साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीमार्फत नागरिकांनी सुका कचरा आणि ओला कचरा घंटागाडीत विलगीकरण करून टाकावा, अशा आशयाच्या पत्रकाचे वाटप करुन बक्षीस स्वरूपात ‘पैठणी साडी मिळवा’ असा शक्कल लढविणारा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, दुसरीकडे नगरपंचायत नागरिकांच्या भावनांशी खेळ का खेळत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील कचरा जमा करताना दोन प्रकारात नागरिकांकडून संकलित केला जातो. परंतु हा कचरा गाडीत एकत्र होऊन डम्पिंग ग्राउंडलाही एकत्रच खाली केला जात असल्याचे चित्र आहे. त्यात कुठलाच प्रकारचा विलगीकरणचा भाग नसून केवळ नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार नगरपंचायतीच्या प्रशासनाकडून केला जात आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का? कचरा विलगीकरणाच्या नावाखाली नुसती बॅनरबाजी करून…
Author: Sharad Bhalerao
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा व तालुका स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ‘राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे’ अंतर्गत १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’ आयोजित केला आहे. त्यात विविध उपक्रम साजरे करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, भुसावळचे शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी) उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा करून महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी राष्ट्रवादी पक्ष जोडला आहे. पक्षाकडून शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांसाठी पक्ष बांधणी, ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार, घरोघरी पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे नेते उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १२ वाजता महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीला विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राहुल पाटील, जिल्हा संघटक सागर पाटील, उपजिल्हाप्रमुख संदीप राठोड, तालुका संघटक गुणवंत शेलार, युवा सेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख शुभम राठोड, महिला आघाडी जिल्हासंघटक प्रतिभा पवार, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख अनिता शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषा महाजन, शहर प्रमुख…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ट्रेनिंग हॉलमध्ये ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’तर्फे २३ गावातील ४० बालगटाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेना मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नावरे उपस्थित होते. यावेळी वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे ३५ बालगटांना मुकुंद नन्नावरे यांच्या हस्ते खेळाचे साहित्य देण्यात आले. प्रास्ताविकात ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी मुलांच्या कार्यक्रमाबदल माहिती दिली. ही बैठक तालुक्यातील बालगटांना, विशेष अध्यक्ष आणि सचिव यांना सक्षम करण्यासाठी आयोजित केली होती. तसेच जितेंद्र गोरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. बालकांचे अधिकार, मुलांनी स्वतःचे संरक्षण कसे…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर गेल्या महिन्यात झालेल्या कापूस चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. कापूस वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन आणि ३५ हजार रुपयांचा सात क्विंटल कापूसही ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन जण फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. येथील सचिन शांताराम देशमुख यांच्या शेतातील पत्र्याचा शेडमध्ये साठविलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी रात्री पत्र्याचा शेड कापून चोरून नेला होता. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास लागून रवींद्र सुभाष मालचे, श्रावण उर्फ योगेश निवृत्ती पानगळे (दोन्ही रा.शिरसोली) यांना ताब्यात घेतले आहे. कापूस वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली बोलेरोही (क्र. एमएच १९ सीवाय ९९०८) ताब्यात घेऊन…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर दहावीच्या विद्यार्थिनींना कार्यशाळेत मिळालेले मार्गदर्शन आत्मविश्वास वाढविणारे असणार आहे. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून परीक्षेचे तंत्र अवगत होऊन विद्यार्थिनींना यशाची गुरुकिल्ली प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.श्याम पवार यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनींसाठी झालेल्या ‘परीक्षेला जाता जाता’ मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य गायत्री भदाणे होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विषय तज्ज्ञ उमेश मनोरे, ज्येष्ठ शिक्षिका कल्पना महंत, डी.बी.वाल्हे, जी.पी.हडपे, दीपककुमार पाटील, एन.बी.खंडारे, नीलिमा पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य भदाणे म्हणाल्या की, विद्यार्थिनींच्या बौद्धिक क्षमतेला वाव देण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे.ई.स्कुल येथे दहावीतील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. यावेळी संस्थेच्या चेअरमन ॲड. रोहिणी खडसे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगतातून शाळा व शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक पुरुषोत्तम महाजन, चंद्रशेखर बढे, मारुती बढे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, स्पर्धाही निकोप असावी. परिश्रमाशिवाय यश मिळत नाही, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य आर.पी.पाटील यांनी परीक्षेबाबत महत्त्वाच्या सूचना देऊन विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेचे आवाहन केले. प्रास्ताविकातून उपप्राचार्य जे.जे.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्य सांभाळून भयमुक्त परीक्षेला सामोरे जावे,…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील भाजपाच्या कार्यालयाबाहेर उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष यश संचेती यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांनी केलेल्या जातीवाचक वक्तव्याचा ‘जोडे मारो’ आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांनी एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली जात बदलल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विधानावर जोरदार टीका करत भारतीय संविधान आणि समाजाच्या आदर्शांच्या विरोधात असल्याचे मानले आहे. समाज बिघडविणाऱ्या आणि लोकांमध्ये मतभेद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा विचारांना विरोध करणार असल्याची ग्वाही आंदोलनातून दिली गेली. भारतीय राज्यघटनेच्या आदर्शांशी पूर्ण बांधिलकीचे प्रतिबिंब म्हणून आंदोलन महत्त्वाचे ठरले आहे. आंदोलनावेळी मोहन शर्मा, शंकरराव पाटील, अमृत बोबटकर, बबलू…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सानेगुरुजी पूर्व प्राथमिक बालविकास मंदिराचे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास अधिकारी योगिता चौधरी, प्रेमलता पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव ॲड.अशोक बाविस्कर, संचालक मंडळाचे सदस्य काका देशमुख, पत्रकार किरण पाटील, मगन पाटील, सानेगुरुजी कन्या हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे उपस्थित होत्या. बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका वैशाली महाजन यांच्यासह सर्व शिक्षिकांनी महिन्याभरापासून चिमुकल्यांची विविध गाणी बसविली. त्यांची रंगीत तालीमही करून घेतली. त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन संमेलन यशस्वी करून दाखविले. एवढेच न करता चिमुकल्यांसह महिला पालकांकरीता खेळाचे आयोजन करून स्वतः…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि दिशा गॅस एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना गॅसच्या सुरक्षेविषयी प्रशिक्षणाद्वारे धडे देण्यात आले. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्ये, ग्राहकांसाठी असलेल्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली. तसेच दिशा गॅस एजन्सीतर्फे विद्यार्थ्यांना गॅस वापराबाबत प्रशिक्षण व गॅस वापरतांना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अध्यक्षा स्मिता चंद्रात्रे, माजी अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड.भारती अग्रवाल, जिल्हा बँकिंग तथा सायबर प्रमुख विजय शुक्ल, जिल्हा सहसंघटक मकसूदभाई बोहरी, सक्रिय सदस्य तथा साने गुरुजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख, दिशा गॅस एजन्सीचे मॅनेजर दिनेश रेजा, लेखक-कवी तथा पत्रकार सुभाष पाटील…