Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शुक्रवारी, २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त योगाविषयी मार्गदर्शन करुन योगाचे धडे देण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनीही योगा करुन जीवनातील योगाचे महत्त्व जाणून घेऊन विद्यार्थ्यांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामुळे सर्वत्र योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘महिला सशक्तीकरणासाठी योग साधना’वर मार्गदर्शन येथील पतंजली योगपीठामार्फत दहावा जागतिक योग दिन महोत्सव महिला योग साधकांमार्फत साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘महिला सशक्तीकरणासाठी योग साधना’ विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक गजानन माळी यांनी योग साधनेचे आयुष्यातील महत्त्व व महिलांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणामध्ये मोलाचे ठरेल, असे सांगितले. याप्रसंगी विविध योगासन आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तमाम शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी खासदार उन्मेश पाटील आणि माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, २१ जून रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर होत असलेल्या धरणे आंदोलनाला हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांसह नागरिक, मविआचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सकाळी १०:३० वाजता चाळीसगावातील तहसील कार्यालयाच्या आवारात उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे चाळीसगाव तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे यांनी केले आहे.

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावात सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकारामुळे परिसर हादरला होता. ‘त्या’ नराधमाने चिंचखेडा शिवारातील शेतात हे दुष्कृत्य करून पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून त्याची ओळख निश्‍चित केली होती. त्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकाला गुंगारा देत होता. अखेर ‘त्या’ नराधमाला गुरुवारी, २० जून रोजी भुसावळातून एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, नराधम आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. सुभाष इमाजी भील (वय ३५, रा. वावडदा, ह.मु. चिंचखेडा, ता. जामनेर) या नराधमाला गुरुवारी, २० जून रोजी भुसावळ येथून पोलिसांसह…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील भागवत रस्त्यावरील ‘रसमंजू’ कॉम्प्लेक्समधील भिंत मंगळवारी, १८ जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पडल्याने संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे बेसमेंटमधील व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यासंदर्भात खा.स्मिताताई वाघ यांनी पाहणी करून पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. कॉम्प्लेक्सच्या शेजारील गटार तुंबत असल्याने पाण्याचा निचरा होण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे जोरदार झालेल्या पावसाचे पाणी कॉम्प्लेक्सच्या संरक्षण भिंतीत मुरल्याने भली मोठी भिंत कोसळून संपूर्ण पाणी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट शिरले. तेथील सर्व दुकाने जलमय होऊन व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही बाब दुकानदारांनी खा.स्मिताताई वाघ यांच्या निदर्शनास आणून…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील वनविभाच्या माध्यमातून सप्टेंबर २०२२ जुलै २०२३ या कालावधीत ‘विद्यार्थी वन माझे रोप-माझी जबाबदारी’ अशी शहरातील शाळांना भावनिक साद घालण्यात आली होती. यासाठी १८ शाळांनी प्रतिसाद देत १५ हजार ५०५ विद्यार्थ्यांना रोप बनविण्यासाठी प्रति विद्यार्थी पाच पिशव्या व बियांचे वाटप केले होते. या माध्यमातून तीन हजार ५०० विद्यार्थ्यांनी तीन हजार ५०० रोप तयार केल्याचा दावा वनविभागाने केला होता. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोपांची लागवड त्यांच्याच हस्ते शहरापासून हाकेच्या अंतरावरील बिलाखेड बायपास लगत वनपरिक्षेत्राच्या जागेवर वनविभाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा व प्रसिद्धी करत केली होती. ‘माझे रोप-माझी जबाबदारी’ या भावनिक सादेला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत जबाबदारी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोदगाव याठिकाणी पत्नीने प्रेम संबंधांमध्ये अडचण ठरलेल्या पतीचा ब्लेडने वार करून डोक्यात दगड टाकून निर्घृण खून करुन ‘यमसदनी’ धाडले आहे. त्यानंतर अपघात झाल्याचा बनाव केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी कौशल्याने कट उघडकीस आणून मयताची पत्नी वंदना पवार आणि तिचा चुलत दीर गजानन पवार यांना पळून जाण्याची संधी न देता वंदनाला चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या परिसरातून तर गजानन पवारला न्यायडोंगरी येथुन ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, बाळू सिताराम पवार (वय ४०, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे मयत तरुणाचे नाव…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर गोरगरीब लेकरांसाठी शिक्षणाचे हक्काचे व्यासपीठ आणि गावाचे शिक्षण वैभव असणारी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा ‘मृत्यूशय्येवर’ आहे. त्यामुळे ती शेवटच्या घटका मोजत आहे. शाळेला जगविण्यासाठी संजीवनी देण्याचे कार्य शिक्षकद्वयी करत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठी शाळा खऱ्या अर्थाने गोरगरीब हीन-दीन जनतेच्या लेकरांसाठी शिक्षणाची हक्काची केंद्र आहेत. बदलत्या धोरणांमुळे मराठी शाळांकडे पालकांचा ओढा कमी होत आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्याचे भीषण चित्र निर्माण झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ मध्ये जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सुरू झाली. पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी गावाचे वैभव असणारी…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डोणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये पहिलीपासून प्रवेश घेतलेल्या मुलांना दहावीत प्रवेश देण्यासाठी संस्थाचालकांनी नकार दिल्याने दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी गुरुवारी, २० जून रोजी यावल येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात येऊन आपली कैफियत मांडली. या प्रकरणात प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की, संस्था चालकांना आदिवासी विभागाकडून थकीत बिल न मिळाल्याने संस्थाचालकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिल्याचे चर्चिले जात असले तरी दुसरीकडे पहिलीपासून ज्या शाळेत आदिवासी मुलांनी शिक्षण घेत आहे, त्या शाळेत विद्यार्थ्यांना नववी व दहावीमध्ये प्रवेश मिळत नसल्याने त्यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय प्रकल्प अधिकारी तसेच संस्था चालकांचा समन्वय नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक…

Read More

साईमत, विशेष प्रतिनिधी | जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून सुरु झालेल्या बचतगटांना थेट मतदान केंद्रावर सक्रिय राहण्याचा फतवा काढण्यात आला.मतदानाची टक्केवारी वाढवी म्हणून मतदानाच्या दिवशी राष्ट्रीय उत्सव साजरा करीत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा,असा हा आदेश असल्याने त्याचा फायदा भाजपाच्या विजयासाठी झाला तसेच मतदान केंद्रावर महिला बचत गटांच्या महिलांचा थेट प्रचार व आपल्या उमेदवाराला मतदान होण्यासाठी वापर करून घेतल्याचा आता आरोप होत असून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात सक्रिय असलेल्या महिला बचत गटांकडे बोट जात आहे.जिल्हा निवडणूक यंत्रणा उमेद अभियानाच्या महिला बचत गटांना सहभागी करणार…

Read More

विवेक ठाकरे, साईमत, जळगाव : भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी हे एक, आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड, दोन आयुध निर्माण कारखाने व जवळच दीपनगर येथील एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ही ओळख असलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विजयी झालेले आ. संजयभाऊ सावकारे यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील एक नशिबवान राजकीय माणूस म्हणून पाहिले जाते. येत्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची सर्वदूर इच्छुकांची तयारी सुरु असतांना आ.संजय सावकारे अगदी बिनधास्त आहेत. कारणही तसेच आहे येथे भाजपाकडून त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असतांना महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सुटते हे सुद्धा स्पष्ट नसून गेल्या वेळेच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार सद्यातरी…

Read More