साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “यमन को नमन” सोनेरी यादे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी केसीई सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, हरीश मिलवानी व प्राचार्य संजय भारंबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रास्ताविक शशिकांत वडोदकर यांनी केले. ओ शाम कुछ अजीब थी, वो जब याद आये, जब दीप जले आना, नाम गुम जायेगा, इस मोड से जाते है ,अभी ना जाओ छोडकर ,चंदन सा बदन, जो वादा किया वो निभाना…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी शाखेतर्फे अभियंता दिनानिमित्त “प्रश्न मंजुषा” स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन आणि दीप प्रज्वलन प्राचार्य डॉ .संजय सुगंधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, विभागाध्यक्ष प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. राजेश वाघुळदे, प्रा. के. एम. महाजन, प्रा. प्रवीण भंगाळे, प्रा. अश्विनी पाटील, आणि इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ७० विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली, त्यातून अंतिम फेरीसाठी १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रत्येकी तीन विद्यार्थी असे पाच गट तयार करण्यात येऊन प्रत्येक गटाला वैद्न्यानिकांची नावे देण्यात आली. अंतिम स्पर्धेसाठी एकूण पाच फेऱ्या घेण्यात…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील शिवाजीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सुरक्षितता व कामकाजा संदर्भात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, धनंजय चौधरी यांनी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व जिल्हा प्रशासन यांच्या समनव्य बैठकीत छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाकडून छत्रपती शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक संबंधित विषय मांडण्यात आला. त्याची पुढील अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, सूरज दायमा, धनंजय चौधरी आदींमध्ये स्मारकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्यासाठी चर्चा झाली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासन पुरस्कृत माझी वसुंधरा अभियान ४.० च्या अनुषंगाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशातून महानगरपालिका व मानव सेवा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा मानव सेवा विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सुबक अश्या गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. सदर कार्यशाळेचे आयोजन मानव सेवा विद्यालय जळगाव माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा तुळशीराम सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया विलासचंद्र आंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता प्रमोद पाटील, शिक्षक अलका अनिल महाजन, रत्ना भागवत चोपडे, अनिल राजेश शिरसाठ, गिरीश हिरालाल जाधव तसेच महानगरपालिकेतर्फे योगेश वाणी पर्यावरण विभाग आदी मार्फत करण्यात आले होते.…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरातील 36 एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी 240 कोटींच्या खर्चास, तसेच जामनेर येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी 39 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सध्या नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल कार्यरत आहे. जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यांसाठी जळगावमधील मेहरुण परिसरात 36 एकर जागेत विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास जागा मंजूर आहे. रक्कम मंजूर झाल्याने क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे. लवकरच बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. संकुलात विविध खेळांची मैदाने, धावपटूंसाठी धावन मार्गिका, बास्केटबॉल, व्हॉलिबॉलसाठी मैदान,…
साईमत जळगाव प्रतिनिधी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा या नद्यांना पूर आला असून, धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी नऊला धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात सद्यःस्थितीत 4,23,394 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हतनूर धरणात पाण्याची मोठी आवक वाढली आहे. सद्यःस्थितीत धरणाची जलपातळी 212.610 मीटर असून, धरणात एकूण 309.40 दशलक्ष घनमीटर…
साईमत जळगाव प्रतिनिधी शिवसेना पक्ष प्रमुखांनी आदेश दिल्यास विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे मावळत्या महापौर जयश्री महाजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आपली सुप्त इच्छा बोलून दाखविली. महानगरपालिकेची मुदत १७ सप्टेबर रोजी संपत असल्याने शनिवारी महापौर दालनात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक किशोर बाविस्कर, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, शिवसेनेत प्रत्येक शिवसैनिक पदास लायक असतो, पक्षप्रमुख जो आदेश देतात तो सर्वांना मान्य करण्याची पध्दत आहे. तेच सूत्र आगामी विधानसभेसाठी लागू राहणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ज्यांना उमेदवारी देतील तो…
साईमत यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषद हद्दीत रस्ते, गटारी, गटारीवरील ढापे, पाणी पुरवठा पाईपलाईन आणि दुरुस्ती व इतर कामे झालेली आहेत व काही कामे सुरूही आहेत. या बांधकामांचा धडाका सुरू आहे रस्ते बांधकामात प्रस्थापित ठेकेदारांच्या नावावर कार्यारंभ आदेश मिळवून काही नवखे कॉन्ट्रॅक्टर कामांच्या बारकाव्यांची काहीच माहिती नसताना मनमानीपणे शासकीय तिजोरीतून लूट करीत असल्याची चर्चा आहे. राजकीय प्रभावामुळे नवख्यांना कामे मिळत असली तरी कामांचा दर्जा लक्षात घेता अनेक बोगस टेस्ट रिपोर्ट, कामे चांगल्या प्रतीचे असल्याबाबतचे दाखले मिळवून घेत असल्याने याकडे प्रभारी मुख्याधिकारी आणि स्थापत्य अभियंता यांचे दुर्लक्ष होत असून या सर्व भानगडींना प्रभारी मुख्याधिकारी व स्थापत्य अभियंता जबाबदार असल्याचे जाणकारांकडून बोलले जात…
साईमत बोदवड प्रतिनिधी आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड ते मुक्ताईनगर मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानापासून महात्मा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टॅन्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा मार्गे निघून काढण्यात आली. यामध्ये कार्यकर्त्यांनी आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घोषणा देत रॅली काढण्यात आली. रॅलीत नगराध्यक्ष आनंदा पाटील, गोलू बरडिया, हर्षल बडगुजर, दीपक माळी, नगरसेवक राजेश नानवानी, देवेंद्र खेवलकर, शाताराम कोळी, अमोल पाटील, निलेश माळी, दिनेश माळी, अमोल व्यवहारे, अजय पाटील, कलीम शेख, जितेंद्र पाटील, सरपंच नंदलाल पाटील, सोपान महाले, यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
साईमात जळगाव प्रतिनिधी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे शासकिय वैद्यकिय व नर्सिग महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या मानसोपचार सल्लागार ज्योती पाटील शा.म.वै.म. गोदावरी नर्सिंगच्या मानसिक आरोग्य विभागप्रमुख प्रा. अश्वीनी वैदय,सहायक प्रा. सुमित निर्मळ,प्रा.प्रशिक चव्हाण, व्याख्याता प्रा शिल्पा वैरागडे,प्रा. प्रियंका गाडेकर, ,प्रा सूरज खवाटे,प्रा ओकांर मुरूडकर हे उपस्थीत होते. यावेळी मार्गदर्शन करतांना ज्योती पाटील यांनी आत्महत्यांची कारणे,लक्षणे व उपायावर बोलतांना व्यसन व मानसिक ताण तणावामूळे आत्महत्यासारखे टोकाचे पाउल उचलले जावू शकते. या आत्महत्या रोखण्यासाठीचे उपाय विषद करतांना मागास भागात जावून जनजागृती तर आवश्यकच आहे परंतू मानसोपचार तज्ञांचा सल्ला व…