Author: Sharad Bhalerao

जळगाव जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रयत्नशील : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साईमत। जळगाव । विशेष प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका कर्जात असणे हे अतिशय वेदनादायी व मनातील शल्य होते. मनपाचा कर्जाचा हप्ता हुडकोकडे जात असल्याने मनपाच्या कर्मचाऱ्यांचे नियमित पगार होऊ शकत नव्हते. मुलभूत विकासासाठी निधीची चणचण भासत होती. आज जर हिशोब केला तर जळगाव शहर १२०० कोटी रूपये कर्जाच्या खाईत राहिले असते. या मोठ्या महासंकटातून शहराला बाहेर काढू शकलो याचे समाधान असल्याच्या भावना आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केल्या. साईमतच्या श्री गणेश आरतीचे मानकरी म्हणून आ. भोळे उपस्थित होते. त्याचवेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. इंद्रायणी मिश्रा यांची सुध्दा…

Read More

शिबिरात २५० बॅगांचे रक्त संकलन, ३५ महिलांनी नोंदविला विशेष सहभाग साईमत।जामनेर।प्रतिनिधी। तालुक्यातील पहुरला प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम समाजबांधवांतर्फे डॉ.नजमोद्दीन तडवी यांच्या नवोदय रुग्णालयात घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला प्रतिसाद मिळाला. प्रथमच पहुरला एवढ्या मोठया संख्येने महिलांसह २५० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. त्यात ३५ महिलांनीही सहभाग नोंदविला. शिबिराचे उदघाट्न जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जळगाव येथील इकरा महाविद्यालयाचे चेअरमन हाजी अब्दुल मजीद जकरिया होते. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. सलीम खान, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिक्षक धनंजय येरुळे, पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, माजी…

Read More

दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंचावरून होणार मिरवणुकांचे स्वागत साईमत।अमळनेर।प्रतिनिधी। परंपरेप्रमाणे शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता प्रस्तापित ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा “श्री सन्मान” मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला अमळनेरच्या शांतिदूतांकडून होणार आहे. यासाठी गणेशोत्सवात अति संवेदनशील क्षेत्र ठरणाऱ्या दगडी दरवाज्याच्या आत भव्य मंच उभारला आहे. त्याठिकाणीच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शांतताप्रिय मिरवणुकांचे अनोखे स्वागत व सन्मान केला जाणार आहे. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, मुंदडा फाऊंडेशन, पोलीस स्टेशन, नगरपरिषद आणि महसूल विभाग आदींच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्यावर्षी हा उपक्रम राबविला असता सर्व मंडळांनी भरभरून दाद देत मंचावरून होणाऱ्या…

Read More

जारगावला आयोजित शेतकरी मेळाव्यात वैशालीताई सूर्यवंशींचे टिकास्त्र साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली आहे. त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात सापडला असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी केले. त्या जारगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान, खडकदेवळा-लोहटार जिल्हा परिषद गटाचा शेतकरी मेळावा जारगाव येथे आयोजित केला होता. त्यात राहुरी येथील कृषी विद्यापीठाचे कृषी तज्ज्ञ प्रा. सुदामसिंग राजपूत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक पध्दतीने शेती करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून मी मतदारसंघात फिरत आहे. सर्वसामान्यांचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे.…

Read More

पुतळा खुला करून पुतळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रहार जनशक्तीतर्फे आंदोलनाचा इशारा साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : ‘तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा’ चा नारा देणाऱ्या देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असतांनाही न.प. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला हा पुतळा खुला करून पुतळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत न.प. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास लवकरच न.प. कार्यालयासमोर बाभळीच्या काट्यांवर बसून उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. स्थानिक तहसील चौक परिसरात देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात…

Read More

लोहाऱ्याच्या महिलेच्या प्रामाणिकपणाचा संताच्या भूमीत सर्वांना आला प्रत्यय साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : संतांची नगरी चांगदेवला शेकडो भाविकांची रोजच दर्शनासाठी वर्दळ असते. चांगदेव नगरीचे दर्शन झाल्यानंतर दोन नद्यांचा संगम असल्याने निसर्गरम्य देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते. अशातच नदी काठावर निकिता गोपाळ जंजाळ (मु.पो.चिंचपूर, ता.सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर) ह्या महिलेची सोन्याची मंगलपोत हरविली होती. ती सोन्याची पोत वंदना सुभाष देशमुख (रा.लोहारा) यांना सापडली होती. त्यांच्या मनात कुठलीही लालच न येता त्यांनी ती पोत चांगदेव मंदिर येथील देवस्थानातील पुजारी यांच्याजवळ सुपूर्द केली. ज्यांची असेल त्यांना द्या, असे उदार मनाने त्या महिलेने पुजाऱ्यांना सांगितले. त्यानंतर पुजारीही तेवढेच उदार मनाचे त्यांनीही लागलीच मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वच व्हाॅट्सॲप ग्रुपला त्या…

Read More

शेतकऱ्यांनी विविध विषयांवर हितगुज करत मांडल्या अनेक तक्रारी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची नुकतीच अजिंठा विश्रामगृहावर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी भेट घेत विविध विषयांवर हितगुज साधत अनेक तक्रारीही मांडल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच अडचणींना त्यांनी सविस्तरपणे समजून घेत त्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष एस. बी. पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. राज्यपालांशी हितगुज करताना जळगाव जिल्हा हा स्वादिष्ट व दर्जेदार केळीसाठी जगभरात सुप्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी, कापूस उत्पादक शेतकरी हा पूर्णता हतबल झालेला आहे. केळी, कापूस उत्पादकांना पिक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व…

Read More

भडगावला भाजपतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी साईमत।भडगाव।प्रतिनिधी। शहरात दोन – तीन दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रचारार्थ वैयक्तिक मजकूर व आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेले पोस्टर भडगाव शहरासह विधानसभा क्षेत्रात गल्लीबोळात लावली आहेत. ते लावत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता, गटारींवर असलेल्या भिंतीवर, मुतारीच्या भिंतीवर, अडगळीत पडलेल्या भिंतीवर व दुकानांच्या शटरवर ही पोस्टर लावण्यात आली. काही ठिकाणी समाजकंटकांनी शिवाजी महाराजांच्या फोटोची विटंबना केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काही नागरिकांनी सूचनाही केल्या होत्या. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेता अशा गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले.हा प्रकार तीन दिवसांपूर्वी…

Read More

आगामी विधानसभा मंत्री गिरीष महाजनांविरूध्द लढण्याची शक्यता साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाणारे दिलीप खोडपे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच तुतारी हातात घेऊन रा.काँ.शरद पवार गटात प्रवेश करुन मंत्री गिरीष महाजन यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात त्यांना कुणाचेही आव्हान नसल्याचे चित्र होते. कारण काही महिन्यांपूर्वी महाजन यांचे कट्टर विरोधक तथा शेंदुर्णीचे रहिवासी संजय गरूड यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे महाजन यांचा एकतर्फी विजय होईल, असे सर्वांचे मत होते. मध्यंतरीच्या काळात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गिरीष महाजन यांना जामनेरातून पाडणार…

Read More

गुलाबराव पाटील फाउंडेशनतर्फे ५०० मुलींना मोफत सायकलचे वाटप साईमत।पाळधी, ता.धरणगाव।प्रतिनिधी। शाळा घरापासून लांब असल्याने पायपीट करणाऱ्या ५०० विद्यार्थिनींना गुलाबराव पाटील फाउंडेशनतर्फे पहिल्या टप्प्यात सायकल वाटप करण्यात आले. गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींना सायकल मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आमच्या मुलींमध्ये स्किल आहे, पुढे जाण्याची क्षमता आहे. म्हणून आम्ही सायकल वाटपाचा कार्यक्रम घेतला. या सायकलीमुळे शिक्षणात मदत तर होईलच त्यासोबत आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथील सुगोकी लॉन येथे गुलाबराव पाटील फाउंडेशन, मुंबईचे जय बालाजी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More