ईव्हीएमऐवजी कागदी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्याव्या

0
2

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून कागदी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी मलकापूर तहसीलदार यांच्यामार्फत निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे मलकापूर तालुक्यातील वडोदा येथील सदानंद मोरे यांच्यासह मलकापूर तालुक्यातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

भारतीय संविधानाच्या कलम ३२५ अन्वये भारतामध्ये निवडणूक आयोगामार्फत पारदर्शक निवडणुका घेणे हे भारतीय व राज्य निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. मात्र, जगातील सर्वच प्रगत देशात कागदी मतपत्रिकेवरून निवडणुका घेतल्या जात असतांना भारतामध्ये मात्र इव्हीएमने निवडणुका घेतल्या जात आहेत. तसेच ८ ऑक्टोबर २०१३ च्या सर्वोच्च न्यायालय भारत सरकारच्या निर्णयानुसार इव्हीएमने पारदर्शी निवडणुका घेतल्या जाऊ शकत नाहीत. यासाठी भारतीय संविधानाची कलम ३२५ ची पूर्णप्रभावाने निवडणूक आयोगाने अंमलबजावणी करावी आणि जपान, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या प्रगत देशात निवडणुकामध्ये कधीच न वापरले जाणारे इव्हीएम भारतीय निवडणुकामध्ये वापरु नये. जगातील प्रगत देशात वापरले जाणाऱ्या कागदी मतपत्रिकांचा वापर करून भारतामध्ये निवडणुका घेतल्या जाव्यात. आपण जर नागरिकांच्या निवेदनाचा विचार न करता इव्हीएम वापरणे सुरुच ठेवल्यास तीव्र स्वरुपांचे आंदोलन करु, असे निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर सदानंद मोरे वडोदा, भाई राजेश इंगळे, संदीप भगत, गजानन झनके, दिलीप झनके, शांताराम इंगळे गिरणी, दशरथ इंगळे महापुरा, बाबुराव वाकोडे वडोदा, अरुण बोदडे, सुकदेव राणे, सुरेश रायपुरे, समाधान चव्हाण धरणगाव, उदेभान इंगळे गिरणी यांच्यासह तालुक्यातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here