साईमत, पारोळा : प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर सबगव्हाण गावाजवळ सुरू होणाऱ्या टोल आकारणीच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी एकजूट दाखवत एल्गार पुकारला आहे. यावेळी प्रशासनास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात विद्यमान आमदार, खासदार यांचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मागणीचे निवेदन तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना देण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघ, शरद पवार गट यांच्याकडूनही निवेदन देण्यात आले. याबाबत डॉ.योगेंद्र पवार यांनी सांगितले की, सोमवारी, ११ मार्चपासून सकाळी आठ वाजेपासून टोल आकारणी सुरू होणार आहे. त्यात ट्रक, बस यांना ३६५ रुपये मोजावे लागतील तर हलके वाणिज्य वाहने, मालवाहू वाहने यांना १७५ ते…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पहुर, ता.जामनेर : जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.येथे महिला दिनाचे औचित्य साधून पायोनियर सिडस् लि. कंपनीने महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव केला. अध्यक्षस्थानी ममता गांगुर्डे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेब पाटील, नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल देसले उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाला महिला गटासह गावातील १६० महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ.कोमल देसले यांनी ‘महिलांचे आजार व समस्या’वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नांद्रा आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक रवींद्र सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. त्यांनी ‘महिला दिनाचे महत्त्व’वर मार्गदर्शन केले. तसेच पायोनियर कंपनीचे कल्पेश पगारे यांनी महिला शेतकऱ्यांना कंपनी आणि…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील पूज्य साने गुरुजी वाचनालय आणि मोफत वाचनालयातर्फे ‘भिजकी वही’ अभिवाचनाचा प्रयोग अमळनेरला जुन्या टाऊन हॉल येथे महिला दिनाच्या पूर्व संध्येला हा कार्यक्रम पार पडला. जळगावातील परिवर्तन संस्थेच्या टिमने अभिवाचनाचा अप्रतिम प्रयोग सादर केला. कवी, लेखक, जे.जे. आर्टचे कुंचलाकार अरुण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या ‘भिजकी वही’ ह्या कवितासंग्रहावर शंभू पाटील तथा खान्देशची शान शंभू अण्णा यांच्या सुमधुर, कानाला तृप्त करणाऱ्या भाषा शैलीत अभिवाचनाचा कार्यक्रम सादर केला. ह्या प्रयोगाने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘भिजकी वही’ कवितेच्या दालनाने महिला जीवनाची व्यथा सुंदररित्या सादर केली आहे. अरुण कोल्हटकर ह्या अवलियाने महिलांच्या जीवनाचे अतिसूक्ष्म वर्णन यात आहे. लैला व मजनु यात…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी मुलींमध्ये आरोग्यविषयक जे बदल होतात, ते महिला, पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. तसेच आईने आपल्या मुलींशी मैत्रीण म्हणून भूमिका पार पाडावी. जेणेकरून मुली सर्व समस्या आईजवळ सहजतेने बोलतील. त्यातून मुलींच्या समस्या सोडविल्या जातील. यासोबत मुलींना सकस आहार द्यावा, शालेय विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवावे. त्यातच निरोगी आरोग्य सामावले आहे. निरोगी आरोग्य हीच सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन गोरगावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा साळुंखे-बोरसे यांनी केले. त्या चोपडा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. सविता जाधव होत्या. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी शांतता, प्रेम अन् संपत्ती वाचविण्यासाठी महत्त्वकांक्षेपासून दूर रहावे, असे निरुपण आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी यांनी केले. मुक्ताईनगर येथे शनिवारी, ९ मार्च रोजी आयोजित प्रवचन मालिकेत ‘दूर से ही प्रणाम’ विषयावर बोलत होते. आचार्यांनी शांतता, प्रेम आणि संपत्ती वाचविण्यासाठी महत्त्वकांक्षेपासून दूर रहा यासह पाच तत्त्वांपासून दूर राहण्याविषयी सांगितले. पहिले तत्त्व ऍम्बिशन. खूप महत्त्वकांक्षा, जीवन आनंद ठेवायचे असेल तर महत्त्वकांक्षांना टाळा, ब्रॅण्डेड गोष्टींवर जगणे ही आपली सर्वात मोठी महत्त्वकांक्षा आहे. महत्त्वकांक्षा टाळण्यासाठी आपल्या घरात ब्रॅण्डेड वस्तू वापरण्याचा आग्रह सोडून द्या. दुसरे तत्त्व एग्रेशन. आक्रमकता, तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे प्रेम मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमचे मन संतुलित ठेवावे लागेल. रणांगण असल्याप्रमाणे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्वरित अद्ययावत ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील धार्मिकते बरोबर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे पू. साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रास एक लाख अकरा हजार रुपयांचा भव्य डिजिटल स्क्रीन भेट देण्यात आला. स्क्रीनचे उद्घाटन जळगावच्या परिवर्तन संस्थेचे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, पू. साने गुरुजी ग्रंथालय तथा मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.महाले म्हणाले की, खान्देशातील विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान झटपट मिळावे. त्यांचा स्पर्धा परीक्षेतील टक्का अधिकाधिक वाढावा, यासाठी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव मंदिरात परंपरेप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त श्री लघुरुद्र महापूजा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उबाठा गटाचे शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार सपत्नीक महापूजेचे यजमान होते. गणपती पूजन, पुण्याहवाचन होऊन श्री मंगळेश्वर महादेवाची विधीवत मंत्रोच्चारात पूजा होऊन लघुरुद्राभिषेक झाला. पुरोहितांनी भगवान महादेवांची स्तुतीपर भावगीते, भक्तिगीतेही गायली. मुख्य पुरोहित केशव पुराणिक होते. त्यांना पुरोहित सुनील मांडे, सारंग पाठक, शुभम वैष्णव, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, अक्षय जोशी, मंदार कुलकर्णी, व्यंकटेश कळवे, मयूर राव, मिलिंद उपासनी यांनी सहकार्य केले. यावेळी विशेष महाआरती झाली. मंदिर परिसरात शिवपरिवाराच्या प्रतिमेची आकर्षक सजावट केली होती. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स अँड के. के.सी.कॉमर्स कॉलेजमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती, युवती सभा आणि कायदेशीर जागरूकता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उद्घाटक आणि प्रमुख वक्त्या म्हणून योगाचार्य सीमा शर्मा यांना आमंत्रित केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अजय काटे उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. कला खापर्डे, अंतर्गत तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ. नयना पाटील, कायदेशीर जागरूकता समिती प्रमुख प्रा. वैशाली पाटील, सर्व समिती सदस्य, महाविद्यालयातील इतर प्राध्यापिका, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी योगाचार्या सीमा शर्मा यांनी काही महत्त्वपूर्ण योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच युवतीकडून योगाभ्यास करून…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोरखेडा येथे भील समाज मंडळातर्फे शुक्रवारी, ८ मार्च रोजी आदिवासी नायक महापराक्रमी वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राचार्य डॉ.मिलिंद बागूल होते. यानिमित्त आदिवासी भिल्ल समाजाला नवी दिशा आणि ऊर्जा मिळावी, यासाठी खान्देशातील साहित्यिक तथा भिल्ल बोलीचे अभ्यासक सुनील गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित केले होते. भिल्ल बोलीतून साधलेल्या संवादाने उपस्थित महिला भारावून गेल्या होत्या. सभेनंतर वीर एकलव्य यांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी विजयकुमार मौर्य, अनिल सुरळकर, सुनील सोनवणे, बापूराव पानपाटील, बोरखेडाचे…
साईमत, विदगाव/जळगाव : प्रतिनिधी शेतकरी व जनतेच्या हिताचा विचार करून आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच त्यांच्यासाठी झटत आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव न बाळगता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच कार्यकर्ते आणि जनता माझ्या सोबत आहे. मतदारसंघातील शेतीचे व वर्दळीच्या वाहतुकीचे रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाला आपण प्राधान्य दिले आहे. उर्वरित स्मशानभूमी बांधकाम व स्मशानभूमी पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. ते अवचित हनुमान मंदिर सभागृहात तालुक्यातील, नांद्रा, आवार, तुरखेडा, धामणगाव आणि विदगाव या गावांमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री ना.…