साईमत वृत्तसेवा – नवी दिल्ली / जयपूर :राजस्थान केडरच्या चर्चित आयएएस अधिकारी टीना डाबी यांना ‘रील स्टार’ म्हटल्याच्या प्रकरणाने देशभरात वाद निर्माण केला असतानाच, या घटनेवरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या व राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या फॅन क्लब्सवर निशाणा साधत, सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. वादाची पार्श्वभूमी राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात परीक्षा शुल्कवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी तथा आयएएस अधिकारी टीना डाबी यांना ‘रील स्टार’ अशी टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला होता. या वक्तव्यांनंतर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे आरोप करण्यात आले. यामुळे विद्यार्थी विरुद्ध…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील गव्हर्नमेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील ६८ जागांच्या नोकरभरतीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, या भरती प्रक्रियेवर संशयाची सुई फिरू लागली आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी या भरतीला स्थगिती दिली होती. मात्र अवघ्या २४ तासांतच ही स्थगिती उठवून पुन्हा भरतीला परवानगी देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. ही नोकरभरती पूर्णपणे नियमबाह्य असून, त्यामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, कोणतीही लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने गुणवत्ताधारित निवडीवरच प्रश्नचिन्ह निर्माण…
साईमत मुंबई प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याप्रकरणी न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम राहिल्यानंतर कोकाटेंची अडचण वाढली होती. अटक वॉरंट जारी झाल्याने कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असताना, त्यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केल्यानंतर कोकाटे अधिकृतपणे मंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील क्रीडा खात्याचा पदभार कुणाकडे जाणार, याबाबत चर्चा सुरू…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर पोलिसांनी मंगळवारी रात्री अचानक छापा टाकून मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला व तिच्या साथीदार असलेल्या दोन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या ठिकाणी अडकवून ठेवण्यात आलेल्या पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. एमआयडीसीतील निलंबरी हॉटेलच्या मागील बाजूस तसेच हॉटेल सुमेर सिंगच्या समोर असलेल्या भागात दीर्घकाळापासून अवैध देहविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने तातडीने हालचाली सुरू करत, नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईचे आदेश दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या…
साईमत रावेर प्रतिनिधी रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील २१ वर्षीय हितेश सुनील पाटील या तरुणाचा भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व मित्रपरिवाराने थेट निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेहासह ठिय्या आंदोलन करत, हा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जळगाव येथे डिप्लोमाचे शिक्षण घेणारा हितेश पाटील हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होता. कोणालाही काहीही न सांगता तो घराबाहेर पडल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, रविवारी १४ डिसेंबर रोजी त्याची दुचाकी भुसावळ…
साईमत वृत्तसेवा अकोला : प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच अजमेर येथील प्रसिद्ध ‘उर्स फेस्टिव्हल’च्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने तीन महत्वाच्या मार्गांवर विशेष भाड्याने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवांमुळे उत्सव आणि गर्दीच्या काळात प्रवाशांना आरामदायी आणि सुरळीत प्रवासाची संधी मिळणार आहे. मच्छलीपट्टणम–अजमेर विशेष गाडी क्रमांक ०७२७४, २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मच्छलीपट्टणम येथून प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता अजमेर येथे पोहोचेल. परत जाणारी गाडी क्रमांक ०७२७५ २८ डिसेंबर रोजी अजमेरहून सकाळी ८.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मच्छलीपट्टणममध्ये ९.३० वाजता पोहोचेल. या गाड्याला प्रवासादरम्यान ३० हून अधिक स्थानकांवर थांबे असणार आहेत, ज्यात गुडीवाडा, विजयवाडा, नांदेड, भोपाळ,…
साईमत चोपडा प्रतिनिधी चोपडा न्यायालयात १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1,251 प्रकरणांवर निकाल देण्यात आला असून, एकूण 77 लाख 92 हजार 207 रुपये वसूल करण्यात आले. या अदालतीत दिवाणी तसेच फौजदारी प्रलंबित प्रकरणांचा यशस्वीरीत्या निपटारा झाला. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेल्या या अदालतीत पॅनलवर दिवाणी न्यायाधीश श्री. एस. डब्ल्यू. शेगोकार हे प्रमुख होते. त्यांच्या सह पंच म्हणून ॲड. व्ही. बी. पाटील आणि चोपडा वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. तसेच, सरकारी अभियोक्ता नितीन माळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, व चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनीही उपस्थित राहून अदालती कार्यप्रणाली सुरळीत चालवली. या राष्ट्रीय…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील विविध भागांत सलग घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर दूर झाली असून, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मोठी कारवाई करत एका आंतरराज्यीय अट्टल चोरट्याला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. या चोरट्याने जळगाव शहरात केलेल्या घरफोड्यांची कबुली देत, गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणखी पाच साथीदारांची नावेही उघड केली आहेत. गेल्या महिनाभरात जळगाव शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण उद्योजकता परिसंस्था उभारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ENIGMA (Empowering New Ideas for Growth, Mentorship and Access) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. स्टार्टअप्स, युवा उद्योजक, उद्योग संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकाच मंचावर आणून मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि नवीन संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. वेबपोर्टल विकासासाठी युनियन बँकेचा पुढाकार बैठकीत स्टार्टअप्स, उद्योगजगत आणि मार्गदर्शन प्रक्रियेला एकत्र आणणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या विकासास वेग देण्यात आला. युनियन बँकेने या वेबपोर्टलच्या निर्मितीसाठी पुढाकार दर्शवून सहमती नोंदवली. या पोर्टलमुळे उद्योजकांना नोंदणीपासून आर्थिक मार्गदर्शनापर्यंत सर्व सुविधा एका…
साईमत प्रतिनिधी यंदाच्या हंगामात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला असताना, आता राज्यावर आणखी एक नवे हवामानशास्त्रीय संकट ओढावण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील तब्बल 14 जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट जारी केला असून पुढील 48 तास तापमानात लक्षणीय घसरण होणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्यात या वर्षी पावसाने भारी धुमाकूळ घातला. अतिवृष्टी, पुरस्थिती आणि वीजपर्जन्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगाम बुडाला, नदीकाठच्या खेड्यांमध्ये पुराचे पाणी घरे-गोठे वाहून घेऊन गेले. अवकाळी पावसाचा फटका राज्याला सातत्याने बसतच राहिला. पावसाचा तडाखा ओसरला, तरी आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे तापमानात झपाट्याने घसरण अपेक्षित आहे. थंडीचा कडाका वाढणार; तापमान सरासरीपेक्षा…