कारमध्ये कोंबून चोरट्यांचा थरार, पोलिसात तक्रार दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील वर्दळीच्या खोटे नगर परिसरात चोरट्यांनी धाडस दाखवत हॉटेलसमोर बांधलेली गाय थेट कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी, २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खोटे नगर भागातील ‘गावकरी हॉटेल’समोर हॉटेल मालकाची गाय नेहमीप्रमाणे बांधलेली होती. मध्यरात्रीच्या सामसुम स्थितीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरटे पांढऱ्या रंगाच्या ब्रेजा कारमधून घटनास्थळी आले. काही क्षणांतच त्यांनी अत्यंत सराईतपणे गाईला ओढत कारच्या मागील डिक्कीत कोंबले आणि काही सेकंदातच कारसह तेथून पलायन केले. हा संपूर्ण थरारक…
Author: Sharad Bhalerao
असोद्यातील शाळेत पीआय शशिकांत पाटील यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थी जीवनातील चांगले मित्र आणि मैत्रिणी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडील, शिक्षक आणि ज्येष्ठांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी सांगितले. असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मनाची जनजागृती विषयावर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. त्यांनी गुड टच-बॅड टच, आई-वडील व शिक्षक यांचे जीवनातील महत्व तसेच विद्यार्थी सुरक्षिततेसाठी उपलब्ध पोलीस हेल्पलाइन क्रमांक याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक पी.जी. कोल्हे होते. विचार मंचावर ए.एस.आय. सुनील पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, पोलीस नाईक ज्ञानेश्वर कोळी…
विद्यार्थ्यांना हिरव्या रंगावर मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विवेकानंद प्रतिष्ठान काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमधील पूर्व प्राथमिक विभागात नुकताच ‘ग्रीन कलर डे’ साजरा करण्यात आला. उपक्रमाचा मुख्य उद्देश लहान विद्यार्थ्यांना हिरवा रंगाची ओळख करून देणे तसेच निसर्गातील त्याचे महत्त्व समजावून सांगणे हा होता. यादिवशी सर्व विद्यार्थी व शिक्षक हिरव्या रंगाच्या विविध छटांचे कपडे परिधान करून उपस्थित होते. यादिवशी टेबलवर हिरव्या रंगाचे फळे, भाज्या तसेच वेगवेगळे क्राफ्ट पेपरच्या वस्तु बनवून चार्टवर सुंदररित्या सजविण्यात आले होते. त्यात ज्युनिअर केजीसाठी पानांमध्ये रंगभरण, सिनिअर केजीसाठी आंब्याच्या पानांचे तोरण कसे बनवायचे हे विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. शिक्षकांनी हिरवा रंग हा निसर्ग, वाढ, ताजेपणा व आरोग्याचे प्रतीक असल्याचे सोप्या…
जैन हिल्सला ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ तांत्रिक सादरीकरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसात जैन हिल्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेत ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ शेतकऱ्यांना लागवडीची दिशा ठरविण्याचा मंत्र मिळत आहे. जागतिक मानांकन असलेल्या बंदिस्त वातावरणात मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोगमुक्त रोपांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या दशकात जैन स्वीट ऑरेंजच्या माध्यमातून जैन इरिगेशनसारखी खासगी संस्था प्रभावी संशोधन करीत आहे ते शेतकऱ्यांसाठी मौलीक अशी गोष्ट आहे, असे सांगत कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना चांगल्यात चांगली रोपे उपलब्ध करुन द्यावी, असे मत परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी व्यक्त केले. देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू)…
स्पर्धेत ६० फिडे गुणांकाच्या खेळाडूंसह १६० सहभागी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जी. एच. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे जी. एच. रायसोनी यांच्या स्मरणार्थ आयोजित जी. एच. रायसोनी ओपन बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. जळगाव बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित स्पर्धेत जळगावसह धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला व मध्यप्रदेश येथील ६० फिडे आंतरराष्ट्रीय गुणांक असणारे खेळाडू सहभागी झाले. १६० खेळाडूंनी खुल्या वयोगटासह ९, ११, १५ वर्ष वयोगटात आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांनी पारंपरिक पटावरून केले. खुल्या वयोगटासह पंधरा वर्षे खालील वयोगटात आठ फेऱ्या तर नऊ व अकरा वर्ष वयोगटात सात फेऱ्या घेण्यात आल्या. खुल्या वयोगटात प्रा. तेजस…
पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणुकीत समाजबांधवांची उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळातर्फे रविवारी, २१ डिसेंबर रोजी दुपारी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सवाद्य मिरवणूक पालखी सोहळा आयोजित केला होता. मिरवणुकीत महिला व मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध वेशभूषा साकारल्या होत्या. याप्रसंगी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सुरुवातीला कांचन नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ संताजी जगनाडे महाराज आणि संताजी कडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्यासह समाजबांधवांनी माल्यार्पण केले. त्यानंतर समाज बांधवांनी संतांच्या जयघोषात मिरवणुकीला प्रारंभ केला. पालखी सोहळ्याचे यंदाचे पंधरावे वर्ष ही मिरवणूक कांचन नगर, चौगुले प्लॉट, भिलपुरा पोलीस चौकी, घाणेकर चौकमार्गे पोलनपेठेतील दत्त…
रोटरी जळगावच्या संवाद सत्रातील महिलांचा सूर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सातत्य, सकारात्मक विचार व सजगता हेच निरोगी जीवनाचे गमक आहे, असे रोटरी क्लब जळगावच्या निरोगी जीवन व सवयी विषयावरील संवादातील सहभागी महिला सदस्यांनी केले. रोटरीच्या रोग प्रतिबंध व उपचार महिन्यांतर्गत महिला समितीच्यावतीने आयोजित विशेष सभेत त्या बोलत होत्या. त्यात रोटरी परिवारातील सदस्य माजी अध्यक्ष डॉ. सुमन लोढा, सेवानिवृत्त उपप्राचार्य पूनम मानुधने, स्वाती ढाके यांनी सहभाग नोंदवला. संवादाचे संचालन पहिली महिला आदिती कुळकर्णी यांनी केले. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांची उपस्थिती होती. तीनही मान्यवर सदस्यांनी आपापल्या जीवनप्रवासातून एकच गोष्ट ठामपणे सांगितली की, निरोगी जीवनासाठी आपण स्वतःसाठी वेळ काढला…
किशोर महोत्सवाअंतर्गत सुमधुर गायनासह आकर्षक नृत्य सादर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात किशोर महोत्सवाअंतर्गत ‘विविध गुणदर्शन’ हा विद्यार्थ्यांचा आवडता कार्यक्रम नुकताच जल्लोषात पार पडला. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त व प्रमुख समन्वयिका पद्मजा अत्रे, सहसचिवा मीरा गाडगीळ, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, सांस्कृतिक प्रमुख सुवर्णा वंजारी, उपप्रमुख स्मिता करे, विविध गुणदर्शन समिती प्रमुख पांडुरंग सोनवणे, संपदा तुंबडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, गोंधळ, सिनेगीत, भक्तीगीत, भावगीते यांचे सुमधुर गायन तसेच आकर्षक नृत्य सादर केले. डफ, बासरी व संबळ वाद्यांचे वादनही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. विद्यार्थ्यांना संपदा…
भारतीय संस्कृतीचे रंगतदार दर्शन ; कलाकारांवर बक्षीसांचा वर्षाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेत नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम ‘आनंदोत्सव–२०२५’ उत्साहात आणि दिमाखात पार पडला. इयत्ता पाचवी ते दहावीतील तब्बल ३०० विद्यार्थी कलाकारांनी सहभाग नोंदवून पंजाबी, कोळी, कथ्थक, घुमर, भारुड, नटरंग, महाकाली आदी १४ बहारदार व नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केले. दमदार सादरीकरणामुळे प्रेक्षक अक्षरशः दोन तास मंत्रमुग्ध झाले. उत्कृष्ट सादरीकरणासाठी कलाकारांना १५ हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद चांदसरकर, उपाध्यक्षा सीमा चांदसरकर, शालेय समिती अध्यक्षा…
दिनदर्शिकेत हिंदू धर्मातील पवित्र सणांच्या माहितीचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सभासदांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँकेच्यावतीने दरवर्षी अतिशय माहितीपूर्ण अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिका तयार करण्यात येते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असतो. २०२६ साठी बँकेच्यावतीने वैदिक सणांचे शास्त्रीय व आध्यात्मिक महत्व या विषयास अनुसरुन हिंदू धर्मातील पवित्र सणांच्या माहितीचा समावेश दिनदर्शिकेत केला आहे. याप्रसंगी श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, संत मुक्ताबाई संस्थानचे ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे, चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी, वैद्य डॉ. प्रणिता वडोदकर, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष डॉ.अतुल सरोदे, संचालक अनिल राव, हरीशचंद्र…