‘माझी वसुंधरा’ अभियानातंर्गंत पाचोरा नगरपरिषदेला ५० लाखाचे पारितोषिक जाहीर

0
13

नाशिक विभागात दुसरा क्रमांक प्राप्त

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाकडील ‘माझी वसुंधरा’ अभियान ४.० अंतर्गत पाचोरा नगरपरिषद व नगरपंचायत गटात हायजंप प्रकारात नाशिक विभागात दुसरा क्रमांक प्राप्त झाला. पाचोरा नगरपालिकेस ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

१ एप्रिल २०२३ ते १ मे २०२४ या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यातील ४१४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशा २२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यापूर्वी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी अभियानात लक्ष देवून जल-वायु-अग्नि-पृथ्वी-आकाश या घटकामध्ये उत्तम कामगिरी बजावली होती. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी अभियानाच्या कामात सातत्य ठेवून कामकाज केल्यामुळे पाचोरा नगरपरिषदेस हायजंप प्रकारात नाशिक विभागात दुसरा क्रमांक प्राप्त करता आला.

यासाठी पाचोरा नगरपरिषदेचे विभाग प्रमुख जितेंद्र मोरे, आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल, विरेन्द्र घारु, शहर समन्वयक रवींद्र पवार यांनी विशेष प्रयत्न केले. यापुढे अभियानास नागरिकांनी मोहिमेत सहकार्य करावे, असे मुख्याधिकारी श्री.देवरे यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here