साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील भडगाव रस्त्यालगतच्या लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात चाळीसगाव जेसीआय सिटीचा पदग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय नौदलातील व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमित महाजन, सहाय्यक वाहन निरीक्षक तुषार मुसळे, जेसीआय झोन अध्यक्ष जितेंद्र बोरा, झोन उपाध्यक्ष गौरव धाकराव, माजी अध्यक्ष जेसी अफसर खाटीक उपस्थित होते. व्यासपीठावर आयपीपी २०२३ धर्मराज खैरनार, २०२३चे अध्यक्ष ॲड. सागर पाटील, सचिव महेंद्र कुमावत, विद्यमान अध्यक्ष नरेंद्र शिरुडे, सचिव मनोज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अमित महाजन यांनी जेसीआयच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर सुनील भोकरे यांनी जेसीआयच्या आजपर्यंतच्या कार्यकाळाबद्दल प्रशंसा व्यक्त केली. ॲड.…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर यांच्या संकल्पनेतून पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी मलकापूर शहरातील संपादकासह पत्रकारांना भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुशील मोरे, अजय सावळे, तालुका उपाध्यक्ष विलास तायडे तसेच ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, हिंदी-मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्री काटीकर-पाटील, ज्येष्ठ पत्रकार वीरसिंह राजपूत, जिल्हा महासचिव आतिश खराटे होते. बाळासाहेब दामोदर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनप्रबोधन करून लोकशाही बळकट करणाऱ्या पत्रकार बांधवांचे भरीव कार्य देशासाठी खूप आवश्यक…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी महामार्ग पोलीस मदत केंद्राद्वारे १५ जानेवारी २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मलकापूर येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स महाविद्यालयात बुधवारी, १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाबद्दल मार्गदर्शन करुन सुरक्षेचे धडे देण्यात आले. यावेळी मलकापूर महामार्ग पोलीस मदत केंद्र येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन केले. यामध्ये अठरा वर्ष वयोगटातील मुलांनी मोटार सायकल चालवू नये, विना लायसन्स व विना हेल्मेट मोटर सायकल वाहन चालवू नये, ओवर स्पीड व ट्रिपल सीट मोटार सायकल चालवू नये. तसेच रस्त्याने चालताना नेहमी डाव्या…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बुधवारी, १७ जानेवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जळगाव जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या पदाचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असणारे ‘उन्नत अभिवृध्दी योजना’ मूल्यमापन शिबिर घेण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांना शासनाच्या आदेशानुसार मूल्यमापन करण्यासाठी आयोजित शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. याप्रसंगी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे वरिष्ठ प्राध्यापक प्रा.डॉ.सी.पी.चौधरी, प्रा. डॉ सुनील आर.पाटील तसेच मूल्यमापन शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष स्व. दादासाहेब देविदास नामदेव भोळे यांच्या…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील येवती येथे मुक्ताईनगर मतदार संघाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रस्ते डांबरीकरणाचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. बोदवड ते सोनोटी -४७;५० लाख, लोणवाडी ते पिंपळगाव देवी-४७;५० लाख तसेच येवती ते कुऱ्हा हर्दो -५००;४३ लाख एकूण रक्कम ६.३८ कोटी रुपयांचे काम आ.चंद्रकांत पाटील यांनी मंजूर करून आपल्या मतदारसंघांमध्ये विकास पर्व घडवून आणण्याचे काम केले. अजूनही भरपूर कामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बोदवड तालुक्याला कोरडेठाक ठेवले. आम्ही जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावांना पाण्याची सुव्यवस्था करून दिली. बोदवड तालुक्यात बोदवडसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केली. ज्यांनी चाळीस वर्ष फक्त घराणेशाही करत राजकारण केले. आम्ही चार…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी अवघ्या विश्वातील शक्तिशाली, अनुभवी आणि सक्षम सैन्य भारताचे आहे. भारतीय सेनेने आतापर्यंत देशांतर्गत आणि विदेशातही विविध लढाया व कारवायांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून नावलौकिक प्राप्त केला आहे. अशा महानतम सैन्याविषयी समाजातील प्रत्येक घटकाने अभिमान बाळगावा, सन्मान करावा. आपण ज्याही क्षेत्रात आहोत तिथे सर्वोत्तम कामगिरी करून देशाचा मान वाढवावा, असे आवाहन धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील एनसीसी अधिकारी तथा सहयोगी प्राध्यापक कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांनी केले. ते डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथील एमबीबीएस प्रथम व द्वितीय वर्षाच्या नवोदित डॉक्टरांसमोर ‘आर्मी डे’च्या अनुषंगाने बोलत होते. याप्रसंगी डॉ.नारायण आर्वीकर डायरेक्टर, डॉ.प्रशांत सोळंके अधिष्ठाता, डॉ.प्रशांत गुडेटी यासोबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी आदिशक्ती मुक्ताईच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या मुक्ताईनगर शहरामध्ये प्रत्येक घरामधुन देव पुजेनंतर निर्माल्य निघत असते. हे निर्माल्य कचरा गाडीमध्ये टाकू शकत नाही. ते नदीपत्रात टाकले जाऊन नदीपात्रात घाण होते. त्यामुळे निर्माल्य टाकण्याची सोय नसल्याने त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी तात्काळ निर्माल्य संकलन वाहन सुरु केल्यास प्रत्येक घरातील निर्माल्य जमा करण्यास मदत होईल. त्यामुळे निर्माल्य संकलनासाठी वाहन त्वरित सुरु करावे, अशा आशयाचे निवेदन शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर नगरपंचायत पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना यांना नुकतेच देण्यात आले. निवेदन देतांना तालुकाप्रमुख छोटू भोई, उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, गणेश टोंगे, पंकज राणे, राजेंद्र हिवराळे, जितेंद्र मुरहे आदी उपस्थित…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून कागदी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी मलकापूर तहसीलदार यांच्यामार्फत निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे मलकापूर तालुक्यातील वडोदा येथील सदानंद मोरे यांच्यासह मलकापूर तालुक्यातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम ३२५ अन्वये भारतामध्ये निवडणूक आयोगामार्फत पारदर्शक निवडणुका घेणे हे भारतीय व राज्य निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. मात्र, जगातील सर्वच प्रगत देशात कागदी मतपत्रिकेवरून निवडणुका घेतल्या जात असतांना भारतामध्ये मात्र इव्हीएमने निवडणुका घेतल्या जात आहेत. तसेच ८ ऑक्टोबर २०१३ च्या सर्वोच्च न्यायालय भारत सरकारच्या निर्णयानुसार इव्हीएमने पारदर्शी निवडणुका घेतल्या जाऊ शकत नाहीत. यासाठी भारतीय संविधानाची कलम ३२५ ची पूर्णप्रभावाने निवडणूक…
साईमत, यावल : प्रतिनिधी यावल पश्चिम वनक्षेत्रातील वाघझिरा तथा हरिपुरा वनपाल पथकाला यावल तालुक्यातील कोरपावली रस्त्यावर १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा आडजात लाकडाचा एकाच ठिकाणी मोठा साठा पथकाने पकडला आहे. याप्रकरणी वनपाल पथकाने पुढील कारवाई केल्याने तालुक्यातील अवैध सागवानी व अवैध आडजात लाकूड व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी, १८ जानेवारी २०२४ रोजी गोपनीय बातमीवरून वनपाल वाघझिरा तथा अतिरिक्त कार्यभार हरीपुरा व हरीपुरा वाघझिरा राउंड स्टाफसह यावल तालुक्यातील दहिगाव येथे दहिगाव-कोरपावली कच्च्या रस्त्यावर तपासणी केली. तेव्हा अवैध इंजायली लाकूड साठा आढळून आला. जप्त मुद्देमाल इमारती नग ९३ घ.मी. १२.२१५, पंचरास जळाऊ थप्पी ११- घ.मी.११५.५१२ माल किंमत १ लाख ३४…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, पक्ष बांधणी मजबूत करायची असेल तर कार्यकर्ता निष्ठावान आणि प्रामाणिक असला पाहिजे, पक्षाची ध्येय धोरणे त्याला माहिती असली पाहिजेत, त्याने ग्राउंड लेव्हलला काम केले पाहिजे, गावागावातील परिवाराशी त्याचे सौहार्दाचे नाते असले पाहिजे, सुख-दुःखाच्या वेळी तो मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असला पाहिजे. कार्यकर्ता घडण्यासाठी असे अभ्यास वर्ग अतिशय महत्त्वाचे असतात. त्यातून कार्यकर्ता घडतो, शिबिरात मिळालेली ही शिदोरी गावातील बुथरचना मजबूत करण्यासाठी वापरा,‘वन बूथ थर्टी युथ’ याप्रमाणे बुथ रचना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे यांनी केले. मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवशीय…