तब्बल १९ वर्षांनंतरच्या भेटीने सर्व जण रमले आठवणीत…! साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील मेहरूणमधील वाय.डी.पाटील अर्थात यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयातील २००५- ०६ या वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा नुकताच एक भव्य शालेय “गेट-टूगेदरचा” कार्यक्रम उत्साहात पार पडला. तब्बल १९ वर्षांनी झालेल्या भेटीने सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आठवणीत रमून गेले होते. विद्यार्थ्यांनी १९ वर्षानंतर पुन्हा एक दिवसाच्या शाळेचा अनुभव घेतला. कार्यक्रमाला २००५- ०६ या वर्षातील तुकडी ‘अ’ चे सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. खंबायत तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. तसेच शालेय प्रार्थना घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रत्येक…
Author: Sharad Bhalerao
सोहळ्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उदघाट्न साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पुरस्कार प्रेरणा देतात आणि त्यातून राष्ट्रनिर्मिती होते, हा व्यापक दृष्टिकोन ठेवून जळगाव येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठान या मान्यता प्राप्त सामाजिक संस्थेतर्फे राज्यात विविध क्षेत्रात नि:स्वार्थपणे कार्य करणाऱ्या कर्मवीरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा येत्या रविवारी, ११ मे रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणार आहे. समाज चिंतामणी प्रतिष्ठानच्या अशा स्तुत्य उपक्रमाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुभेच्छापत्र देऊन कौतुक केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस असतील. यांची असेल प्रमुख उपस्थिती याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य…
नवीन बस स्थानकाजवळील घटना ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मातची नोंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील नवीन बस स्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये जळगाव शहरात कामानिमित्त पुणे जिल्ह्यातून आलेल्या वृद्ध व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याचा प्रकार शुक्रवारी, २ मे रोजी सकाळी उघडकीस आला आहे. मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन (वय ७०, रा. मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे) असे मयत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन हे आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. ते रबरी शिक्के बनवून देण्याचे काम करून उदरनिर्वाह तर त्यांचा मुलगा वकिली काम करून उदरनिर्वाह करतो. दरम्यान, २८ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा…
मध्यरात्रीला घडली घटना; ५० लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील शिवतीर्थ मैदानासमोरील समर एजन्सी नावाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयानक होती की, संपूर्ण दुकानाच्या सर्व मजल्यांवर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत दुकानातील संपूर्ण कुलर, फ्रिजसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या असून प्राथमिक अंदाजानुसार जवळपास ५० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीची तीव्रता एवढी होती की, काही वेळातच ही आग संपूर्ण दुकानभर पसरली होती. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. ही माहिती समजताच…
अपघातात तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा; तरुणही गंभीर जखमी साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना महाराष्ट्र दिनी गुरुवारी, १ मे रोजी रात्री आठ वाजता घडली होती. दरम्यान, दोन्ही जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या दोन जणांमध्ये नयन मिलिंद तायडे (वय २२, रा.महाबळ) आणि रोहित संजय माळी (वय २१, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) यांचा समावेश आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाकडून नयन तायडे आणि रोहित माळी हे दोन्ही तरुण-तरुणी दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून उड्डाणपुलाकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या…
सुयशाबद्दल सर्वत्र कौतुकासह होतोय अभिनंदनाचा वर्षाव साईमत/शिरपूर/प्रतिनिधी : येथील आर.सी.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक प्रा.डॉ. प्रशांत पाटील यांच्या सुविद्य पत्नी प्रा.शीतल प्रशांत पाटील यांनी नुकतीच पीएचडी पदवी संपादन केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार प्रा.शीतल पाटील यांनी विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पदवी संपादन केली आहे. यासाठी त्यांचा An Automated Skin Lesion Analysis For Early Melanoma Detection (मेलेनोमा शोधण्यासाठी लवकर स्वयंचलित त्वचा विकृती विश्लेषण) असा संशोधनाचा विषय होता. त्यात त्या अभ्यासपूर्ण यशस्वी ठरल्या आहेत. प्रा. शीतल पाटील यांचे शिक्षण बी. ई. (कॉम्प्युटर), एम. टेक (माहिती तंत्रज्ञान) एम.आय.टी.कॉलेज, पुणे येथे झालेले आहे. त्या २००७ पासून शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक…
जुन्या आठवणींना दिला उजाळा, २३ गुरुजनांचा केला सत्कार, १०५ विद्यार्थ्यांचा सहभाग साईमत/साक्री/प्रतिनिधी : येथील न्यू इंग्लिश स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयामधील १९९४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘गेट टुगेदर’ अर्थात स्नेह-संमेलन बाल आनंद नगरी, कान नदी किनारी येथे नुकतेच पार पडले. तब्बल ३० वर्षांनंतर सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी ‘गेट टुगेदर’ (GTG) च्या कार्यक्रमामुळे एकत्र आल्याने सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्या शाळेने मोठे केले त्या शाळेसाठी एक दिवस देऊन ‘आठवण एक मौल्यवान साठवण’ ही संकल्पना राबवून ‘गेट टुगेदर’च्या माध्यमातून ‘मैत्री ही वर्तुळाकार असते, ज्याला कधीही शेवट नसतो… अशी मित्र-मैत्रिणी वणव्यामध्ये गारव्यासारखे’ असा एक नवा संदेश सर्वांनी दिला. ‘गेट टुगेदर’ला २३…
पीटीसी शिक्षण संस्थेतर्फे उपस्थितीचे आवाहन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्याने व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ४ जानेवारी रोजी राज्यस्तरीय एक दिवसीय इतिहास परिषद महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयोजनाखाली होणार आहे. परिषदेसाठी ‘स्थानिक इतिहास पुनर्लेखन आणि संशोधन’ हा विषय निवडण्यात आला आहे. स्थानिक इतिहासाच्या संवर्धनासाठी संशोधन आणि अभ्यासाच्या नव्या वाटा शोधण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची आहे. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, नॅकच्या तिसऱ्या चक्रात सी ग्रेड प्राप्त आहे. परिषदेत स्थानिक इतिहासाच्या विविध पैलूंचे सखोल पुनर्लेखन व त्यावरील…
‘कथाशील’ कथासंग्रहाचाही यापूर्वी धारवाड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद विनायक बागुल यांच्या ‘संदर्भ माझ्या जातीचे’ कविता संग्रहातील ‘माय’ शीर्षकाची कवितेचा जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफवायबीएच्या सत्र दुसऱ्यासाठी मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात निर्धारित केलेल्या खान्देश काव्यप्रबोध संपादित पुस्तकात समावेश केला आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. मराठी भाग दोनच्या अभ्यासक्रमात त्यांचा ‘संदर्भ माझ्या जातीचे’ हा कवितासंग्रह समावेश होता. त्याच कविता संग्रहातील ‘समता’ ही कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बी.ए. प्रथम वर्षाच्या महाविद्यालयीन मराठी अभ्यासक्रमात समावेश केला आहे. त्यांचा ‘कथाशील’ हा कथासंग्रह कर्नाटकच्या धारवाड विद्यापीठात…
रांजणी येथील कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांचे प्रतिपादन साईमत/जामनेर/प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी उठल्याबरोबर आई-वडिलांना नतमस्तक व्हावे. तसेच आई-वडिलांना दैवत मानून त्यांची नित्यनेमाने आज्ञा पाळावी, असे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर तुकाराम पाटील (पी.टी.पाटील) यांनी केले. ते जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्या मंदिरात आयोजित पुस्तक वाटपप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल फरफट होते. प्रमुख पाहुणे म्हणून मिराबाई पाटील, माजी अध्यक्ष वासुदेव साखरे, मुख्याध्यापक प्रकाश मावरे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, जे विद्यार्थी आई-वडिलांची तसेच शिक्षकांची आज्ञा पाळून परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करतात. त्यांना नक्कीच सुयश प्राप्त होते. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवावा, असेही ते म्हणाले.…