Author: Sharad Bhalerao

साईमत, बोदवड : प्रतिनिधी येथील रहिवासी तथा साळशिंगी येथील शेतमालक संदीप मधुकर वैष्णव गट क्रमांक ३२० यांनी आपल्या शेतात गुरांचा गोठा बांधलेला आहे. या गुरांच्या गोठ्यात कापूस साठवून ठेवलेला आहे. मंगळवारी, १६ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याच्या गेटला असलेले कुलूप व खोलीच्या दरवाजाचे कुलूप टॉमीसारखे अशा शस्त्राने तोडून गोठ्यात साठविलेला सुमारे पाच क्विंटल कापूस बैलगाडीवर सोडून गेला आहे. कापूस चोरीमुळे संदीप वैष्णव यांचे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीला दुष्काळाची परिस्थिती आहे. यंदा कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे. त्यामध्ये अशा मोठ्या चोऱ्यांची संख्या वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशा भुरट्या चोरांचा पोलिसांनी ताबडतोब…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडासीम ग्रामपंचायतमधील आर्थिक अपहाराबाबत लेखी तक्रार त्यानंतर उपोषण, लक्षवेधी आंदोलन करूनही यावल पंचायत समिती आणि जळगाव जिल्हा परिषद यांनी कारवाई न केल्याने तक्रारदार शेखर सोपान पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात न्याय मागितला होता. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाकडून संबंधित यंत्रणेला नोटीस काढल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील सावखेडासीम ग्रामपंचायत कार्यालयात २०२० ते २०२३ या कालावधीत सावखेडासीम ग्रामपंचायत कार्यालयाचे तत्कालीन सरपंच आणि सेवानिवृत्त ग्रामसेवक यांनी संबंधित यंत्रणेशी हातमिळवणी करून ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झालेल्या १५ वा वित्त आयोग निधी, ग्रामनिधी व गावातील जनतेने ग्रामपंचायत कार्यालयात जमा केलेला पाणीपुरवठा निधी, ग्रामपंचायत कार्यालयाचे…

Read More

साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर अयोध्या येथे होणाऱ्या प्रभु श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर साकेगावातील प्रत्येक गल्लीबोळात भगवे वातावरण पसरल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. प्रत्येक गल्लीत भगवे ध्वज व भगव्या पताका लावून प्रत्येक गल्ली सजविण्यात येत आहे. यासाठी गावातील तरुण अथक परिश्रम घेत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गावात विविध जो तो आपापल्या परीने आपापल्या परिसरात स्वतःहून काम करत आहे. येत्या २२ तारखेला प्रभू श्रीराम यांची प्रथमच पाचशे वर्षानंतर मंदिरात स्थापना होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मंदिरावर दिवे लावणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच गावातील मंदिरेही आतापासून स्वच्छ करण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे गावात २२ तारखेला दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांमधून…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाअंतर्गत, विद्यासमितीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रोशनी पुंडलिक गोपाळ हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. त्यात शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यासाठी ‘शिक्षण-व्यक्तिमत्व विकास’ हा निबंधाचा विषय देण्यात आलेला होता. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुलचे कलाशिक्षक व्ही.पी.जोशी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, प्रभारी उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, श्री.काळे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी.एन.नरवाडे, पर्यवेक्षक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा नुकतीच घेण्यात आली. त्यात ४२ सभासदांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मकर संक्रांतनिमित्त गावात रॅली काढून ज्येष्ठ महिलांनी तिळगुळ आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. रॅलीत ७२ महिला आणि ४३ पुरूषांनी सहभाग नोंदविला. ज्येष्ठ नागरिक संघाने गावात तिळगुळ वाटप करून मकरसंक्रांतीचा सण साजरा केला. त्यामुळे त्यांनी नवीन पिढीला संस्कृतीचे धडे दिले. भावी नवीन पिढीला आपली भारतीय संस्कृती, येणारे सण, उत्सवाची माहिती व्हावी म्हणून हा सण संपूर्ण लोहारा गावात ज्येष्ठ नागरिकांनी रॅली काढून तरुणांचे लक्ष वेधले. प्रत्येकाला तिळगुळ देऊन शुभाशीर्वाद सुद्धा दिले. रॅलीत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबिकार, सचिव बाबुलाल बोरसे,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी आज समाजात अनेक लोक दु:खी आहेत. मनुष्य पैशामागे धावत आहे. अधिक पैसा कमाविण्याच्या नादात तो धावतो आहे. मात्र, त्याचे शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. निरोगी शरीर आज काळाची गरज आहे. झोप घेण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. जगात श्रीमंत आणि संपत्तीवाला माणूस तोच आहे ज्याच्या झोपण्याच्या खोलीत डायबेटीज, ब्लड प्रेशरसारख्या आजारांच्या गोळ्या नाहीत. त्यासाठी कमावलेल्या धनाचा, मिळालेल्या पदाचा आणि खुर्चीचा सदुपयोग करा, असे महाशिवपुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या अमृतवाणीतून उपदेश दिला. ते पुढे म्हणाले की, खा. उन्मेष पाटील यांनी महाशिवपुराण कथा सोहळा आयोजित करून आपल्या पदाचा सदुपयोग केला. अधिक पैसा कमाविण्याच्या नादात आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो.…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा-भडगाव मतदारसंघात परिवर्तनाचा नारा बुलंद करत मैदानात उतरलेल्या शिवसेना-उबाठाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी गावोगावी शाखा उघडण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी नऊ गावांमध्ये शाखांचे उद्घाटन केले. पाचोरा-भडगाव मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी यांनी तगडे आव्हान उभे करतांना जनसामान्यांशी थेट संपर्क सुरू करतांनाच ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या अंतर्गत आजवर ७० पेक्षा जास्त शाखांचा प्रारंभ करण्यात आला. त्यांनी तालुक्यात नुकतेच शाखांचे उद्घाटन केले. त्यात प्रामुख्याने दुसखेडा, वडगाव खुर्द, हडसन व मोहाडी या गावांमध्ये प्रत्येकी एक तसेच पहाण, आसनखेडा गावात प्रत्येकी दोन तर नांद्रा गावात तीन शाखांचे उद्घाटन केले. प्रत्येक शाखेच्या ठिकाणी त्यांंचे ढोल-ताशांचा गजर आणि…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मकर संक्रांतीचे औचित्य साधून ‘मुक्ताई फाउंडेशन’ तर्फे आयोजित आणि ‘मुक्ताई क्लासेस’तर्फे प्रायोजित रांगोळी स्पर्धेचे ‘किड्डू इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कुल’ येथे आयोजन केले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून विविध ज्वलंत विषयांवर प्रकाश टाकत उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या. ह्या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील छोट्या गटात प्रथम प्राची विनोद लोहार, द्वितीय विशाखा पराग पाचपांडे, तृतीय उत्कर्षा मुकेश जंजाळ, मोठ्या गटात प्रथम गायत्री नितीन हरणे, द्वितीय भुवनेश्‍वरी बाळू मराठे, तृतीय वृंदा सुनील फिरके तर उत्तेजनार्थ क्रमांक श्रावणी गणेश कपले यांनी पटकावला. कलाकृतींचे परीक्षण ज्येष्ठ कलाशिक्षक शशिकांत सोनवणे, संजय राणे, कविता भंगाळे…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील यावल नगरपरिषदेने गेल्या ९ जानेवारी २०२४ रोजी वार्षिक सर्वसाधारण निविदा प्रसिद्ध केल्याने ठेकेदारांच्या वर्तुळात अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. तसेच मागील निविदांची मुदत आणि ठराव, आदेश, वर्कआर्डर यांची मुदत संपलेली नसताना निविदा प्रसिद्ध झाल्याने यावल नगरपरिषद कारभाराविषयी आणि ठेकेदारांच्या सोयीनुसार निविदा काढल्याने हे प्रकरण मुख्याधिकारी यांच्या अंगाशी येणार असल्याचे चर्चिले जात आहे. यावल नगरपरिषदेचा १७ जानेवारी २०२० रोजी विशेष सभेतील ठराव क्रमांक ७१६ प्रत्यक्ष बघितला असता यावल नगरपरिषद हद्दीतील गट नंबर २६, ७५४ व ६८७ च्या ओपन स्पेसमध्ये विकसित केलेले बगीचे देखभालसाठी मागविण्यात आलेल्या वार्षिक ई-निविदेनुसार प्राप्त निविदांपैकी सर्वात कमीबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्या…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्रभू यांची दिव्य कथा मानवी जीवनात आदर्श निर्माण करणारी असल्याचे प्रतिपादन श्रीराम मंदिर फैजपूरचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी केले. श्री क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम लला मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त फैजपूर येथील श्रीराम मंदिरात संगीत रामायण कथेचा प्रारंभ मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, पवनदास महाराज, प्रवीण महाराज, दीपक पाठक महाराज, मिलिंद पाठक महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आला. कथा प्रवक्ते ह.भ.प. मुरलीधर महाराज कथरेकर व संगीत साथ ह.भ.प. निवृत्ती महाराज साळुंखे, उमेश महाराज, मोहन महाराज हे करणार आहे. व्यासपीठ व वक्ता पूजन डॉ. गणेश भारंबे, हेमराज चौधरी, काशिनाथ वारके, विकास नेमाडे,…

Read More