मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य साईमत/दिल्ली/प्रतिनिधी: सणासुदीचा काळ असो किंवा नवीन वर्षाचे स्वागत, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होणे आता सामान्य झाले आहे. मात्र, आनंदाच्या या वातावरणात सायबर चोरटेही तितकेच सक्रिय झाले आहेत. सध्या नवीन वर्षाच्या डिजिटल ग्रीटिंग्स आणि शुभेच्छा मेसेजच्या नावाखाली ‘एपीके’ (APK) फाइल्स पाठवून मोबाईल युझर्सची फसवणूक करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे १८ वर्षांखालील मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच या सायबर गुन्हेगारांचे सोपे लक्ष्य ठरत आहेत. या फसवणुकीची पद्धत अत्यंत साधी पण तितकीच घातक आहे. सायबर चोरटे व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा ईमेलद्वारे ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ देणारे आकर्षक मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये एखादे विशेष…
Author: Sharad Bhalerao
काही वेळातच आनंदाचे सूर थांबले आणि दुःखाचा आक्रोश उसळला साईमत/नाशिक/ प्रतिनिधी : हातावरची मेंदी अजून ओलीच होती. डोळ्यांत नव्या संसाराची स्वप्नं ती रंगवत होती. नववधू म्हणून बोहोल्यावर चढण्याची वेळ जवळ आली होती; पण नियतीने त्या क्षणाआधीच तिचे आयुष्य हिरावून घेतले. मंगलाष्टकांची तयारी सुरू असताना काही वेळातच आनंदाचे सूर थांबले आणि दुःखाचा आक्रोश उसळला. तरुणीचा दीपशिखा या हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रविवारी पाम स्प्रिंग रिसॉर्टमध्ये घडली. रविवारी (दि. २८) सकाळी विवाहाची धावपळ सुरू असतानाच दीपशिखाला अस्वस्थ वाटू लागले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. हृदयविकाराच्या धक्क्याने तिचे निधन झाल्याचे सांगताना डॉक्टरांनाही गहिवरून आले.…
राखी जाधवांची राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला सोडचिठ्ठी साईमत/मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने मुंबईत ठाकरे बंधूच्या युतीशी आघाडी केल्यानंतर जागावाटपात काही वॉर्डावर पाणी सोडावे लागणार असल्यामुळे राखी जाधव नाराज होत्या. ठाकरे बंधू युती आणि काँग्रेस असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. मात्र युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपाने राखी जाधव यांना पक्षात प्रवेश दिल्याने निवडणूक काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे. राखी जाधव यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही…
राज ठाकरेंनी स्वत: ‘एबी’ फॉर्म दिला साईमत/मुंबई/विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत मनसेचे ज्येष्ठ नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देऊन त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी स्वत: यशवंत किल्लेदार यांना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. किल्लेदार हे दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मधून निवडणूक लढवणार आहेत. २०१७ च्या निवडणुकीत हा वॉर्ड शिवसेनेच्या ताब्यात होता, मात्र आगामी निवडणुकीसाठी झालेल्या जागावाटपात हा भाग मनसेच्या वाट्याला आला आहे. एबी फॉर्म वाटपाच्या वेळी मनसेचे ज्येष्ठ…
३५० पेक्षा जास्त इच्छुक वधू-वरांनी परिचय करून दिला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : “मांगल्य” वधु-वर सुचक केंद्र जळगाव, धनगर समाज महासंघ मल्हार सेना अहिल्या महिला संघ व कर्मचारी संघटना यांच्यातर्फे आयोजित राज्यव्यापी सर्व शाखीय धनगर समाज वधु-वर परिचय मेळावा जळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, निमखेडी शिवार याठिकाणी २८ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी अकोलाचे सेवानिवृत्त अधिकारी केशव पातोंड होते. त्यांनी सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे व लग्न समारंभासाठी होणाऱ्या अमाप पायबंद घालावा व जुनी आहेर देणे घेणे पद्धत बंद करावी, असे मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये ३५० पेक्षा जास्त इच्छुक वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. ३० वर्षापासून मांगल्ये वधु-वर सुचक केंद्राचे…
मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सुरुवात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव रनर्स ग्रुपच्यावतीने सागर पार्क येथे आयोजित केलेल्या खान्देश रन (मॅरेथॉन)ला धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेत ३, ५, १० व २१ किलोमीटरसाठी सुमारे २५०० धावपटूंनी सहभाग नोंदवला. खान्देश रनच्या सुरुवाती प्रसंगी २१ किलोमीटरसाठी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन व अथांग जैन, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सुप्रीम इंडस्ट्रीजचे सुरेश मंत्री, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उद्योजक मनोज अडवाणी, राजेश चोरडिया तसेच जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान…
विहितगावला शिवसेना ठाकरे गट, मनसे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा साईमत/नाशिकरोड/ प्रतिनिधी : नाशिक महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून, १६ तारखेला मतमोजणी आहे. या दिवशी महानगरपालिकेत आमची सत्ता येणार व परिवर्तन घडविणार असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. विहितगाव येथील साई ग्रँड लॉन्समध्ये शिवसेना ठाकरे गट व मनसे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, मनसेचे सलीम मामा शेख, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, उपजिल्हाप्रमुख भैय्या मणियार, केशव पोरजे, योगेश गाडेकर, हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, सुवर्णा…
भाविकांचा जनसागर उसळला, संपूर्ण शिर्डी नगरी ‘साईमय’ साईमत/शिर्डी/प्रतिनिधी : येत्या नवीन वर्ष २०२६ च्या स्वागतासाठी आणि सरत्या २०२५ वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर पूर्णपणे सज्ज झाले आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारचा जोडून आलेला सुट्ट्यांचा काळ यामुळे शिर्डीमध्ये भाविकांचा जनसागर उसळला असून संपूर्ण शिर्डी नगरी ‘साईमय’ झाली आहे. भक्तीच्या या महापुरात भाविकांनी शिर्डीतील रस्ते, चौक आणि गल्लीबोळ गजबजून गेले आहेत. नाताळच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, २५ डिसेंबर रोजी एकाच दिवसात एक लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे या गर्दीत आणखीनच भर पडली आहे. गर्दी इतकी…
संभाव्य वेळापत्रक समोर, मोर्चेबांधणीला सुरुवात साईमत/मुंबई/प्रतिनिधी : येत्या नवीन वर्षात राज्याच्या ग्रामीण राजकारणाचा धुरळा उडणार असून ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रलंबित ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून, पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. आरक्षणाच्या तांत्रिक तिढ्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचे नियोजन केले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या २१ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत. यासाठी ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निवडणूक आयोगातील…
वाचनासाठी ३०० विद्यार्थी तर चर्चेत ३५ विद्यार्थ्यांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय विभागात वीर बाल दिवस, ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन व गट चर्चा असे दोन उपक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमात सुमारे ३०० विद्यार्थी वाचनासाठी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी ज्ञानस्रोत केंद्राच्यावतीने अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. सोपान इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जयदीप साळी, प्रा. पवित्रा पाटील, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. चंद्रशेखर वाणी, विजय आहेर, प्रवीण…