Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील पारोळा येथील बहुसंख्य अल्पसंख्याक बांधवांनी रविवारी, १४ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्यासह एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्र प्रमुख करण पवार, भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील जळकेकर महाराज, तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी आदींनी सर्वांचे स्वागत केले. भाजपाच्या ध्येय व धोरणांवर विश्‍वास ठेवून प्रवेश करणाऱ्यांमध्ये पारोळा येथील अल्पसंख्याक बांधव अहमद शेख बिस्मिल्ला मोमीन, शेख जुबेर शेख मोहमद, असरार अहमद, शेख चिराग, शेख वसीम, शेख रशीद, शेख असम, शेख हसन, शेख फारूख, शेख शकील, शेख कालू, शेख ओवेस, शेख शाहरूख, शेख अहमद आदींचा समावेश होता.

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी कल्याण विभाग व श्रीमती जी. जी .खडसे महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण विभाग व युवती सभा अंतर्गत ८ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीत झालेल्या कार्यशाळेच्या समारोप करण्यात आला. जळगाव जिल्हा विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक प्रा. संजय पाटील यांनी युवतींना मार्गदर्शन कर सर्व अंगाने सक्षम होण्यासाठी प्रेरित केले. कारण कोणाच्या आयुष्यात कोणता प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. यासाठी प्रत्येक युवतीने आपल्या पायावर उभे राहणे म्हणजे आत्मनिर्भर होण्यासाठी आरोग्य, शिक्षण, व्यवसाय या गोष्टीवर भर द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.पी. पाटील यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा जीवनात माणसे वाचता आली पाहिजे.…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांनी बघावा. त्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून घ्यावा. म्हणून एणगाव येथील जी.डी. ढाके हायस्कुलच्या ४५० विद्यार्थ्यांनी बोदवड शालिमार थिएटरमध्ये जाऊन ‘सत्यशोधक’ चित्रपट बघितला. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना बघता यावा, यासाठी बोदवड महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. रुपेश मोरे यांनी तथा बोदवड येथील जनसेवक विनोद पाडर यांनी सर्व साडेचारशे विद्यार्थ्यांच्या सिनेमा तिकिटांचा खर्च उचलला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहण्याचा अनुभव घेतला. एणगाव जी.डी. ढाके हायस्कुल येथून बोदवड येथील चित्रपटगृहापर्यंत येण्या-जाण्यासाठी बस गाडी उपलब्ध नव्हती. तेव्हा विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत चित्रपट बघता यावा,…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहीम केंद्र व राज्य शासनाकडून १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत आखण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रा ही जळगाव शहरात विविध भागात १५ जानेवारी २०२४ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सोमवारी, १५ जानेवारी रोजी जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत विकसित भारत संकल्पना यात्रा मोहिमेअंतर्गत शहरातील सुभाष चौक येथे जळगाव शहरातील लोकांच्या कल्याणाच्या व विकासाच्या दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. यावेळी सुभाष चौक येथे विकसित भारत संकल्पना…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षा हे केवळ अभियान काळापुरते मर्यादित न ठेवता नेहमीसाठी याची अंमलबजावणी करा. रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून रस्ता सुरक्षा अभियान ही लोक चळवळ निर्माण करून जास्तीत जास्त जनजागृती करून रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करा. रस्ता सप्ताह हा फक्त सात दिवसांसाठीचा सप्ताह नसून जीवन सप्ताह आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी, १५ जानेवारी रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते.…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी महानगरपालिकेतील अनुकंपा भरती प्रक्रिया सोमवारी, १५ जानेवारी रोजी पूर्ण करण्यात आली. अनुकंपा प्रतिक्षासूचीत १२५ उमेदवार होते. त्यापैकी १७ इतके उमेदवार विविध कारणास्तव अपात्र ठरले. तसेच १०८ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यापैकी गट ‘क’ चे ३६ व गट ‘ड’ चे १८ अशा ५४ उमेदवारांना विविध पदांवर सभागृहात आ. राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीच्या आदेशाचे वितरण करण्यात आले. वर्ग ३ च्या लिपिक २३, वाहन चालक ५, कनिष्ठ अभियंता स्थापत्य २, कनिष्ठ अभियंता यांत्रिक १, कनिष्ठ अभियंता विद्युत १, रचना सहाय्यक १, स्वच्छता निरीक्षक १, संगणक तंत्रज्ञ १, दुरध्वनी चालक १, व वर्ग ४ च्या शिपाई १४, मेलेरीया कुली…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी प्रभू श्रीराम आणि माता शबरी भेटीचे भारतीय संस्कृती व सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भक्त व भगवंत यांच्यातील अतुट विश्‍वास व आस्था तसेच सामाजिक समरसतेचे खूप मोठे प्रामाणिक उदाहरण आहे. संपूर्ण जगासाठी ही भेट कल्याणकारी असा क्षण आहे. अशा पवित्र शबरीधाम याठिकाणी प्रभू रामाचे आगमन पदयात्रेचा शुभारंभ हा वारसा फाटा, पिंपळनेर, ता.साक्री, जि.धुळे येथून फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या सोबत हजारो आदिवासी बांधव श्रीरामाच्या जयघोषात नुकतेच पायी निघाले. पदयात्रेत शबरीमातेच्या कुळात जन्मलेल्या सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. पदयात्रेत शबरी माता…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील ज्ञानगंगा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, डॉ.किरण कुवर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक जळगाव), विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, दीपक पाटील (सिनेट सदस्य), एजाज शेख (उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जळगाव), रागिनी चव्हाण (उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जळगाव), विष्णू काळे (अधीक्षक, शालेय पोषण आहार जामनेर), किशोर राजे (अध्यक्ष, जिल्हा विज्ञान मंडळ जळगाव), सुनील वानखेडे (सचिव, जिल्हा विज्ञान मंडळ) आदी उपस्थित होते. प्रदर्शनात विद्यार्थी गटातून प्राथमिक गट सहावी ते आठवीमधून ३३ विज्ञान साहित्य, माध्यमिक गटात नववी ते बारावीमधून ३७ साहित्य तर…

Read More

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावातील अनुभूती इंटरनॅशनल स्कुल येथे सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. त्यात पहुर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील आठ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी स्पर्धेत सहा सुवर्ण पदकांची कमाई करुन दोन रौप्य पदके मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. सुवर्ण पदक प्राप्त खेळांडुमध्ये मोहिनी राऊत इयत्ता पाचवी, वृषाली पवार इ.पाचवी, श्रावणी लोहार इ.सहावी, निलेश मालकर इ.पाचवी, कार्तिक सोनवणे इ.पाचवी, वृषभ चौधरी इ.सहावी यांचा समावेश आहे. तसेच अभिमन्यू घोंगडे आणि भावेश महाजन यांनी रौप्य पदकाची कमाई केली. स्पर्धेतील…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील बियाणी मिलिटरी स्कुल येथे भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे रविवारी, १४ जानेवारी रोजी जिल्हा संघ निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात शालेय जिल्हास्तरीय गोळा फेक (शॉट पुट) स्पर्धेत जळगाव येथील के.सी. ई. सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातील सहावीचा विद्यार्थी अजिंक्य पंकज सोनार याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. येत्या ९ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान सांगली येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा होत आहे. यासाठी तो राज्यस्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. अजिंक्यला के.सी.ई. सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशिक्षणासाठी त्याला ए. टी.…

Read More