धरणगावला ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’तर्फे २३ गावातील ४० चिमुकल्या गटाची बैठक

0
1

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

धरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ट्रेनिंग हॉलमध्ये ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’तर्फे २३ गावातील ४० बालगटाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेना मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नावरे उपस्थित होते. यावेळी वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे ३५ बालगटांना मुकुंद नन्नावरे यांच्या हस्ते खेळाचे साहित्य देण्यात आले.

प्रास्ताविकात ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी मुलांच्या कार्यक्रमाबदल माहिती दिली. ही बैठक तालुक्यातील बालगटांना, विशेष अध्यक्ष आणि सचिव यांना सक्षम करण्यासाठी आयोजित केली होती. तसेच जितेंद्र गोरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. बालकांचे अधिकार, मुलांनी स्वतःचे संरक्षण कसे केले पाहिजे, मुलांचे बौद्धिक विकास, शारीरिक विकास, गटाचे मूल्यांकन कसे केले पाहिजे, अश्‍या विविध विषयावर मार्गदर्शन केले.

तसेच या आठवड्यात बाल संरक्षण सप्ताह वर्ल्ड व्हिजन इंडियाकडून संपूर्ण तालुक्यात विविध विषयावर मुलांच्या स्वरक्षणासाठी जाणीव जागृती करण्यात आली. मुलांनी चित्राच्याद्वारे जनजागृती केली.

यावेळी ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’चे कर्मचारी रतीलाल वळवी, अंकिता मेश्राम, विजेश पवार, निखिल कुमार, स्वयंसेवक वैष्णवी पाटील, आरती पाटील, रचना जाधव, जितेंद्र पाटील, आर.ई.सी. सुपर वायझर मनीषा पाटील यांच्यासह धरणगाव तालुक्यातील २३ गावामधील बालगट, ३५ बाल गट सदस्य उपस्थित होते. बाल गटांतील मुलांनी वर्ल्ड व्हिजन इंडियाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here