Author: Sharad Bhalerao

साईमत, कजगाव, ता. भडगाव : वार्ताहर येथील कमलशांती व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. त्यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेश अशोकलाल न्याती तर व्हा.चेअरमनपदी गोविंदा सखाराम महाजन यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. येथील कमलशांती व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २०२३ ते २०२८ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी भडगाव सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक अविनाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी राजेश अशोकलाल न्याती यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने तसेच व्हा.चेअरमन पदासाठी गोविंदा सखाराम महाजन यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदाची निवड बिनविरोध…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे खुर्द गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभाबाई गोकुळ पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील होत्या. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य कल्पना पाटील, राजश्री पाटील, मिनाबाई पाटील, संतोष चौधरी, अरुण पाटील, लोटन भील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच माजी शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष निंबा चौधरी, पोलीस पाटील डी. आर. पाटील, बापू पाटील, विनोद पाटील, सुदाम पाटील, नामु भील, विनोद पाटील, विनोद बापू पाटील, निंबा दयाराम चौधरी, गोविंदा चौधरी, जयवंतराव पाटील, भाऊसाहेब पाटील, महेंद्र पाटील, पुरुषोत्तम चौधरी, नारायण पाटील, मूलचंद पाटील, दुर्योधन पाटील, निंबा पाटील, विजय…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची चाळीसगाव येथे रविवारी, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता चाळीसगाव शहरातील करगाव रस्त्यावरील मोठ्या कॉलेजच्या ट्रॅक पटांगणावर विराट सभा होणार आहे. त्या सभेची जय्यत तयारी सभेच्या ठिकाणी केली आहे. सकल मराठा समाजाच्या बांधवानी सभेच्या ठिकाणावर भव्य नियोजन केले आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्यानंतर मोठ्या कॉलेजचे ट्रॅक ग्राउंडवर चिखल झाल्यामुळे ग्राउंडवर ट्र्‌ॅक्टर, डंपरद्वारे मुरुम व खडीचा कच टाकून मैदानावर मराठा बांधवांना बसण्याची व्यवस्था केली आहे. विराट सभेला चाळीसगाव शहरासह तालुक्यातील तसेच भडगाव, पाचोरा, पारोळा, नांदगाव, कन्नड, येवला तालुक्यासह परिसरातील मराठा बांधव, भगिनी मराठा…

Read More

साईमत, पहूर, ता. जामनेर : वार्ताहर पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद भागवत पांढरे यांची निवड जाहीर करण्यात आली. सभेचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच अबू तडवी यांनी उपसरपंचपदी शरद पांढरे यांची निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर शरद पांढरे यांचे पॅनल प्रमुख प्रदीप लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. जामनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण पेठ ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा ११ जागांवर विजय तर सरपंचपदी भाजपचे अबू तडवी यांच्यासह ७ उमेदवार निवडून आले होते. जामनेर तालुक्यातील पहूर पेठ, सांगवी, खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सभागृहात गुरुवारी दुपारी…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे -खेवलकर यांचा शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी वाढदिवस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शहरातील संवेदना फाउंडेशन कार्यालयाजवळ जल्लोषात साजरा केला. त्यांनी पहाटे कोथळी येथील श्री संत मुक्ताईचे दर्शन घेतले. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरु असल्यावरही सकाळपासून चाहते, समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पुस्तके, वह्या देऊन ॲड. रोहिणी खडसे यांचे अभिष्टचिंतन केले. वाढदिवसाच्या दिवशी ‘बुके नको बुक द्या’ असे आवाहन केल्यानंतर बुके ऐवजी पुस्तके शुभेच्छा म्हणून स्वीकारतांना ॲड.खडसे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. यावेळी त्या म्हणाल्या की, वाढदिवस सोहळ्यात आलेले पुष्पहार, बुके कोमेजून जातात. अतिशय आकर्षक फुले फेकून देतांना मनाला खूप वेदना होतात. त्यामुळे बुकेऐवजी बुक…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सातपुडा पर्वतातातील अति दुर्गम भागातील चार गावे गाडऱ्या, जामण्या, उसमली, लंगडा अंबा येथे नवीन मतदार नोंदणीसाठीचे अर्ज व मयतांची नावे मतदार यादीतून कमी करण्याकरीता अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी संबंधित तलाठी, पोलीस पाटील उपस्थित राहिले होते. परंतु परिसरातील व त्या गावातील आदिवासी बांधव, लोक दिवसभर आपल्या दैनंदिन कामानिमित्त सायंकाळी उशिरापर्यंत बाहेर होते. त्यामुळे यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आपल्या पती, महसूल कर्मचाऱ्यांच्या स्टाफसह अति दुर्गम भागात मुक्कामी राहिल्या. चारही गावांमध्ये मतदार नोंदणीचे शासकीय काम पूर्ण केले. सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाने लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. आपल्या लोकप्रतिनिधींसह जनकल्याणकारी सरकार निवडण्याचा अधिकार राज्यघटनेने सर्वसामान्य व आदिवासी भागातील नागरिकांना मतदानाच्या…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील साकळी मंडळात गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास आणि त्यानंतर म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे शेती पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच वृक्ष उन्मळून पडल्याने काही वेळ एसटी बस व इतर वाहतूकही ठप्प झाली होती. यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी सकाळपासून यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, मंडळ अधिकारी सचिन जगताप, मनवेल, थोरगव्हाण, साकळी येथील तलाठी वानखेडे यांच्याकडून नुकसान झालेल्या शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली. यावल तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री साकळी मंडळात ३६.५ मी.मी., किनगाव ३९.९., यावल ८२, बामणोद १५.३, फैजपूर ४ मी.मी.चक्रीवादळासह पाऊस झाला.…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या प्रवर्तन चौकातील दोन ते तीन दुकानांना गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? त्याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आग लागल्याने परिसरात बराच वेळ गोंधळ उडाला होता. तसेच नगरपंचायतीकडे अग्निशमन दलाची गाडी नसल्याने मदतकार्यात अडचणी आल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. सविस्तर असे की, मुक्ताईनगर शहरात मधोमध असणाऱ्या प्रवर्तन चौकालगतच दोन ते तीन दुकानांना गुरुवारी रात्री अचानक आग लागली. या दुकानांमधून आगीचे लोळ उठतांना दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीत बूट, चप्पलचे दुकान तसेच…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील विरावली येथील १०० ते १२५ शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी पीक संरक्षण सोसायटी अवसायनात काढा, अशी मागणी यावल येथील सहाय्यक निबंधक यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. विरावली येथील काशिनाथ लक्ष्मण पाटील यांच्यासह शंभर ते सव्वाशे शेतकऱ्यांनी गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, विरावली गावातील पीक संरक्षण सहकारी संस्था गत अनेक वर्षापासून बंद आहे. संस्थेचे कोणतेही कार्यालय नसुन संस्थेचे कामकाज बंद आहे. संस्थेत कोणतेही सभासद संकेत वाढ नसुन सर्व सभासदांचे ५०० रुपयाच्या आत भागभाडंवल आहे.त्यानुसार संस्था निधीची उभारणी करण्यास कसुरवार झाली आहे. अधिनियम, नियम व उपविधी यातील नोंदणी व व्यवस्थापनबाबतच्या कोणत्याही शर्तीचे अनुपालन करणे…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध व प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्यावतीने गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी नेत्यांचा आक्रोश मोर्चात सहभाग याप्रसंगी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतिष पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जळगाव महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे अनेक आजी-माजी नेत्यांनी सहभाग घेतला होता. आ.जयंत पाटलांच्या हातात ट्रॅक्टरची स्टेरींग शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत…

Read More