संघर्षाला मर्यादा आणणारे आहेत. भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. शेतीमालाला रास्त भाव दहा वर्षात दिले नाहीत. ते पुढेही मिळतील, अशी शक्यताही नाही. त्यामुळे येत्या २०२४ मधील निवडणुकांमध्ये भाजपा सरकारला सत्ता मिळण्यापासून दूर ठेवा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.प्रा.राजू देसले यांनी केले. चोपडा येथे आयटकच्यावतीने घेतलेल्या प्रचंड कामगार सभेत…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी येथील विठ्ठल मंदिर, गावातील श्रीराम मंदिर, शिवकालीन विठ्ठल मंदिर, त्रिवेणी मंदिर, सतपंथ मंदिर, आठवडे बाजार श्रीराम मंदिर येथे कार्तिक स्नानानिमित्त महिनाभरापासून दररोज सकाळी काकड आरती उत्सव साजरा झाला. उत्सवाचा सांगता समारोप बुधवारी, २९ नोव्हेंबर रोजी झाला. सर्व मंदिर भजनी मंडळांनी फैजपूर गावातून दिंडी नगर प्रदक्षिणा काढली होती. यामध्ये भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ सहभागी होऊन युवकांनी मोठा सहभाग घेतला. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने अवघे फैजपूर शहर दुमदुमले. दिंडीत श्रीराम मंदिराचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, सचिव काशिनाथ वारके विश्वस्त, किशोर कोल्हे, दिलीप पाटील, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र भंगाळे, नरेंद्र महाजन आदी सहभागी झाले होते. यावेळी काकडा…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरातील विकास कॉलनीत किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये सहा जण जखमी झाले असुन दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात परस्परांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली होती. घटनेची पोलीस ठाण्यात उशिरा फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर असे की, शहरातील विकास कॉलनीत एकाच समाजातील दोन गटात जुन्या किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी शेख नजर शेख मज्जिद (रा. विकास कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दानिश अली, मुजाहिद अली, जाकीब अली कमर अली, जुबेर अली, मजहर रहीम शेख, मझहर तय्यब अली, ऐसान डॉक्टर, इरफान अली, नजीर अली, फिरोज शेख जाकीर अली, जुनेद (सर्व राहणार…
साईमत, यावल : प्रतिनिधी बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्री गिरीष महाजन यांनी राज्याचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या आजारपणाबद्दल केलेल्या बेताल असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ बोदवड बाजार समितीसमोर नुकतेच आंदोलन करण्यात आले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते तथा आ.एकनाथराव खडसे यांच्या आजाराबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे तात्काळ वेळेत हवाई रुग्णवाहिका पाठविल्याने त्यांचे जाहीर आभार मानतात. तसेच आ.खडसे यांची उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय बरेच राजकीय सहकारी मित्र, नेते यांनी आजारपणाची चौकशी केली. सर्वांचे आभार, सदिच्छा वृत्तवाहिन्यांवरील बोलण्यात आ.खडसे हे जाहीरपणे राजकारणाच्या पलिकडे जाऊन बोलत आहेत. हे सर्व महाराष्ट्राने पाहिले. मात्र, जिल्ह्यातील मंत्री गिरीष महाजन आ.एकनाथराव खडसे यांच्या आजारपणाची टिंगल, टवाळी…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी नगर परिषद तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शहरातील विकास कामांचा प्रपोगंडा केला जात असला तरी शहराच्या विकास कामांबाबत दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती समोर येत आहे. यामध्ये सिद्धेश्वर नगर भागात ६५ लाख रुपये खर्च करून निर्माण केलेल्या स्मशानभुमीत रात्री मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाद्वारे मयतावर अंतीम संस्काराची वेळ नातेवाईक व मित्र मंडळीवर आली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील विकास कामांच्या बाबतीत सद्यस्थितीत येणाऱ्या निवडणुकांचे लक्ष्य समोर ठेवून मोठ्या प्रमाणात प्रपोगंडा केला जात असल्याचे समोर येत आहे. यामध्ये शहराच्या प्रत्येक प्रभागातील माजी लोकप्रतिनिधी (नगरसेवक) माझ्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा पाढाच प्रभागात वाचून फिरतांना दिसत आहेत. मात्र, शहराच्या प्रत्येक प्रभागात शासन…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात महाविजय संकल्प २०२४ अंतर्गत प्रवास दौरा करीत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रावेर मतदार संघातील मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी मलकापूर येथे येणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे आपल्या प्रवास दौऱ्यामध्ये मराठा मंगल कार्यालय येथे लोकसभा मतदार संघाचा संपूर्ण आढावा घेण्यासोबतच संघटनात्मक आढावा घेतांना विधानसभा सुपर वारिअर्सशी संवाद साधतील. त्यासोबतच बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक घेतील. तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रभावशाली ठरलेल्या ‘संपर्क से समर्थन’ अभियान अंतर्गत सामान्य जनतेशी हनुमान चौक ते निमवाडी चौकपर्यंत पायी चालत जनतेशी…
साईमत, यावल : प्रतिनिधी जळगाव येथे गुरुवारी, ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित जन आक्रोश मोर्चात यावल तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोर्चाचे नियोजन रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ३० नोव्हेंबर रोजी जळगाव येथे भव्य स्वरूपाचा शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात केले आहे. जन आक्रोश मोर्चासाठी यावल तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहे. यावल तालुक्यातील २० ट्रॅक्टर व असंख्य शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहे.…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भयेकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.जयंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण संख्या करणे व २०२५ पर्यंत तालुका क्षयरोग मुक्त करणे या कार्यक्रमांतर्गत निदान न झालेले कुष्ठरुग्ण व निदान न झालेले क्षयरुग्ण यांना उपचाराखाली आणणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी सर्वेक्षण टीमला सहकार्य करून स्वतः पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडून केले आहे. कुष्ठरोगामध्ये अंगावर फिकट लालसर चट्टा, तेलगट चमकणारी त्वचा, अंगावरील गाठी, हातापायाला बधिरता अशी लक्षणे तर क्षयरोगामध्ये…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील परधाडे येथे सरपंच शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच घेण्यात आली. ग्रामसभेत सर्वानुमते परधाडे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रतीक महाजन यांची निवड करण्यात आली. परधाडे गावातील प्रतीक महाजन हे पत्रकार असून ते सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. तंटामुक्ती समिती ही गावातील विविध वाद-विवाद आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्ष हे गावातील शिक्षित व्यक्ती म्हणून त्यांची निवड केली आहे. गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि गावातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन, असे प्रतीक महाजन यांनी निवडीप्रसंगी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.