साईमत : जळगाव : प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे शालेय पोषण पंधरवडा निमित्त तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने तृणधान्यांपासून नाविन्यपूर्ण अशा पाककृतींची स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पालकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण पाककृतींचे सादरीकरण केले . सदर स्पर्धेत गव्हाची खीर , भगरीची इडली , गव्हाचा पुलाव ,बाजरीचे आप्पे, ज्वारीची चकली , नाचणी चा चॉकलेट केक ,उकडीचे मोदक आदी पदार्थ पालकांनी खूप उत्कृष्टरित्या या ठिकाणी बनवून सादर केले. त्यात सविता पाटील (ज्वारीची चकली ,केक प्रथम क्रमांक) , युगा सोनार (नाचणीचे लाडू द्वितीय) , शीतल पोतदार ( डिस्को भाकरी तृतीय ) ,…
Author: Saimat
साईमत : जळगाव : प्रतिनिधी खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “यमन को नमन” सोनेरी यादे कार्यक्रमाचे सादरीकरण आज सायंकाळी होणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना शशिकांत वडोदकर, निवेदन शशिकांत वडोदकर व ईशा वडोदकर, नेपथ्य प्रा. मिलन भामरे आणि पियुष बडगुजर, गायक मयुरी हरीमकर, वैशाली शिरसाळे, कपिल शिंगाने, अक्षय गजभिये, रितेश भोई, साथसंगत कीबोर्ड गौरव काळंगे, ऑक्टोपॅड कैलास निकम ,बासरी लक्ष्मण राजपूत, तबला देवेंद्र गुरव, ढोलक कृष्णा सोनवणे आदी. कार्यक्रम स्थळ जुना कॉन्फरन्स हॉल मूळजी जेठा महाविद्यालय शनिवार दिनांक १६ सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता सदर कार्यक्रमाला उपस्थितीचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे १४ ते १९ वर्षातील जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल (मुले – मुली) क्रीडा स्पर्धा 2023-24 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १४ वर्षातील संघाचा अंतिम सामन्यात ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ संघाशी अगदी अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या काही क्षणात ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ यांनी गोल केला. यात कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालयाचा संघ उपविजयी ठरला. स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडु म्हणून आपल्या विद्यालयाच्या चि.रत्नदीप अरविंद सोनवणे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी यांच्या सहकार्याने गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत प्रकल्प प्रमुख अभिश्री चव्हाण यांनी प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले. 85 विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा आविष्कार घडवीत गणेशाची विविध रूपे साकार केली. सर्व विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले. रोटरी युथ एक्सचेंज उपक्रमांतर्गत जळगावात आलेल्या मेक्सिको येथील विक्टर बाल्को व फ्रान्स येथील पियर मारी या विद्यार्थ्यांनी देखील कार्यशाळेत सहभागी होत तन्मयतेने बाप्पाच्या मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न केला. कार्यशाळेचा शुभारंभ रोटरी…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या प्रथम महिला गव्हर्नर आशा वेणूगोपाल (नाशिक) यांनी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलला अधिकृत क्लब भेट दिली. गणपती नगरातील डॉ.जी. डी. बेंडाळे वेल्फेअर सेंटरच्या नथमल लुंकड सभागृहात रोटरी सेंट्रलच्या सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसमवेत त्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सहप्रांतपाल रवींद्र शिरुडे, अध्यक्ष कल्पेश शाह, मानद सचिव दिनेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आशा वेणूगोपाल यांनी सेवा प्रकल्प राबवताना गरज तिथेच कार्य करावे असे सांगून आगामी काळात धूर मुक्त चुली, नवजात बाळांच्या पायाची समस्या आणि वाहतूक पोलिसांसाठी तणावमुक्ती या विषयांवर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेश चौधरी संपादित क्लब…
साईमत : जळगाव : प्रतिनिधी येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे शाळेच्या प्रांगणात हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एक संकल्प केला की, आज दिवसभर हिंदी भाषा बोलायची. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर , उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे, पर्यवेक्षक एस.पी.निकम व हिंदी विभागातील संगीता पाटील , नीता पाटील , दिपाली झोपे, रोहिणी निकुंभ , वैशाली भदाणे , प्रज्ञा राणे , जेष्ठ मार्गदर्शक एस.डी.भिरूड उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी भारतमातेच्या प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी दिना निमित्य भाषण,गीत ,कविता,नृत्य,सामुहिक गीत सादर केले.शाळेतील विद्यार्थी यश जाधव याने हिंदी भाषेचे महत्व विषद केले.…
साईमत जळगाव प्रतिनिधी इमामी, हिंदुस्थान युनीलिव्हर व इतर कंपन्यांच्या उत्पादनांचे नाव वापरून हुबेहूब नकलीकरण करून तसेच उत्पादन तयार करणाऱ्या जळगावातील दोन भामट्यांना मुंबईतील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी ताब्यात घेत आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. सिध्देश सुभाष शिर्के (वय-३१ वर्षे, व्यवसाय नोकरी रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) हे नेत्रीका कन्सल्टींग इंडीया प्रायव्हेट लिमीटेड, शाखा गोरेगाव इस्ट, मुंबई येथे फिल्ड ऑफिसर म्हणून कर्तव्यास आहे. त्यांना इमामी लिमिटेड, हेलिओन युके लिमिटेड, हिंदुस्थान युनिलिव्हर, रेकीट बेनेकीसर, साबळे-वाघिरे कंपनी या कंपन्यांनी त्यांच्या कंपनीत तयार होणा-या उत्पादनासारखे बनावटीकरण करून विकणाऱ्या लोकांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबतचे अधिकार दिले…
साईमत जळगाव प्रतिनिधी दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून भावाचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुकेश मधुकर सपकाळे या तरूणाचा चाकू भोसकून प्रतिष्ठित मु. जे. महाविद्यालयात सन २०१९ साली निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात किरण अशोक हटकर (वय-२४, रा. नेहरू नगर, जळगाव) याला बुधवारी १३ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा न्यायमूर्ती बी.एस. वावरे यांनी ठोठावली. तर त्याच्यासोबतचे ५ जण निर्दोष सुटले आहेत. याबाबत माहिती अशी की, रोहित मधुकर सपकाळे रा. आसोदा, ता.जि.जळगाव हा २९ जून २०१९ रोजी मु.जे.महाविद्यालयाच्या पार्कींग झोनमध्ये आला होता. इच्छाराम पुंडलिक वाघोदे (वय २२, रा.समतानगर) याच्या गाडीला मयत मुकेशचा लहान भाऊ रोहितचा दुचाकी पार्कींग करताना धक्का लागला. त्यावरून…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीतून आठ महिन्यांपुर्वी चोरलेली दुचाकी विक्रीसाठी आलेल्या संशयिताला जिल्हा पेठ पोलीसांनी बुधवारी तांबापूर परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. गौरव अशोक मोटवाणी रा. जालना असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, निमखेडी शिवारातील रहिवासी असलेले विलास नारायण महाजन यांची दुचाकी (क्र. एमएच.१९, सीएच ३१४३) ही १६ जानेवारी २०२३ रोजी सिंधी कॉलनीतून चोरीला गेली होती. याप्रकरणी महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. ही दुचाकी गुन्हेगार गौरव मोटवाणी याने लांबविली असून बुधवारी १३ सप्टेंबर रोजी तो तांबापुरा भागात दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाळेतील उपयोजित भूविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस.एन.पाटील यांची “एससोसिएशन ऑफ जिऑलॉजिस्ट अँड हैड्रोजिओलॉजीस्टस (जिओफोरम) महाराष्ट्र” चे उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. ही संघटना व्यावसायिक आणि वैज्ञानिक मंच आहे ज्यामध्ये भूविज्ञान, अभियांत्रिकी भूविज्ञान आणि भूजल क्षेत्रातील तज्ञांचा समावेश आहे. डॉ. पाटील यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे खानदेशातून जिओफोरमचे पहिले उपाध्यक्ष होण्याचा मान त्याना प्राप्त झाला आहे ते इंडियन सोसायटी ऑफ इंजिनिअरींग जिऑलॉजीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम पाहत आहेत. भूशास्त्र विषयात गेल्या ३३ वर्षापासून संशोधन आणि अध्यापनाचे काम ते करीत आहे. त्यांच्या निवडीबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे व…