पारोळा शहरातील अल्पसंख्याक बांधवांचा भाजपात प्रवेश

0
19

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील पारोळा येथील बहुसंख्य अल्पसंख्याक बांधवांनी रविवारी, १४ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्यासह एरंडोल-पारोळा विधानसभा क्षेत्र प्रमुख करण पवार, भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील जळकेकर महाराज, तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी आदींनी सर्वांचे स्वागत केले.

भाजपाच्या ध्येय व धोरणांवर विश्‍वास ठेवून प्रवेश करणाऱ्यांमध्ये पारोळा येथील अल्पसंख्याक बांधव अहमद शेख बिस्मिल्ला मोमीन, शेख जुबेर शेख मोहमद, असरार अहमद, शेख चिराग, शेख वसीम, शेख रशीद, शेख असम, शेख हसन, शेख फारूख, शेख शकील, शेख कालू, शेख ओवेस, शेख शाहरूख, शेख अहमद आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here