बोदवडला रा.काँ.तर्फे मंत्री गिरीष महाजन यांचा निषेध

0
4

साईमत, यावल : प्रतिनिधी

बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंत्री गिरीष महाजन यांनी राज्याचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या आजारपणाबद्दल केलेल्या बेताल असंवेदनशील वक्तव्याच्या निषेधार्थ बोदवड बाजार समितीसमोर नुकतेच आंदोलन करण्यात आले.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे नेते तथा आ.एकनाथराव खडसे यांच्या आजाराबद्दल मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे तात्काळ वेळेत हवाई रुग्णवाहिका पाठविल्याने त्यांचे जाहीर आभार मानतात. तसेच आ.खडसे यांची उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय बरेच राजकीय सहकारी मित्र, नेते यांनी आजारपणाची चौकशी केली. सर्वांचे आभार, सदिच्छा वृत्तवाहिन्यांवरील बोलण्यात आ.खडसे हे जाहीरपणे राजकारणाच्या पलिकडे जाऊन बोलत आहेत. हे सर्व महाराष्ट्राने पाहिले. मात्र, जिल्ह्यातील मंत्री गिरीष महाजन आ.एकनाथराव खडसे यांच्या आजारपणाची टिंगल, टवाळी जाहीरपणे वृत्त वाहिन्यांवर उडवितात. त्यावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष जळकेकर भाजपच्या संस्कृतीचे असे पाढे वाचतात.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज आणि माजी आ.स्मिता वाघ यांनी केलेले आंदोलन पूर्णतः विरोधाभासी होते. तथ्य हिन होते.विषय भरकटविणारे होते. ते केवळ वरिष्ठ नेत्यांच्या मर्जी सांभाळता यावी, यासाठी असे निंदनीय आंदोलन होते. आपली पात्रता नसताना ज्येष्ठ नेते नाथाभाऊ यांच्याबद्दल त्यांच्या अनुभवाच्या वयाबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. भाजपाच्या घाणेरड्या प्रकाराबाबत सर्व जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोक, सामान्य लोक वाईट प्रतिक्रिया नोंदवित आहे. राज्यासह जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. कापूस उत्पादक शेतकरी पीक विमा भरपाई मिळत नाही आणि भाव वाढ होत नाही. यामुळे चिंतेत आहे. सरकारी दवाखान्यात डॉक्टर आणि औषधसाठा उपलब्ध नाही. त्यावर उपाययोजना करणे सोडून तथ्यहीन भाष्य भाजपाचे पदाधिकारी करत आहेत.

बोदवडला निषेध प्रसंगी बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे समस्त आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, बाजार समितीचे उपसभापती, संचालक, सर्व सेल विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष आबा पाटील, प्रवक्ते प्रमोद धमोडे यांनी निषेध व्यक्त करत प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here