साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील हॉटेल दयानंद जवळील मुख्य पूल गेल्या दीड महिन्यांपासून पाडण्यात सुरुवात झाली आहे. याठिकाणी नव्याने पूल उभारणी सुरू असल्याने घाट रोड परिसरातील अनेक ठिकाणच्या नागरिकांना यामुळे गैरसोय होत आहे. चौधरी वाडा, पावर हाऊस, सुवर्णाताई नगर, गोपाळ पुरा भागातील नागरिकांना त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या नूतनीकरणासाठी अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांनी स्वखर्चातून नदीतून पर्यायी रस्त्याची उभारणी केली आहे. गोपाळपुरा चौधरी वाड्यापासून अमरधामपर्यंत नदीतून कच्चा रस्ता टाकल्याने नदी पलीकडील नागरिकांचा मोठा फेरा वाचला आहे. पुलाचे नूतनीकरण सुरू असल्याने वाहनधारकांना तसेच परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याची यवतमाळ शहरातील काही बुरसटलेल्या विचारांच्या समाजकंटकांनी शाई फेकून विटंबना केली. यामुळे समस्त दलित, वंचित, बहुजन, फुले, शाहु, आंबेडकर प्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याने असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने अशा समाजकंटकांना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा द्यावी. समाजकंटकांना लवकर अटक न झाल्यास लोकांचा उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक एकोपा आणि वातावरण बिघडू न देणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी समाजकंटकांना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अशा कृत्याचा नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांच्या दालनात जाहीर निषेध करण्यात…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी, २३ एप्रिल रोजी पहाटे ४ ते सकाळी ६.२० या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान जळगावचे माजी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, बांधकाम व्यावसायिक इंजि.राहुल सोनवणे, ॲड. अमित सोनवणे, सूर्या सोनवणे यांच्या हस्ते विशेष पंचामृत महापूजा करण्यात आली. प्रारंभी सर्व मुख्य यजमानांनी गणेशपूजन केले. त्यानंतर मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर पंचामृत करण्यात आला. त्यानंतर विधीवत हनुमान जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा पठण तसेच भाविकांकडून पुष्पवृष्टी होऊन पाळणा हलवत भक्तिमय व मंगलमय वातावरणात ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘संकटमोचन हनुमान की जय’, असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरवासीयांना १८ ते २० दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईमुळे नागरिकांना थंडगार ॲक्वा पाण्याचे जार खरेदी करून आपली तृष्णा भागवावी लागत आहे. त्यामुळे शहरवासीयांची मदार पाण्याच्या ‘जार’वर अवलंबुन असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच विवाह व इतर सोहळ्यात थंडगार पाण्याच्या ‘जार’ची मागणी होत आहे. मात्र, ‘जार’मधील थंडगार पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने पाण्याचा हा धंदा सद्यस्थितीत चांगलाच जोर धरू लागला असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. वरणगाव नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासीयांना १८ ते २० दिवसापर्यंत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. अशा पाणीटंचाईच्या बाबतीत…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शेती करण्यासाठी प्रत्येकात सर्वगुण असावे. इलेक्ट्रीशयनपासून सर्व काही करावे लागते. भविष्यात मजूरांची टंचाई निर्माण होईल. मात्र, त्यावर शाश्वत सोल्यूशन काढले पाहिजे. गुणवत्ता, ॲग्रोनामिक सेवेत जैन इरिगेशनमध्ये शेतकऱ्यांचा विचार केला जातो. ते कुटुंबाप्रमाणेच समजतात, असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केले. भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ अधिवेशनची सोमवारी जैन हिल्सला सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या सुसंवादात, शेतीत प्रत्येक दिवशी समस्या आहे, मात्र सोल्यूशन शोधावे लागेल, एकच चावी आहे ती म्हणजे जैन इरिगेशन. बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे. शेती करावीच लागेल नाहीतर खाणार काय? शेती हा असा व्यवसाय असून ती करावीच लागेल…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील केशवनगरमधील दीपक आधार चौधरी (एसटी कंडक्टर), हरीश चौधरी, गिरीश चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या अस्थींचे विसर्जन न करता त्या रक्षेचा उपयोग त्यांच्या नावाने टेकडीवर वडाचे रोप लावून करण्यात आला. त्या माध्यमातून त्यांची स्मृती भविष्यात टिकून राहील. उपक्रमाद्वारे टेकडी ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील लोकांना नवीन उपक्रमासाठी अशा माध्यमातून आव्हान केले आहे. आपले मृत नातेवाईकांची रक्षा इकडे तिकडे किंवा जलाशयात न टाकता टेकडीवर आणून त्या व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ एक झाड लावू शकता टेकडी ग्रुप आपणास सहकार्य करेल, असे आव्हान सदस्यांनी केले आहे. टेकडी ग्रुपचे सदस्य आशिष चौधरी यांनी सांगितले की, माझ्या आजोबांचे स्मरण आता कायम आमच्या स्मरणात राहील. याप्रसंगी…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार सोमवारी, २२ एप्रिल रोजी खरीप नियोजन सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार गिरीश वखारे होते. सभेत मुक्ताईनगर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी धिरज हिवराळे यांनी खरीप हंगाम २०२४ नियोजनाचे सादरीकरण केले. आगामी खरीप हंगाम नियोजनाकरीता तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख यांची पूर्वतयारी तसेच खत बियाणे व कीटनाशक यांच्या पुरवठ्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. मागीलवर्षीच्या प्रगतीबाबत व पुढील वर्षाच्या नियोजनाकरिता सभेत तहसीलदार वखारे यांनी सर्व विभाग प्रमुखांना मार्गदर्शन केले. सभेचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी फळबाग लागवड व सेंद्रिय…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील श्रीराम मंदिरामधील विहिरीवरील असलेली पाण्याची मोटर खराब झाली होती. त्यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी तिला वर काढण्यात आले होते. मात्र, श्रीराम मंदिराचे पुजारी सूरदास महाराज यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना चोरांनी रात्री मोटर चोरून नेली असल्याचे सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार सूरदास महाराज यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या आदेशाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर श्रीराम मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करुन आरोपीला दोन तासात अटक केली आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पाण्याची मोटर साधारण पाच हॉर्स पॉवरची…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील पवार वाडीतील विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोरील मुख्य चेंबरचे काम करताना ठेकेदाराने जुन्या रस्त्याच्या लेव्हलने मुख्य चेंबर बनविले आहे. त्यामुळे आता नवीन रस्ता झाल्यानंतर जुन्या आणि नव्या रस्त्यामध्ये जवळपास एक फुटाचे खड्डे झाले आहे. त्यात पडून वाहनधारकांना दुखापत होत असल्याने चाळीसगाव नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवीन झालेल्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात रयत सेनेच्यावतीने वृक्ष लावून नगरपरिषदेचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. येत्या आठवड्याभरात मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबरची उंची वाढविण्यात यावी, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन करण्याचा इशारा रयत सेनेच्यावतीने देण्यात आला आहे. चाळीसगाव नगर परिषदेच्यावतीने प्रभाग क्रमांक १० मध्ये मलनिसारण योजनेचे काम म्हणजेच भुयारी गटारीचे कामे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिमणपुरी आणि पिंपळे खु. ही दोन्ही गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील लोकसंख्या सुमारे २१०० आहे. गावात शेतकऱ्यांच्या जनावरांची संख्याही भरपूर आहे. अमळनेर तालुक्यात १२ रोजी झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे येथील विजेचे खांब उन्मळून आडवे झाले. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. वीज नसल्याने ग्रामस्थांना पाणी मिळणे कठीण झाले होते. अशावेळी गावाच्या महिला सरपंच वर्षा पाटील व त्यांचे पती युवराज पाटील यांनी आपल्या शेतातील विहिरीचे पाणी त्यांनी गावालगत आपल्या शेतात पाइपलाइनने पोहचविले. त्या विहिरीतील पाणी मोटारीने टँकरने भरून गाव विहिरीत टाकले जाते. दिवसाला चार टँकर भरले जातात. तीन ते चार दिवसात सकाळी-सायंकाळी गावात टप्याटप्याने पाणी…