Author: Sharad Bhalerao

चालक, वाहकाचा सत्कार, पाचोरा आगार प्रमुखांचे मानले आभार साईमत/ न्यूज नेटवर्क/ लोहारा, ता.पाचोरा : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने पाचोरा आगाराने पाचोरा-लोहारा-कळमसरा एस.टी.बस सुरू केली आहे. याबद्दल लोहारातील पंडित माध्यमिक विद्यालयासह पालकांच्यावतीने चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच याबद्दल गावातील पालकांसह कळमसरा येथील पालकांनीही पाचोरा आगाराचे आगार प्रमुख यांचे आभार मानले आहे. पाचोरा आगाराची बस लोहारापर्यंत ये-जा करत होती. परंतु कळमसरा गावातील विद्यार्थ्यांना त्या बसचा काही उपयोग होत नव्हता. म्हणून विद्यालयाच्यावतीने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे यांनी पाचोरा आगाराचे आगार प्रमुख यांना निवेदन देऊन पाचोरा लोहारा असणारी बस सकाळी दहा वाजता पाचोराहून सुटणारी ही पुढे लोहारा यानंतर कळमसरा गावापर्यंत नेण्यात…

Read More

रयत सेनेची नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकाऱ्यांकडे मागणी साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव : शहरातील सानेगुरुजी नगरात एकमेव स्वामी समर्थांचे मंदिर आहे. मंदिरात अनेक भाविक रोज दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, सध्या पावसाळा असल्याने मंदिराकडे जाणारे दोन्ही रस्ते अत्यंत खराब आहे. तसेच प्रचंड चिखल रस्त्यावर झाल्याने भाविक भक्तांना रस्त्यावरून मार्ग काढणे जिकरीचे होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने तात्काळ नवीन रस्ते बांधून परिसरातील नागरिकांसह भाविकांना चांगल्या रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी रास्त मागणी रयत सेनेच्यावतीने नगरपरिषेचे उपमुख्याधिकारी राहुल साळुंखे यांच्याकडे नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी रयत सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह माजी जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, बबन पवार उपस्थित होते. साने गुरुजी नगर परिसरातील नागरिक स्वामी समर्थ…

Read More

रेल्वे विभागाकडून दिली परिवाराला माहिती साईमत/ न्यूज नेटवर्क/ भडगाव : तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन (वय २३) यांचे अपघाती निधनाची माहिती बुधवारी, २४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता परिवाराकडून मिळाली आहे. वाडे येथील सुपुत्र समाधान महाजन हे आर्मीमध्ये नोकरीला होते. ते एका महिन्यांची सुट्टीवर घरी आलेले होते. सुट्टी उपभोगून कर्तव्यावर हजर होण्याकामी परतीचा प्रवास करीत असताना मालपूर, आग्राजवळ रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून परिवारास देण्यात आली. समाधान महाजन हे ४० आर.आर.जे एन.के. पुंच्छ येथील पोस्टींगवर कार्यरत होते. समाधान सखाराम महाजन यांचे लग्न दीड वर्षापूर्वीच झाले आहे. ते सखाराम आनंदा महाजन यांचे एकुलते एक चिरंजीव होते.…

Read More

आ.शिरीषदादा चौधरी यांची ग्वाही साईमत/ न्यूज नेटवर्क/ पाल, ता. रावेर : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या शिफारसीवरून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे पाल, ता. रावेर येथे नव्याने सुरु करायच्या प्रस्तावित नवीन कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या तपासणी समितीचा येथे पाहणी दौरा बुधवारी, 24 जुलै रोजी झाला. समितीच्या बैठकीत सातपुडा विकास मंडळाचे मा. अध्यक्ष व विद्यमान सदस्य आ.शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या आदिवासी भागाच्या या कर्मभूमीला कृषी शिक्षणाच्या माध्यमातून अधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी यापुढे झोकून काम करणार कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. रावेर-यावल तालुक्यात कृषी व ग्रामविकास विभागाचे विकासापूरक निरनिराळे उपक्रम राबवणार असतांना आमच्या सातपुडा विकास मंडळाची नियोजित दोन्ही महाविद्यालये…

Read More

केंद्राने दखल घेण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन साईमत/ न्यूज नेटवर्क/रावेर : काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात सातत्याने जवान शहीद होत आहे. या घटनेचा तीव्र निषेध करीत याबाबत केंद्र शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, अशा आशयाचे निवेदन रावेर तालुका उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे तहसीलदार बी.ए. कापसे यांना देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, जम्मू काश्मीर सीमेवर वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद होत आहेत. ही बाब गंभीर आहे. मात्र, केंद्र सरकार या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे केंद्र असलेल्या सरकारचा रावेर तालुका शिवसेनेतर्फे घोषणा देऊन निषेध करण्यात आला. यावेळी रावेर तहसीलदार बी.ए.कापसे आणि अपर तहसीलदार मयूर कळसे यांना निवेदन देण्यात आले. यांची होती उपस्थिती…

Read More

अनेक वर्षांपासून परिस्थिती ‘जैसे थे’, रा.प. महामंडळासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष साईमत/ न्यूज नेटवर्क/ धानोरा, ता.चोपडा : ३६ प्रवाशांची दररोजची ये-जा आणि अनेक वर्षांपासून बस स्थानकाअभावी ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने याकडे रा.प. महामंडळासह लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. याकडे आ.लताताई सोनवणे, केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, चोपडा राज्य परिवहन महामंडळ आणि जळगाव यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. बस स्थानकाची नव्याने उभारणी करण्यात यावी, अशा आशयाचे अनेक ठराव आतापर्यंत ग्रामपंचायतमार्फत दिले आहे. याकडे राज्य परिवहन विभाग जळगाव यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. चोपडा तालुक्यातील अति महत्त्वाचे गाव म्हणून ओळख असलेल्या धानोरा गावाच्या बाहेर असलेल्या बस स्थानक दुरावस्थेमध्ये ‘गाव…

Read More

आठवड्याभरात सुधारणा करा, अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर : शिवसेना (उबाठा) चे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी येथील बसस्थानकाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. त्यांनी आपल्या शिवसैनिकांसह आगार प्रमुखाला घेराव घालून बसस्थानकातील समस्यांबाबत प्रश्नांचा भडीमार करून लवकरात लवकर बसस्थानकातील समस्या सोडविण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसांच्या आत समस्या मार्गी लागल्या नाही तर इथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्याचे मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आपल्या मतदार संघातील व बसस्थानकातील समस्यांबाबत लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.उबाठासेनेच्यावतीने राहुल चव्हाण यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. त्यात समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. बसस्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही,…

Read More

मनसेचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांचे प्रतिपादन साईमत/ न्यूज नेटवर्क/ यावल : गाव तेथे शाखा उद्घाटन करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भक्कम अशी फळी निर्माण करावी. तसेच जनतेची कामे केल्याशिवाय तुमचा म्हणजे मनसेचा अधिकाऱ्यांवर प्रभाव पडणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांनी केले. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. त्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रभारी राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, रावेर व चोपडा विधानसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे यांचा पक्षातील अल्प कामकाजाचा कडक आणि स्पष्ट शब्दात आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना देऊन शुक्रवार…

Read More

विविध शाळांमधील कुस्तीपटूंनी नोंदविला सहभाग साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर : तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात मुक्ताईनगर तालुकास्तरीय स्पर्धेत सुरुवात झाली. स्पर्धेचा शुभारंभ कुस्ती स्पर्धेने झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.पी. दाणे होते. याप्रसंगी तालुका क्रीडा कार्यालयाचे ज्ञानदेव येवले उपस्थित होते. याप्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी हायस्कुल, चांगदेव येथील एस.बी.चौधरी विद्यालय, उचंदे येथील घाटे विद्यालय, मुक्ताईनगर येथील ई. के.टॅलेंट स्कुल तसेच मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय आदी शाळांमधील कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. त्यासाठी मयूर महाजन, उमाळे, सुभाष गायकवाड, विकास पाटील या तालुक्यातील शिक्षकांनी उपस्थिती दिली. स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातून 35 किलोग्रॅम वजन गटात प्रथम सुकळी विद्यालयाचा विद्यार्थी गोपाल धनगर, 44 किलोग्रॅम वजन गटात…

Read More

भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथील प्रकार साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव : येथील शाळेत जाण्यासाठी बस स्थानकावर वाट पाहत बसलेल्या अंजनसोंडे येथील शाळकरी मुलींना बसमध्ये लाडक्या बहिणींमुळे बसण्यास जागा नसल्याच्या कारणावरून चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे पन्नास ते साठ शाळकरी मुली चक्क बससमोर आडव्या होऊन आम्हाला पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत बस पुढे जाऊ देणार नाही, असा पावित्रा घेत एक तास बस अडवून धरली. भुसावळ ते सावतर निंभोरा ही बस सकाळी दहा वाजेच्या सुमारास वरणगाव अंजनसोंडे, तपत कठोरामार्गे सावतर-निभोंरा गावाला जाऊन परत येते. परतीच्या प्रवासात तिन्ही गावातील शाळकरी मुले-मुली या बसने वरणगाव येथील शाळेत येतात. सांयकाळी पाच वाजेदरम्यान पुन्हा बसने परत…

Read More