Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजवावे. त्यांचा सर्वांगीण विकास करावा, त्यातून आदर्श नागरिक घडेल, असे प्रतिपादन मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेरचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केले. येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पू. साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर आयोजित दोन दिवशी करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेरचे डीवायएसपी सुनील नंदवाडकर, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस आर चौधरी, एम.एम.कॉलेज पाचोरा येथील प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी, साने गुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ उपस्थित होते. यावेळी डीवायएसपी नंदवाडकर, डॉ. एस.आर.चौधरी, डॉ.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथून जवळील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील मल्हारगडावरील पुरातन पाण्याच्या कोरीव दगडी टाक्यांची सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने मोहीम घेऊन त्यातील मोठमोठाले गवत गाळ दगड काढून साफसफाई स्वच्छता करण्यात आली. आता काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार असल्याने स्वच्छ केलेल्या टाक्यांमध्ये यावर्षी पडणाऱ्या पावसाचे चांगले पाणी साचेल. तसेच त्यातील गाळ काढण्यात आल्याने पाण्याची क्षमता वाढेल. या उद्देशाने ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली. पाण्याच्या साठ्यामुळे वर्षभर परिसरातील वन्यप्राणी तसेच किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमी आणि पर्यटकांना पिण्यासाठी येथे मुबलक पाणी उपलब्ध होते. म्हणूनच हा उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्यावतीने राबविण्यात आला. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, ॲड. रणजीत पाटील, मोहीम प्रमुख सचिन पाटील, गजानन…

Read More

साईमत, अडावद, ता. चोपडा : वार्ताहर वाढत्या महागाईमुळे लग्न समारंभ दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत आहे. अशातच सर्व रूढी-परंपरांना फाटा देत अडावद येथे अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला. यामुळे नातेवाईकांचा वेळ व पैसा वाचला आहे. त्यामुळे वधु व वरांचे माता-पिता, त्यांचे नातेवाईक खरोखरच कौतुकास्पद पात्र ठरले आहे. त्यांचे कार्य येणाऱ्या काळासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अडावद येथील रहिवासी शेख एजाजोद्दीन निजामोद्दीन यांची सुकन्या नूजहत जहाँचा साखरपुडा साकळी, ता. यावल येथील रहिवासी कलीम खान अब्दुल्ला खान यांचा सुपुत्र तौसिफ खान याच्याशी बुधवारी, २२ मे रोजी नियोजित होता. म्हणून साखरपुड्याला फारच निवडक लोक कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. जवळीक असलेल्या काहींनी साखरपुड्याच्या कार्यक्रमात लग्नच का…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरात ठाकरे गटाला पुन्हा एकदा ‘खिंडार’ पडले आहे. शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांनी सत्कार केला. त्यात प्रामुख्याने परेश नाईक, कैलास इंगळे, हरी चौधरी, आबा चौधरी, गणेश चौधरी, मयूर जाधव, सुदर्शन भागवत, अजय चौधरी, योगेश मांडगे, सुलतान बागवान, तेजेंद्र चौधरी, सागर मांडगे, चेतन अहिरराव, करण चित्ते, प्रशांत जगताप, विकास मोरावकर, अक्षय बारड आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, मुकुंद धनवडे, सागर पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, पप्पू भावे, अभिजीत पाटील, वाल्मीक पाटील,…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत ज्ञानार्जनावरच भर द्यावा. आपल्या आई-वडिलांचे, महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांनी केले. येथील संत मुक्ताबाई महाविद्यालयात आयोजित बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे व्यवस्थापन समिती सदस्य भरत पाटील (नगरसेवक, बोदवड) उपस्थित होते. प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील म्हणाले की, महाविद्यालयातील सुख सुविधा तसेच उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. जसे की डिजिटल क्लासरूम फॅसिलिटी, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व सायन्स विभागातील मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स या प्रयोगशाळा व इतर अद्ययावत साहित्य उपलब्ध आहेत. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे या धर्तीवरील सुखसुविधा…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर नवजात अर्भक मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून जीवे ठार मारत पुरावे नष्ट करणाऱ्या नराधम बापाला तात्काळ अटक केल्याबद्दल पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह त्यांच्या पथकाचा जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्‍वर रेड्डी यांनी नुकताच सन्मान केला. पहूर येथून जवळील वाकोद येथे गेल्या १२ सप्टेंबर २०२३ रोजी गोकुळ गोटीराम जाधव या ३० वर्षीय तरुणाने त्याची पत्नी भुलाबाई गोकुळ जाधव हिला झालेले नवजात बाळ अर्भक मुलगी असल्याने तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने स्वतः जवळची तंबाखू तिच्या तोंडात भरून तिला झोक्यात टाकून जीवे मारून टाकले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने समाजमन हळहळले होते. ही घटना कोणालाही माहिती होऊ…

Read More

साईमत, रावेर : प्रतिनिधी सध्या सुरू असलेल्या भयंकर उन्हाळ्यात तापमानाने पंचेचाळीशी ओलांडली असल्याने नियमानुसार केळी उत्पादकांना फळ पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, राज्यात लागू केलेल्या हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतील केळी पिकासाठी लागू केलेल्या प्रमाणकांमध्ये लागू असलेल्या जादा तापमान ह्या निकषात असलेल्या १ ते ३१ मे दरम्यान ५ दिवस तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्यास हेक्टरी ४३,५०० रुपेय देय आहेत. त्या अनुषंगाने अलीकडेच जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावलसह अन्य सर्व तालुक्यात या कालावधीत तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे. निवेदनात…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा शिवारातील गट नंबर २७७/२ मधील सोनीनगरात एका ठिकाणी चार विद्युत खांबावर पथदिवे नसल्याने काहींनी स्वखर्चाने पथदिवे लावले तर काही ठिकाणी पथदिवेच नाही. याबाबत मनपाचे एलईडी विद्युत विभागाचे कर्मचारी सोनी नगरात आल्यावर जाब विचारताच त्यांनी सांगितले की, त्याला पाचवी फेजतार लागत असल्याने जर नागरिकांनी पैसा जमा करून फेजतार आणल्यास तो लावण्याचा सल्ला दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिकांकडून मनपा विविध सुविधांसाठी कर आकारते. मात्र, सुविधाच मिळत नसल्याने याबाबत कैफियत कुणाकडे मांडावी पथदिवे नसल्याने परिसरात अंधार असतो. रात्री बे रात्री सर्प निघतात. तसेच भुरटे चोर अंधाऱ्याचा फायदा घेत असतात. मनपाकडे वारंवार सांगुनही दुर्लक्ष केले जात आहे. सोनी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर अशोक सोनवणे (वय ३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ, जळगाव) या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना २२ मे रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली होती. यामुळे नातेवाईकांनी गुरुवारी, २३ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी शनीपेठ पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. किशोर सोनवणे हा बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ येथे परिवारासह वास्तव्याला आहे. किशोरचा काही जणांसोबत जुना वाद होता. त्या जुन्या वादातून २२ मे रोजी रात्री हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे याच्यावर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली येथे राहणाऱ्या तथा कानळदा येथे तलाठी असणाऱ्या व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, २२ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. चोरट्यांनी ५ तोळे सोन्यासह ५० हजारांची लांबविले असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी आकाश विजय काळे (वय २८, रा. अशोक नगर, शिरसोली प्र. न., ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. शिरसोली येथे आकाश काळे हे आईसह राहतात. त्यांची आई सध्या देवदर्शनासाठी उत्तर भारतात गेल्या आहेत. आकाश काळे हे कानळदा येथे तलाठी आहे. २२ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या…

Read More