मलकापुरला वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकारांचा सन्मान

0
22

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर यांच्या संकल्पनेतून पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी मलकापूर शहरातील संपादकासह पत्रकारांना भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुशील मोरे, अजय सावळे, तालुका उपाध्यक्ष विलास तायडे तसेच ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, हिंदी-मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्री काटीकर-पाटील, ज्येष्ठ पत्रकार वीरसिंह राजपूत, जिल्हा महासचिव आतिश खराटे होते.

बाळासाहेब दामोदर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनप्रबोधन करून लोकशाही बळकट करणाऱ्या पत्रकार बांधवांचे भरीव कार्य देशासाठी खूप आवश्‍यक असल्याचे उद्गार काढले. कार्यक्रमात पत्रकार श्रीकृष्ण तायडे, सतीश दांडगे, नितीन पवार, गजानन ठोसर, गौरव खरे, संदीप सावजी, समाधान सुरवाडे, प्रा. प्रकाश थाटे, नारायण पानसरे, राजेश इंगळे, अजय टप, उल्हास शेगोकार, नथूजी हिवराळे यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here