Author: Sharad Bhalerao

राज्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयासह शाळांसमोर भोजन सुट्टीत मंगळवारी एक तास उग्र निदर्शने साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पुकारण्यात आलेला लाक्षणिक संप स्थगित केला आहे. त्याऐवजी त्या दिवशी दुपारच्या भोजन सुट्टीत तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. राज्य समन्वय समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत विधानसभेत आश्वासन देऊनही अद्याप आश्वासनाची पूर्ती केलेली नाही तसे सरकारची मानसिकता दिसून येत नसल्याने संघटनेच्यावतीने मंगळवारी, ११ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील सरकारी- निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी…

Read More

ग्वाल्हेरला जैन इरिगेशनची खेळाडू चमकली, युवा मुलींच्या एकेरी गटात दुसरे राष्ट्रीय विजेतेपद साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   ग्वाल्हेर येथे नुकत्याच पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जळगावच्या जैन इरिगेशनच्या समृद्धी घडीगावकरने उत्कृष्ट खेळ करत युवा मुलींच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात समृद्धीने महाराष्ट्राच्या केशर निर्गुण हिचा २-० सेटने पराभव करून सलग दुसरे राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावे केले. उपांत्य फेरीत तिने तमिळनाडूच्या बरकत निसा हिचा २-१ सेटने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात केशर निर्गुण हिने पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या व्ही. मित्रा हिच्यावर विजय मिळवला होता. उपउपांत्य फेरीत समृद्धीने बिहारच्या शालू कुमारी हिचा २-० सेटने पराभव करून उपांत्य फेरीत मजल…

Read More

शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निर्धार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जळगाव जिल्हा कार्यालयात शिवसेना उबाठा गटाच्यावतीने आयोजित महत्वपूर्ण निर्धार मेळावा बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. मेळाव्यात शेकडो महिलांसह पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाच्या झेंड्याखाली काम करण्याची शपथ घेतली. मेळाव्यात शिवसैनिकांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दिली. तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सक्षम पर्याय जनतेसमोर उभा केला जाईल, असा निर्धार केला. मेळाव्यास शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख प्रमोद घुगे उपस्थित होते. मेळाव्यात विविध पंचायत समिती आणि जिल्हा…

Read More

शासनाच्या हमीभावाने ज्वारी, मका, बाजरीची खरेदी : शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी शासनाच्या किमान आधारभूत किंमत (हमीभाव) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार हमीभाव ज्वारी तीन हजार ६९९, मका दोन हजार ४००, बाजरी दोन हजार ७७५ रूपये निश्चित केल्याचे पणन महासंघाचे संचालक तथा मंत्री संजय सावकारे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांनी सांगितले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत खरीप हंगामातील खरेदीसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यास अनुसरून जिल्हा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी भरडधान्य खरेदी केंद्र प्रस्ताव सादर केले…

Read More

२६ विद्यापीठांच्या १४०० विद्यार्थ्यांचा सहभाग ; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ‘इंद्रधनुष्य युवक महोत्सव’ २०२५ स्पर्धेचे उद्घाटन ‍बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. ‍गिरीष महाजन, सिनेअभिनेत्री तथा ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी असतील. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील उपस्थित राहतील. यावेळी मान्यवरांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, विविध समितीचे…

Read More

संमेलनात रमेश कदम ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शाहिरी क्षेत्र संघटन, सार्वजनिक कार्य व पत्रकारिता अशा माध्यमातून ज्यांनी आपले आयुष्य ६० वर्षांहून अधिक काळ निरलस वृत्तीने समर्पित केले. अशा अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे संस्थापक तथा मुख्य विश्वस्त रमेश कदम यांना ‘पहिला खान्देशरत्न राष्ट्रशाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे जीवन गौरव पुरस्कार’ महाराष्ट्राच्या पारंपारिक लोकवाद्याच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार जळगाव खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान ह्या संस्थेच्यावतीने देण्यात आला. त्याचे स्वरूप ५१ हजार रुपयांसह शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. जळगावातील माजी सैनिक सभागृहात अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद आणि खान्देश लोककलावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त…

Read More

तीन हजार ३१३ हरकतींपैकी दोन हजार ५१ मान्य ; एक हजार २६२ हरकती फेटाळल्या साईमत/पारोळा/प्रतिनिधी :  नगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात दाखल झालेल्या तीन हजार ३१३ हरकतींपैकी दोन हजार ५१ हरकती मान्य केल्या असून एक हजार २६२ हरकती फेटाळल्या आहेत. तसेच यंदा पाच हजार ४६९ नव्या मतदारांची भर पडली आहे. गेल्या चार वर्षांपासून पारोळा नगरपरिषद प्रशासकांकडे आहे. मुदत संपलेली निवडणूक कधी लागणार, याकडे शहरातील नागरिकांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून होते. आगामी निवडणुकीसाठी जुलै २०२५ अखेर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. यादीवर शहरातील तीन हजार ३१३ नागरिकांनी हरकती दाखल केल्या होत्या.…

Read More

एकात्मता, संस्कारासह समाजहिताचा संदेश देणारा ठरला मेळावा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : चर्मकार विकास संघातर्फे राज्य व परराज्यातील वधू-वरांच्या प्रथम पसंतीचा तृतीय वधू-वर व पालक परिचय मेळावा जळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी, २ नोव्हेंबर रोजी उत्साहासह भावनिक वातावरणात पार पडला. मेळाव्यास समाजबांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात ५३५ वधू-वरांनी परिचय करुन दिला. एकात्मता, संस्कारासह समाजहिताचा संदेश देणारा मेळावा भावनिक वातावरणात पार पडला. समाजातील सर्व थरातील बांधवांचा सहभाग पाहता, हा मेळावा चर्मकार समाजाच्या ऐक्य, प्रगती आणि नव्या दिशेचा सुंदर आरंभ ठरला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संजय सावकारे होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजू मामा भोळे, संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी महापौर तथा…

Read More

श्रीराम मंदिर संस्थानतर्फे पारंपरिक रथोत्सव भक्तिभावात ; २० क्विंटल फुलांनी सजला मंदिरासह रथमार्ग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असणाऱ्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त रविवारी, २ नोव्हेंबर रोजी पारंपरिक श्रीराम रथोत्सव मोठ्या उत्साहासह भक्तिभावाने पार पडला. १५३ वर्षांची अखंड परंपरा असलेला उत्सव यंदा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी ‘जय श्रीराम’च्या घोषात, शंखनाद आणि चौघड्यांच्या गजरात रथ हलला आणि क्षणात संपूर्ण सुवर्णनगरी प्रभू श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमून गेली. यंदाच्या रथोत्सवासाठी श्रीराम मंदिराची आणि रथाची सजावट फुलांनी केली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल तीन क्विंटल झेंडू, एक टन शेवंती आणि गुलाब फुलं तर रथासाठी दोन क्विंटल फुलांचा…

Read More

योगदानाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना मिळाला उजाळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जळगाव कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी लेवा भवनातील सरदार पटेल यांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरदार पटेल यांच्या कार्याचा व देशाच्या एकीकरणातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमास फाउंडेशनचे सचिव राहुल नेतलेकर, योगेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, पंकज गागडे, राहुल दहियेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे व्यक्त करण्यात…

Read More