साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा परीट (धोबी) सेवा मंडळ, महाराष्ट्र राज्य धोबी समाज सर्वभाषिक महासंघ जिल्हा शाखा, जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळ, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, जळगाव जिल्हा लॉड्री व्यवसायिक असोसिएशन, संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था, डी.पी.एल.धोबी समाज युवा संघटन, जळगाव शहर परदेशी धोबी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात धोबी समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी, १९ मे रोजी केले होते. मेळाव्यात ३१३ युवक-युवतींनी परिचय करुन दिला. अध्यक्षस्थानी जिल्हा धोबी समाज मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुरत महानगरपालिकेचे उप अभियंता सृष्टी महाले, नगरसेवक गणेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विशाल…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील बालकांमध्ये नाट्यसंस्कार रुजून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा, म्हणून उन्हाळी सुट्टीमध्ये बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखा तसेच नाट्यरंग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालरंग नाट्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. पी.व्ही.आर.सिनेमाच्या भरारी फाऊंडेशनच्या सभागृहात सुरु असलेल्या शिबिरात पालक-विद्यार्थी संवाद कार्यशाळा झाली. त्यात खेळाच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थी यातील सुसंवाद तसेच ‘आमचेही म्हणणे ऐकून घ्या’ या सदरात पालक व विद्यार्थी या दोघांच्याही भूमिका जाणून घेण्यात आल्या. कार्यशाळेला बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह तसेच खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाट्यरंगच्या अध्यक्षा दिशा ठाकूर यांच्यासह अमोल ठाकूर, नाट्यरंगचे कलावंत, शिबिरार्थी, पालक यांचा मोठ्या…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा मूळजी जेठा महाविद्यालयातील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये नुकताच समारोप झाला. शिबिरात १९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून हास्य जत्रा फेम तथा मू.जे. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.हेमंत पाटील, महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ.जगदीप बोरसे, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, आंतर राष्ट्रीय सायकलिंग खेळाडू आकांक्षा गोरख म्हेत्रे आणि शिबिर प्रमुख प्रा.रणजित पाटील उपस्थित होते. यावेळी प्रा.रणजित पाटील यांनी अहवाल वाचन केले. याप्रसंगी प्रा. हेमंत पाटील व डॉ. जगदीप बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी धाराशिव येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मिरवणूक शंभू प्रेमींच्यावतीने कुठलाही गोंधळ न घालता मोठ्या उत्साहात जयंतीची मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या शंभू प्रेमींवर पोलिसानी अमानुष लाठीचार्ज करून निरपराध शंभु प्रेमींना झोडपून काढले. त्यामुळे त्यात अनेक शंभूप्रेमी जखमी झाले आहेत. त्यामुळे शिवशंभू बांधवांवर अन्याय झाला आहे. निरपराध शिवशंभू बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याला जबाबदार धरून डीवायएसपी स्वप्निल राठोड यांना ४८ तासात बडतर्फ करा, अन्यथा चाळीसगावात उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवशंभू प्रेमी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री यांना तहसिलदारद्वारा १७ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. निवेदनाच्या प्रती अपर पोलीस अधीक्षक भाग…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर सरकारला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत काही कर्मचारी नेमावे लागतात. त्यात प्रीसाईडिंग अधिकारी, तीन मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस, एनसीसी केडर, स्वच्छता कर्मचारी तसेच मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांची लहान मुले सांभाळण्यासाठी उभारण्यात आलेल्या बालसंगोपन केंद्रासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका नियुक्त केलेले होते. त्यात त्यांना खालीलप्रमाणे मानधन एक, दोन, तीन दिवसाकरता देण्यात आले होते. त्यात प्रीसाईडिंग अधिकारी ३५० रुपये/प्रतिदिन, मतदान अधिकारी यांना २५० रुपये/प्रतिदिन, शिपाई २०० रुपये, पोलीस २५० रुपये अशा तऱ्हेने मानधन देण्यात आले. परंतु बालसंगोपन केंद्रासाठी कार्यरत आशा वर्कर, ग्रामपंचायत शिपाई, स्वच्छता कर्मचारी यांना १२/१२…
साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर चिनावल गावात एका ट्रॅक्टर व दुचाकी चालकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. त्यानंतर यादरम्यान काही जणांनी चिनावल येथे महादेव वाडा, महाजन वाडा आणि वाणगल्ली भागात दगडफेक केली. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. तसेच एका महिलेचे मंगळसूत्रही लांबविण्यात आले. ही घटना शुक्रवारी १७ मे रोजी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चिनावल गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. परिणामी गावात तणावपूर्ण शांतता आहे. सद्यस्थितीला चिनावल गावात १८ मे रोजी १ वाजेपासून ते २० मे २०२४ रोजी १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपींसह १५० ते २०० यांच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि अमळनेर तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मंगळ कृषी जनजागृती रथाची सुरुवात १७ रोजी सकाळी १० वाजता मंगळ ग्रह मंदिरातून करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी हिरवा झेंडा दाखविला. मंदिराचे पुरोहित गणेश जोशी यांनी रथाचे विधिवत पूजन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीष कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, ग्रिनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, कृषी सहाय्यक महेंद्र पवार, चेतन चौधरी, निलेश पाटील आदी उपस्थित होते.रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील १५४ गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांमध्ये शेती निविष्ठा खरेदी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना घातल्याने समस्त महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान असल्याने चाळीसगाव येथे तहसील कार्यालयासमोर शिवप्रेमी संघटनेच्यावतीने शुक्रवारी १७ रोजी प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडोमारो’ आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनात लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, प्रदीप देशमुख, प्रा.चंद्रकांत ठाकरे, प्रदीप मराठे, खुशाल पाटील, मुकुंद पवार, पी.एन.पाटील, ज्ञानेश्वर सोनार, भरत नवले, प्रवीण पाटील, सुधीर पाटील, दीपक देशमुख, किरण पवार, दिलीप बिराजदार, जितेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर कोल्हे, प्रदीप पाटील, सुनील चव्हाण, अविनाश काकडे, मंगेश साबळे, शिवाजी गवळी, मनोज…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी अकोला येथील लोकसभा प्रचारादरम्यान ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा मिळाल्याचा राग अनावर होऊन काँग्रेसचा साजिद पठाण याने ॲड. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी संस्थापक-अध्यक्ष यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मलकापूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लिम समाजाने ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना भर घोसत पाठिंबा देऊन अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतले असल्याचे चित्र अकोला लोकसभा क्षेत्रात पहायला मिळाले. याच गोष्टीने जिव्हारी लागून तेथील काँग्रेस नेते साजिदखा पठाण याने बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गरड ओकली आहे. तसेच त्यांच्या…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील पेटंट प्राप्त संगणक विभागाच्या सहाय्यक प्रा.आरती पाटील, व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक आर. पी. जैस्वाल यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्यांना भारत सरकारतर्फे मिळालेल्या पेटंटबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. आरती पाटील आणि आर. पी. जैस्वाल यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयातर्फे ‘लेक्सिकल ॲनालिसिस कंपाइलर डिव्हाइस’ यासंदर्भात डिझाईन निर्मिती केल्यामुळे पेटंट प्राप्त झाले आहेफ तसेच सहाय्यक प्राध्यापक आरती पाटील यांचे ‘डिजिटल वर्ल्ड’ या पुस्तकासाठी ‘सुधारित ब्लॉकचेन सुरक्षिततेची पद्धत’ अंतर्गत ‘Scopus indexed…