साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम प्रभू यांची दिव्य कथा मानवी जीवनात आदर्श निर्माण करणारी असल्याचे प्रतिपादन श्रीराम मंदिर फैजपूरचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी केले. श्री क्षेत्र अयोध्या येथे श्रीराम लला मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त फैजपूर येथील श्रीराम मंदिरात संगीत रामायण कथेचा प्रारंभ मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, पवनदास महाराज, प्रवीण महाराज, दीपक पाठक महाराज, मिलिंद पाठक महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आला.
कथा प्रवक्ते ह.भ.प. मुरलीधर महाराज कथरेकर व संगीत साथ ह.भ.प. निवृत्ती महाराज साळुंखे, उमेश महाराज, मोहन महाराज हे करणार आहे. व्यासपीठ व वक्ता पूजन डॉ. गणेश भारंबे, हेमराज चौधरी, काशिनाथ वारके, विकास नेमाडे, राजाराम महाजन, डॉ. उमेश चौधरी यांनी तर कलश पूजन किशोर कोल्हे यांनी सपत्नीक केले. यावेळी नीलकंठ सराफ, बी.ई.पाटील, विजय परदेशी, सुरेश परदेशी, दिलीप पाटील, पंकज पाटील, राजेश महाजन, गोटू परदेशी, भूषण नारखेडे, सुनील नारखेडे, अशोक पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वस्त किरण चौधरी यांनी केले.