साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर भडगाव तालुक्यातील वाडे येथील सूर्यकांत रामदास चौधरी यांच्या शेतात बुधवारी, १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक वीज कोसळून बैल ठार झाल्याची घटना घडली आहे. बैल मृत्यूमुखी पडल्याने त्यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाडे येथील शेतकरी सूर्यकांत चौधरी यांनी निंबाच्या झाडाखाली बैल जोडी बांधली होती. त्यातील एका बैलावर वीज पडल्याने बैल जागीच मृत्यूमुखी पडला. यावेळी त्यांनी समोर असणाऱ्या पत्राच्या शेडमध्ये आडोशाला बसले होते. तेव्हा मुलाबाळाप्रमाणे जपलेल्या बैलाचा स्वतःच्या डोळ्यादेखत वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढले आहे. सध्या मशागतीचे कामे सुरु असताना बैल मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचा शोक अनावर झाला…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या सहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत खून केल्याची घटना घडली आहे. ह्या गंभीर घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, यासाठी जामनेर तालुका आदिवासी संघटनेतर्फे मोर्चा काढून तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सुभाष उमाजी भील (वय ३५, रा.चिंचखेडा) या संशयित आरोपीने ११ जून रोजी सायंकाळच्या सुमारास एका सहा वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार करत तिचा खून केल्याची घटना घडली. २४ तास उलटूनही संशयित आरोपी अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे तात्काळ आरोपीला शोधून अटक करावी…
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील बोरावल खुर्द, भालशिव पिंप्री, टाकरखेडा आणि बोरावल बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विविध विकास कामासंदर्भात आणि दैनंदिन साफसफाई संदर्भात यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित ग्रामसेवकाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गु्रप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात केव्हा कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला उपस्थित राहतात किंवा नाही? ग्रामसेवक मुख्यालयाच्या ठिकाणी राहतात की बाहेरगावाहून ये-जा करतात? ग्रामसेवक ग्रामस्थांना कार्यालयात कोणत्या वेळेला कार्यालयीन कामकाजासाठी भेट देतात? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन गावातील सार्वजनिक ठिकाणच्या गटारी यांची साफसफाई वेळेवर आणि नियमित होत नसल्याने बोरावल खुर्द येथील स्वामीनारायण मंदिराजवळील गटार घाणीने कचऱ्याने तुडुंब भरल्याने दुर्गंधी…
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील कोळवद येथील शेतकऱ्याने भुसावळ येथील एका बी-बियाणे दुकानातून (शेतकऱ्याकडे बियाणे खरेदीचे बिल आहे) नावाजलेल्या कंपनीचे तूर पिकाचे बियाणे गेल्या १५ दिवसांपूर्वी खरेदी करून आपल्या शेतात तूर पेरणी केली होती. तूर पिक उगवले नसल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे. कंपनीच्या संबंधित माणसांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केल्यावर कंपनीमार्फत शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यात कंपनी आणि तुम्ही एकमेकांचे काहीच करू शकणार नाही, असा सल्ला दिला. शेतकऱ्याचे झालेले आर्थिक नुकसान व पेरणीची जी वेळ वाया गेली त्याबाबत पर्यायी व्यवस्था न केल्याने याबाबत आता तालुका कृषी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काय कारवाई करणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. कोळवद येथील वैभव…
साईमत, संदीप जोगी, मुक्ताईनगर : श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा २०२४ हा पालखी सोहळा मंगळवारी, १८ जून रोजी दुपारी १ वाजता मूळ मंदिर कोथळी येथून प्रस्थान करणार आहे. आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३१५ वे वर्ष आहे. या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी व मंदिराचे व्यवस्थापक पालखी सोहळा प्रमुख यांच्या उपस्थितीत १२ जून रोजी सायंकाळी जुने मुक्ताई मंदिर कोथळी येथे झाला. यासंदर्भात शुक्रवारी, १४ जून रोजी आषाढी वारीला जाणाऱ्या प्रमुख सात पालखी सोहळा प्रमुखांसोबत मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सायंकाळी चार वाजता व पुणे येथे सकाळी…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून देत त्याचा निर्घृणपणे पत्नीने खून करुन त्याला ‘यमसदनी’ धाडले असल्याची घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली आहे. यासंदर्भात केवळ बदनामीच्या भीतीपोटी मयत व्यक्तीच्या काकाने उशिरा फिर्याद दिली. दरम्यान, धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून पत्नीला अटक केली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रकाश यादव धोबी (वय ४५, रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो गावात पत्नी ज्योती, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होता. तो पायाने दिव्यांग असतानाही परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, पत्नी ज्योती हिचे माहेरी येथे गावातील एकाशी अनैतिक…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान कार्यरत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये बुधवारी, १२ रोजी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुरुवारी, १३ जून रोजी बबन आव्हाड हे आपला पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथील भडगाव रस्त्यावरील प्रणव सुपर शॉपी हे शुभारंभापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी फोडत काही सामान लांबविला तर काही अंतरावरील शांकभरी इलेक्ट्रिक दुकानाचे कुलुप तोडत चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पो.कॉ.नरेंद्र विसपुते यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील भडगाव रस्त्यावर नव्यानेच सुरू होत असलेल्या प्रणव सुपर शॉपी हे या दुकानाचे उद्घाटन होण्याअगोदरच चोरट्यांनी चोरी करत उद्घाटन केले. दुकानाचे येत्या दोन दिवसात उद्घाटन होणार होते. त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू असतांनाच ११ रोजीच्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवत आत प्रवेश करत दुकानातील काही…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील केकतनिंभोरा जवळील चिंचखेडा बु. शिवारात चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची अत्यंत ह्दयद्रावक घटना मंगळवारी, ११ जून रोजी घडली. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून जामनेर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, याघटनेबाबत केकतनिंभोरा, चिंचखेडा बु. सह जिल्ह्याभरातून हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर असे की, चिंचखेडा बु. गावाजवळ काही आदिवासी कुटुंब झोपड्या करून राहतात. मोलमजुरी करुन ते आपला उदरनिर्वाह करतात. सध्या खरीपाच्या पेरणीचे दिवस असल्याने अंदाजे ६ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीला घरी ठेवून मुलीचे आई-वडील कामानिमित्त शेतात गेले होते. चिमुकली घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारीच राहत असलेला एक ३५ वर्षीय नराधम त्या अल्पवयीन चिमुकलीला…
साईमत, यावल : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील मोहमांडली ग्रुप ग्रामपंचायतपासून ४०० ते ५०० मीटर अंतरावरील ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये पावसाचे घाण पाणी वाहून जाऊन विहिरीतील पाणी अशुद्ध झाल्याने आदिवासी बांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मोहमांडली येथील गाव विहिरचे पिण्याचे पाणी पूर्णपणे पावसाच्या पाण्यामुळे खराब झालेले आहे. मात्र, मोहमांडली येथील सरपंच आणि ग्रामसेवक हे त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पिण्याच्या पाण्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी, आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.