ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात फैजपूर शहर दुमदुमले

0
3

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

येथील विठ्ठल मंदिर, गावातील श्रीराम मंदिर, शिवकालीन विठ्ठल मंदिर, त्रिवेणी मंदिर, सतपंथ मंदिर, आठवडे बाजार श्रीराम मंदिर येथे कार्तिक स्नानानिमित्त महिनाभरापासून दररोज सकाळी काकड आरती उत्सव साजरा झाला. उत्सवाचा सांगता समारोप बुधवारी, २९ नोव्हेंबर रोजी झाला. सर्व मंदिर भजनी मंडळांनी फैजपूर गावातून दिंडी नगर प्रदक्षिणा काढली होती. यामध्ये भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ सहभागी होऊन युवकांनी मोठा सहभाग घेतला. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने अवघे फैजपूर शहर दुमदुमले.

दिंडीत श्रीराम मंदिराचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, सचिव काशिनाथ वारके विश्‍वस्त, किशोर कोल्हे, दिलीप पाटील, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र भंगाळे, नरेंद्र महाजन आदी सहभागी झाले होते. यावेळी काकडा नेतृत्व करणारे किशोर तांबट, लक्ष्मण पाचपांडे यांचा सुनील नारखेडे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी भूषण नारखेडे, मयूर नारखेडे, भजनी मंडळ महिला मंडळ यांचे डिगंबर महाराज चिनावलकर, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी कौतुक केले. यानंतर गावातील श्रीराम मंदिरमध्ये ह.भ.प.भावेश महाराज सूर्यवंशी विटनेरकर यांचे कीर्तन झाले. किर्तनास भानुदास महाराज पाटील, सचिन महाराज, अरुण महाराज पारगावकर यांनी सहकार्य केले. यानंतर महाप्रसादाचे वितरण झाले. समारोप अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या मनोगताने झाला. पुरोहित दीपक पाठक, मिलिंद पाठक यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वीतेसाठी विश्‍वस्त हेमराज चौधरी, विकास नेमाडे, किरण चौधरी, चंद्रशेखर चौधरी, काशिनाथ वारके, किशोर कोल्हे, दिलीप पाटील, बाबाजी पाटील, मनोज सराफ, बाळू टोके, वासुदेव भिरुड, संचालक राजेश महाजन, पप्पु चौधरी, अमोल बाक्षे, मयूर नारखेडे, गणेश पाटील, राहुल साळी, राजाराम महाजन, डॉ. गणेश भारंबे, डॉ. उमेश चौधरी, डॉ. प्रभाकर बारी, पराग चौधरी, शेखर चौधरी, ललित नारखेडे, भूषण चौधरी, जितेंद्र भारंबे, संदीप भारंबे, मनोज चौधरी, हेमा कोल्हे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here