Author: Sharad Bhalerao

२० लाख रुपये निधीचे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण केल्याची घोषणा साईमत/सोयगाव/प्रतिनिधी घोसला येथील गंगानंद गिरी आश्रमात वीस लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण भाजपचे डॉ.संजय गव्हाणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, चिदानंद महाराज यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी सहा वाजता लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ.संजय गव्हाणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, संजीवन सोनवणे, सुनील गव्हांडे, सरपंच गणेश माळी, मधुकर काटे, चिदानंद महाराज, विक्रम पाटील, प्रदीप बोडखे, संजय पाटील(जरंडी), प्रकाश शेळके,(कन्नड) सुनील जैन आदींची उपस्थिती होती. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्या निधीतून दहा लाख आणि ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून वाढीव दहा लाख असा २० लाख रुपये निधीचे…

Read More

साईमत/जळगाव/प्रतिनिधी: जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि. शिक्षकांच्या प्रलंबित शैक्षणिक समस्यांबाबत आज दि.१ ऑक्टोबर २०२४ दुपारी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना पदाधिकारी शिष्टमंडळाने मा.वेतन पथक अधीक्षक राजमोहन  शर्मा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यात प्रामुख्याने थकीत वैद्यकीय देयके, १०० टक्के अनुदानितच्या सप्टेंबरचे नियमित वेतन, न.पा. संचालित व अंशतः अनुदानित उ.मा.वि.चे ऑगस्ट २०२४ चे थकीत वेतन तसेच ई-कुबेर प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी अंशतः अनुदानितसाठी अत्यावश्यक निधी उपलब्ध नसल्याने  ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन रखडले असल्याचे तसेच थकीत वैद्यकीय देयके आणि न.पा.संचलित उ.मा.विं.च्या ऑगस्टच्या वेतनाची बी.डी.एस.मंजूर झालेली असून ई-कुबेर प्रणालीची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतरच सदर रक्कम संबंधितांच्या खात्यात तात्काळ जमा…

Read More

ठाण्याच्या मधुरिका पाटकरला धक्कादायक पराभवाला जावे लागले सामोरे साईमत/जळगाव/प्रतिनिधी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष, महिला व युथ मुले, मुली ह्या गटांचे अंतिम सामने खेळले गेले. त्यात पुरुष गटात मुंबई उपनगरच्या रेगन अलबुकर्क, महिला गटात मुंबई उपनगरची संपदा भिवंडकर, युथ मुले गटात नाशिकचा कुशल चोप्रा तर मुलींमध्ये पुण्याची प्रिथा वर्तिकर हे अंतिम विजेते ठरले. महिला गटाच्या उपांत्य लढतीत अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याच्या मधुरिका पाटकरला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. अतिशय चुरशीची लढत येथे बघायला मिळाली. पहिला गेम ठाण्याच्या काव्या भटने ११-९ असा घेऊन चांगली सुरुवात केली. त्यानंतर मधुरिकाने पुढील दोन गेम१२-१०,…

Read More

नाशिक विभागात दुसरा क्रमांक प्राप्त साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाकडील ‘माझी वसुंधरा’ अभियान ४.० अंतर्गत पाचोरा नगरपरिषद व नगरपंचायत गटात हायजंप प्रकारात नाशिक विभागात दुसरा क्रमांक प्राप्त झाला. पाचोरा नगरपालिकेस ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. १ एप्रिल २०२३ ते १ मे २०२४ या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यातील ४१४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशा २२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यापूर्वी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी अभियानात लक्ष देवून जल-वायु-अग्नि-पृथ्वी-आकाश या घटकामध्ये उत्तम कामगिरी बजावली होती. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी अभियानाच्या कामात सातत्य ठेवून कामकाज केल्यामुळे पाचोरा नगरपरिषदेस हायजंप…

Read More

यावल पो.स्टे.ला अदखलपात्र गुन्हा दाखल साईमत/यावल/प्रतिनिधी : येथील नगरपरिषदेच्या कार्यालयात सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवानिमित्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात मुकादम शेख मोबीन शेख रशीद या कर्मचाऱ्यांनी बेशिस्त वागणूक केल्याने यावल नगरपरिषद पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सत्यम पाटील यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि यावल पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत काल रात्री उशिरा मुकादम शेख मोबीन यांच्याविरुद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. लेखी अर्जात म्हटले आहे की, नगरपरिषद आरोग्य विभाग ऑफिसमध्ये आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम, विद्युत विभाग कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत नवरात्री सण उत्सवनिमित्त ३० रोजी दुपारी १२.३० वाजता बैठक…

Read More

चाळीसगावातील महाविद्यालयात व्याख्यानात ॲड.मुकेश पवार यांचे प्रतिपादन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : उत्तम बोलण्यासाठी शब्द सामर्थ्य वाढवा, त्यासाठी भरपूर वाचन करा. समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नका. बोलण्यातूंचा पहिल्याप्रथम व्यक्तीचे व्यक्तिमत्व दिसून येते व व्यक्तीची ओळख होते. या महाविद्यालयाची मी विद्यार्थी राहिलो आहे. या महाविद्यालयानेच मला घडविले आहे. उत्कृष्ट बोलायला शिकले पाहिजे. उत्कृष्ठ वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता व्हायला शिका . चांगलं बोलायचं असेल तर चांगलं वाचायची सवय लावावी लागते. त्याचबरोबर स्पर्धेचे जीवनातील महत्व आणि विविध स्पर्धांमुळे जीवनाला मिळणारा आकार, यशाची हमी याबद्दलही मार्गदर्शन करुन आपल्या विचारांनी ॲड.मुकेश पवार यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स अँड…

Read More

विजयी खेळाडूंना किशोर महाजन यांच्या हस्ते मोफत किटचे वाटप साईमत/जामनेर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्री मुरलीधरजी मानसिंगगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्य.विद्यालय १९ वर्षाआतील मुलींचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झाला. या संघाने विभागीय स्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्य क्रीडा स्पर्धेत धडक मारली. अंतिम सामना इंदिराबाई ललवाणी विद्यालयविरुद्ध डी.डी.एस.जी विद्यालय, चोपडा प्रथम सेट १५-०८ तर द्वितीय सेट १५-१३ ने पराभव करून संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली. जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग…

Read More

योग्यता असलेला उमेदवार विरोधी पक्षात आहे का? जामनेरातील मतदारांमधून उमटला सूर सुरेश उज्जैनवाल जामनेर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मंत्री गिरीष महाजन यांना आव्हादन देण्यासाठी भाजपाचेच पदाधिकारी जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांचे पक्षांतर घडवून रा.काँ.पक्षात (शरद पवार गट) प्रवेश देत त्यांच्याच हातात ‘तुतारी’ देत आठवड्यापूर्वी जामनेरमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत त्यांची उमेदवारीही घोषित केली. या घडामोडींचा नेमका काय परिणाम होईल किंवा झाला. तत्पूर्वी या मतदार संघाची मानसिकता आणि मतदारांवर प्रभाव कुणाचा जाती-पातीचा, पक्षाचा की व्यक्तीचा? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता लक्षात आल की, जळगाव जिल्ह्यातील हा एकमेव असा मतदारसंघ आहे की, ज्याच्यावर जाती-पातीचा कोणताही परिणाम होत नाही किंबहुना…

Read More

वाहतुकीचा चक्का जाम, दीड तास चालले आंदोलन साईमत/भडगाव/प्रतिनिधी : धनगर समाजाला आदिवासी जमातीत समाविष्ट करण्यात येऊ नये, यासाठी सोमवारी, ३० रोजी दुपारी १२.३० वाजता भडगाव येथील पारोळा चाळीसगाव चौफुलीवर एकलव्य संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन एकलव्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या आदेशाने तर संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. हे आंदोलन तब्बल दीड तास चालले. रस्त्यावर वाहनांचा चक्का जाम झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबल्याचे दिसुन आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणला होता. यावेळी एकलव्य संघटनेमार्फत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना तसेच तहसिल प्रशासनास निवेदन…

Read More

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांची पत्रकार परिषदेत माहिती साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे कंत्राटी सुरक्षारक्षकांची आर्थिक, शारीरिक पिळवणूक होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारीनंतरही सुरक्षा रक्षकांना न्याय न मिळाल्याने संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील ॲड.अमोल साळोक त्यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षकांना आर्थिक न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे कंत्राटी स्वरूपावर चार-चार अशा तीन शिफ्टमध्ये बारा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. परंतु सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नसून आजतागायत सुरक्षा रक्षकांना वेतन चिठ्ठी देण्यात आलेली…

Read More