धोबी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात ३१३ युवक-युवतींनी दिला परिचय

0
4

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा परीट (धोबी) सेवा मंडळ, महाराष्ट्र राज्य धोबी समाज सर्वभाषिक महासंघ जिल्हा शाखा, जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळ, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन, जळगाव जिल्हा लॉड्री व्यवसायिक असोसिएशन, संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था, डी.पी.एल.धोबी समाज युवा संघटन, जळगाव शहर परदेशी धोबी समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात धोबी समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी, १९ मे रोजी केले होते. मेळाव्यात ३१३ युवक-युवतींनी परिचय करुन दिला. अध्यक्षस्थानी जिल्हा धोबी समाज मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे होते.

मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुरत महानगरपालिकेचे उप अभियंता सृष्टी महाले, नगरसेवक गणेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विशाल भोळे, अरुण राऊत, सुरेश ठाकरे, भूषण सोनवणे, शंकर निंबाळकर, अमर परदेशी, रमेश लिंगायत, भास्करराव वाघ, दीपक बाविस्कर, शाम वाघ, पूनमचंद चव्हाण नंदुरबार, राजेंद्र सोनवणे, राजेश चंदनकर अकोला, संदीप सुरडकर यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. वधू-वर परिचय मेळाव्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई, अकोला, वर्धा, नवापूर, मध्यप्रदेश, गुजरात येथील युवक-युवती यांनी परिचय करून दिला.

यशस्वीतेसाठी संदीप सोनवणे, विजय सोनवणे, कैलास सोनवणे, जयंत सोनवणे, प्रशांत मांडोळे, विनोद शिरसाळे, चंद्रकांत वाघ, सोपान रायपूरे, किशोर शिरसाळे, संतोष बेडीस्कर, गणेश सपके, किशोर बोरसे, जगन्नाथ बाविस्कर, पंकज महाले, मनोज वाघ, प्रवीण आढाव, आबा केणे, सतीश वाघ यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी जिल्ह्यातील तालुका समाज अध्यक्ष, सचिव यांनी अर्ज नोंदणीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश जाधव तर युवक-युवती परिचय संचलन करुणा महाले, गणेश बच्छाव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here