येवतीला रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन

0
4

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील येवती येथे मुक्ताईनगर मतदार संघाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रस्ते डांबरीकरणाचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.

बोदवड ते सोनोटी -४७;५० लाख, लोणवाडी ते पिंपळगाव देवी-४७;५० लाख तसेच येवती ते कुऱ्हा हर्दो -५००;४३ लाख एकूण रक्कम ६.३८ कोटी रुपयांचे काम आ.चंद्रकांत पाटील यांनी मंजूर करून आपल्या मतदारसंघांमध्ये विकास पर्व घडवून आणण्याचे काम केले. अजूनही भरपूर कामे करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

बोदवड तालुक्याला कोरडेठाक ठेवले. आम्ही जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावांना पाण्याची सुव्यवस्था करून दिली. बोदवड तालुक्यात बोदवडसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केली. ज्यांनी चाळीस वर्ष फक्त घराणेशाही करत राजकारण केले. आम्ही चार वर्षांमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये किती विकास कामे केली, हे आगामी काळात जनता त्यांना दाखवून देईल. आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता आ.खडसेंना टोला लगावला.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन येवती येथील प्रा.हितेश पाटील, येवती ग्रामपंचायतीचे सदस्य आशिष सोनवणे यांनी केले. यावेळी बोदवड तालुका शिवसेनेचे उपाध्यक्ष दीपक माळी, बोदवड नगरपंचायतचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, हर्षल बडगुजर, दिनेश माळी, देवेंद्र खेवलकर, राजेश ननवाणी, सुनील बोरसे, मुक्ताईनगर विधानसभा प्रमुख सुनील पाटील, राजू शिंदे, संतोष पाटील, गजानन जंगले, जामठी विद्यालयाचे सचिव भगवान महाजन, अंबादास चौधरी, मुख्याध्यापक के.आर.पाटील, येवतीचे नागरिक आणि पंचक्रोशीतील समस्त शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here