साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मकर संक्रांतीचे औचित्य साधून ‘मुक्ताई फाउंडेशन’ तर्फे आयोजित आणि ‘मुक्ताई क्लासेस’तर्फे प्रायोजित रांगोळी स्पर्धेचे ‘किड्डू इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कुल’ येथे आयोजन केले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून विविध ज्वलंत विषयांवर प्रकाश टाकत उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या. ह्या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
स्पर्धेतील छोट्या गटात प्रथम प्राची विनोद लोहार, द्वितीय विशाखा पराग पाचपांडे, तृतीय उत्कर्षा मुकेश जंजाळ, मोठ्या गटात प्रथम गायत्री नितीन हरणे, द्वितीय भुवनेश्वरी बाळू मराठे, तृतीय वृंदा सुनील फिरके तर उत्तेजनार्थ क्रमांक श्रावणी गणेश कपले यांनी पटकावला.
कलाकृतींचे परीक्षण ज्येष्ठ कलाशिक्षक शशिकांत सोनवणे, संजय राणे, कविता भंगाळे यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अविनाश नाईक, मुक्ताई क्लासेसच्या संचालिका सुनीता नाईक, मुख्याध्यापिका भारती तायडे उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.