कमावलेल्या धनाचा, मिळालेल्या पदाचा अन्‌ खुर्चीचा सदुपयोग करा

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

आज समाजात अनेक लोक दु:खी आहेत. मनुष्य पैशामागे धावत आहे. अधिक पैसा कमाविण्याच्या नादात तो धावतो आहे. मात्र, त्याचे शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. निरोगी शरीर आज काळाची गरज आहे. झोप घेण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. जगात श्रीमंत आणि संपत्तीवाला माणूस तोच आहे ज्याच्या झोपण्याच्या खोलीत डायबेटीज, ब्लड प्रेशरसारख्या आजारांच्या गोळ्या नाहीत. त्यासाठी कमावलेल्या धनाचा, मिळालेल्या पदाचा आणि खुर्चीचा सदुपयोग करा, असे महाशिवपुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी आपल्या अमृतवाणीतून उपदेश दिला.

ते पुढे म्हणाले की, खा. उन्मेष पाटील यांनी महाशिवपुराण कथा सोहळा आयोजित करून आपल्या पदाचा सदुपयोग केला. अधिक पैसा कमाविण्याच्या नादात आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे विविध आजारांना आमंत्रित करतो आणि हाच कमावलेला पैसा दवाखान्यात खर्च करावा लागतो. अशावेळी शिवमहापुराण कथा ऐकून शिव आराधना करतात आणि आपले अनुभव कथन करतात.

शिवमहापुराण कथेमुळे अनेकांची दुख, संकटे दूर झाल्याचे अनुभव कथन करतात, हा शिवमहिमा असल्याचे ते म्हणाले. आज घराघरात भावाभावात वाद होतात. एकत्रित परिवार विखुरला आहे.एकमेकांमध्ये संवाद राहिला नाही. असेच एकमेकांमध्ये भांडत राहिलो तर भविष्यात कधीच एकत्र होणार नाही, असा उपदेश त्यांनी दिला.

पं.मिश्रा यांनी प्रेमाची व्याख्या स्पष्ट केली. तरुणांनी प्रेम करणे चुकीचे नाही पण आपल्या करिअर, शिक्षण, आयुष्यावर तरूणांनी प्रेम करावे, आपल्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये दिसतील असे प्रेम करू नका, असा उपदेश त्यांनी तरुणाईला दिला. आई, वडिल यांचा आदर बाळगा, हिंदू धर्माचा अभिमान बाळगा, असेही ते म्हणाले.

विश्‍वप्रसिध्द प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या मालेगाव रोड परिसरात खा.उन्मेष पाटील यांच्या आयोजनातून सुरू झालेल्या शिव महापुराण कथेला दुसऱ्या दिवशीही रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या चाळीसगाव येथील कथेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here