घोसलाला सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण

0
17
२० लाख रुपये निधीचे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण केल्याची घोषणा
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी
घोसला येथील गंगानंद गिरी आश्रमात वीस लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण भाजपचे डॉ.संजय गव्हाणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, चिदानंद महाराज यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी सहा वाजता लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ.संजय गव्हाणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, संजीवन सोनवणे, सुनील गव्हांडे, सरपंच गणेश माळी, मधुकर काटे, चिदानंद महाराज, विक्रम पाटील, प्रदीप बोडखे, संजय पाटील(जरंडी), प्रकाश शेळके,(कन्नड) सुनील जैन आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्या निधीतून दहा लाख आणि ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून वाढीव दहा लाख असा २० लाख रुपये निधीचे सांस्कृतिक सभागृहचे लोकार्पण केल्याची घोषणा डॉ.संजय गव्हाणे (कन्नड) यांनी केली.
यावेळी सुधीर कुलकर्णी, सुभाष बावस्कर, कैलास पाटील, शरद महाजन, अशोक महाराज, धोंडू युवरे, धनराज वाघ, विशाल गिरी, गुणवंत पाटील, सोमु तडवी, सुनील पाटील, गणेश गवळी, समाधान बावस्कर, समाधान गव्हांडे, श्रावण युवरे, प्रमोद वाघ, रामदास गवळी, प्रकाश गव्हांडे, पिंटू गव्हांडे, आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी समाधान पाटील, किशोर बावस्कर यांनी पुढाकार घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here