लोकशाही बळकटीसाठी यावलच्या तहसिलदारांचा अतिदुर्गम भागात मुक्काम

0
1

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील सातपुडा पर्वतातातील अति दुर्गम भागातील चार गावे गाडऱ्या, जामण्या, उसमली, लंगडा अंबा येथे नवीन मतदार नोंदणीसाठीचे अर्ज व मयतांची नावे मतदार यादीतून कमी करण्याकरीता अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी संबंधित तलाठी, पोलीस पाटील उपस्थित राहिले होते. परंतु परिसरातील व त्या गावातील आदिवासी बांधव, लोक दिवसभर आपल्या दैनंदिन कामानिमित्त सायंकाळी उशिरापर्यंत बाहेर होते. त्यामुळे यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आपल्या पती, महसूल कर्मचाऱ्यांच्या स्टाफसह अति दुर्गम भागात मुक्कामी राहिल्या. चारही गावांमध्ये मतदार नोंदणीचे शासकीय काम पूर्ण केले.

सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाने लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. आपल्या लोकप्रतिनिधींसह जनकल्याणकारी सरकार निवडण्याचा अधिकार राज्यघटनेने सर्वसामान्य व आदिवासी भागातील नागरिकांना मतदानाच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे देशाची समृद्ध लोकशाही अधिक मजबूत, बळकट करण्यासाठी प्रत्येकाचे मतदार यादीत नाव नोंद करून घेण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याच उद्देशाने शासकीय कर्तव्य काटेकोरपणे पालन करण्यासाठी ते निभावण्यासाठी शासन व मतदानाचा हक्क बजावावा, अशा सूचना राज्य सरकारपासून विभागीय स्तरावरून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र मतदार यादीत राहिलेल्या पात्र तरुण, मुला-मुलींचे, स्त्री-पुरुष नागरिकांचे नाव नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गावस्तरावर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडेही मतदार यादी पाहण्यास उपलब्ध आहे. येत्या ९ डिसेंबरपर्यंत नवमतदारांना यादीत आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपल्या नावाची नोंदणी केलेली नाही. तसेच नवमतदार तरुण, तरुणींनी यादीत नोंदणी करून लोकशाहीच्या प्रक्रियेतील भाग यावलच्या तहसीलदार आणि त्यांचे मतदार नोंदणी अधिकारी सक्रिय करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here