Author: Saimat

साईमत प्रतिनिधी राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असताना, महायुतीतील तणाव आता उफाळून वर येताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप केल्यानंतर वातावरण तापले. या घटनेमुळे दोन्ही पक्षांत नाराजी, आरोप-प्रत्यारोप आणि अविश्वासाची दरी आणखी वाढली आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होत असलेल्या निवडणुकीत राज्यातील अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याने महायुतीच्या अंतर्गत संघर्षाचे स्वर अधिकच तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी केलेली विधानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण देत आहेत. रवींद्र चव्हाण…

Read More

साईमत अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन विविध क्षेत्रांतील मोठी प्रकल्पे जलदगतीने आकार घेत आहेत. महिला, विद्यार्थी, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा ओळखत अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कामे पुढे सरकत आहेत. शहरात उभा राहत असलेला भव्य क्रीडा संकुल, मंगळग्रह मंदिराचा सुरू असलेला कायापालट, झामी चौकातील नव्या जलकुंभाचे काम, शिवाजी उद्यानाचे सुशोभीकरण, तरुणांसाठी अभ्यासिका उभारणी आणि पैलाड स्मशानभूमीचे नूतनीकरण—अशा अनेक प्रकल्पांमुळे अमळनेरची विकासयात्रा अधिक वेगवान होत आहे. तरुणांसाठी नवी संधी : १० कोटींचे अत्याधुनिक क्रीडा संकुल…

Read More

साईमत वृत्तसेवा ढाका / श्रीपूर, बांगलादेश: आज (21 नोव्हेंबर) सकाळी बांगलादेशमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आणि 200 हून अधिक जण जखमी झाले. भूकंपाचे केंद्र ढाक्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसिंगडी येथील माधाबादीत होते. या भूकंपामुळे देशभरात भीतीचे वातावरण पसरले आणि अनेक बहुमजली इमारती झुकल्या. विशेषतः 10 मजली इमारत एका बाजूला झुकल्याचे पाहायला मिळाले. भूकंपाचा जोर इतका होता की बांगलादेशमध्ये सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना तातडीने थांबवण्यात आला. स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. भूकंपानंतर कापड कारखान्यात घडले अपघात गाझीपूरमधील श्रीपूर येथे डेनिमेक नावाच्या कापड कारखान्यात भूकंपाच्या वेळी कामगार बाहेर…

Read More

साईमत मालेगाव प्रतिनिधी डोंगराळे येथील साडेतीन वर्षीय बालिकेच्या निघृण हत्येने संपूर्ण मालेगाव हादरून गेले असून शहरात आज भीषण संताप उसळला. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांनी एकत्र येत मालेगावमध्ये कडकडीत बंद पाळला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आरोपीला तात्काळ फाशीच्या शिक्षेची जोरदार मागणी केली. बंददरम्यान काढलेल्या निषेध मोर्चाने अचानक आक्रमक वळण घेतले. विकृत मानसिकतेच्या आरोपीस न्याय मिळावा यासाठी लोकांच्या भावना तीव्र झाल्या. आंदोलकांनी “आरोपीला फाशी द्या” अशा घोषणा देत मालेगाव न्यायालय परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाने काही वेळातच न्यायालयाचे गेट तोडण्याचा प्रयत्न करत परिसरात प्रचंड तणाव निर्माण केला. दरम्यान, आज या प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात…

Read More

साईमत वृत्तसेवा दुबई:  दुबई एअर शोच्या रंगरंगोटी दरम्यान भारतासाठी आणि जागतिक एरोस्पेस क्षेत्रासाठी चिंतेचा मोठा प्रसंग घडला आहे. एअर शोमध्ये भाग घेण्यासाठी उड्डाण केलेले स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान अचानक तीव्र वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळले आहे. या घटनेने उपस्थितांना धूर आणि आगीचे लोट दर्शवले असून, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनंतर हा अपघात घडल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. विमान घटनेच्या ठिकाणी उडत असताना अचानक खाली येताच, विमानाचे अवयव तुटलेले दिसले, आणि लगेचच आगीचे प्रचंड लोट उठले — हे दृश्य दाखवणारी काही उपस्थितांची नोंद सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. पायलटांची अद्याप माहिती…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात ६१ गॅस सिलेंडर चोरीला गेलेल्या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीस ठाण्याने केवळ तीन दिवसांत उलगडा करत दोन आरोपींना वाहनासह जेरबंद केले. पोलिसांनी तब्बल १ लाख २२ हजार रुपये किमतीचा ६१ सिलेंडरांचा मुद्देमाल तसेच ५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन जप्त केले आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे अचूक सापळा रचत करण्यात आली. काय घडले? फिर्यादी यांनी १४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम जळगाव येथून ३४२ सिलेंडर भरून ट्रक एमआयडीसी परिसरात पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाहन घेण्यासाठी पोहोचले असता ट्रक जागेवर नव्हता. काही अंतरावर रस्त्याच्या कडेला उभे असलेले वाहन मिळाल्यावर ३४२ पैकी ६१ सिलेंडर चोरीस…

Read More

शहरातील वाढत्या समस्या, बदलाची गरज, लोकसहभाग आणि आगामी ‘घर-घर संपर्क अभियान’ यावर सविस्तर चर्चा साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील वाढत्या नागरी समस्या-पायाभूत सुविधांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छतेचा अभाव, पाणीपुरवठ्यातील विस्कळीत कारभार, वाढती गुन्हेगारी तसेच असुरक्षित वाहतूक-यामुळे नागरिक त्रस्त असताना ‘जळगाव प्रथम’ या अराजकीय सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे मार्गदर्शन घेऊन शहराच्या प्रश्नांवर आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. आजच वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखात सुरेशदादा यांनी राज्यकर्ते यांची प्रशासनावर त्यांची पकड राहिलेली नाही. दूरदृष्टी व प्रशासकीय क्षमता असणार्‍यांना मनपात संधी दिली पाहिजे. जळगावला सिंगापूर करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत आहे, असे विचार मांडले होते. या मतांनी प्रेरित होऊन…

Read More

साईमत नाशिक प्रतिनिधी  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी धावपळ सुरू झाली असून १२२ जागांसाठी तब्बल ५२५ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच प्रत्येक जागेसाठी सरासरी पाच उमेदवारांची स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीत भाजपला चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र आहे. सध्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मनमाड व नांदगाव येथे शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत दिसते. तर भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप एकत्र आहेत. या घडामोडींमुळे महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीची रेष पसरून राजकारण तापण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेवरील सत्ता…

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी शासकीय कंत्राटातील टक्केवारीची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा धक्कादायक प्रत्यय दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात समोर आला आहे. अधीक्षक अभियंता (Superintending Engineer) भानुदास पुंडलिक लाडवंजारी (वय ५७) यांनी कंत्राटदाराच्या बिलातून ५ टक्के कमिशनसाठी तगादा लावला, मात्र अखेर तडजोडीनंतर फक्त ५,००० रुपये मागितल्याचे उघड झाले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज, दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि कंपनीची माहिती लाडवंजारी **महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजेनको)**च्या दीपनगर केंद्रात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हे एका खासगी कंपनीत साईट सुपरवायझर असून, कंपनीने २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५…

Read More

साईमत प्रतिनिधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या अपयशानंतर गौतम गंभीरवर जोरदार टीका होत आहे, तर माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी गंभीर आणि निवडकर्त्यांना धक्कादायक संदेश दिला आहे. गावसकरांचे स्तंभलेखातून मत स्पोर्ट्सस्टारसाठी लिहिलेल्या स्तंभलेखात गावसकर यांनी म्हटले आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये मुख्य खेळाडूंवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, सीमित ओव्हर्सच्या अष्टपैलू खेळाडूंवर अवलंबून राहणे योग्य नाही. पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवडकर्ते अजित आगरकर यांनी संघबांधणीवर गंभीर विचार करावा, असं गावसकर यांनी सुचवले. अहंकार ड्रेसिंग रूममध्ये ठेवण्याचे गावसकरांचे मार्गदर्शन गावसकर यांनी…

Read More