साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
धाराशिव येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मिरवणूक शंभू प्रेमींच्यावतीने कुठलाही गोंधळ न घालता मोठ्या उत्साहात जयंतीची मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत सहभागी झालेल्या शंभू प्रेमींवर पोलिसानी अमानुष लाठीचार्ज करून निरपराध शंभु प्रेमींना झोडपून काढले. त्यामुळे त्यात अनेक शंभूप्रेमी जखमी झाले आहेत. त्यामुळे शिवशंभू बांधवांवर अन्याय झाला आहे. निरपराध शिवशंभू बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याला जबाबदार धरून डीवायएसपी स्वप्निल राठोड यांना ४८ तासात बडतर्फ करा, अन्यथा चाळीसगावात उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवशंभू प्रेमी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री यांना तहसिलदारद्वारा १७ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. निवेदनाच्या प्रती अपर पोलीस अधीक्षक भाग चाळीसगाव, सहा पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शिवशंभु प्रेमी संघटनेचे गणेश पवार, लक्ष्मण शिरसाठ, प्रा.चंद्रकांत ठाकरे, राजेंद्र पाटील, खुशाल पाटील, प्रदीप मराठे, ज्ञानेश्वर कोल्हे, प्रदीप देशमुख, मुकुंद पवार, पी.एन.पाटील, ज्ञानेश्वर सोनार, भरत नवले, प्रवीण पाटील, सुधीर पाटील, दीपक देशमुख, किरण पवार, दिलीप बिराजदार, विनोद पाटील, सुनील चव्हाण, अविनाश काकडे, मंगेश वाबळे, शिवाजी गवळी, मनोज भोसले, महेंद्र पाटील, गोपाल पाटील, विजय देशमुख, मनोहर सूर्यवंशी, आबासाहेब सोनवणे, संभाजी सोनवणे, कारभारी बनकर, अण्णासाहेब धुमाळ, बाळासाहेब बारकू पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.