साईमत जळगाव प्रतिनिधी आदिवासी विकास विभाग आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सन 2023 – 2024 दिनांक ७ ते 9 जानेवारी दरम्यान नाशिक येथे झाल्या. सदर स्पर्धेत ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ मोहाडी अंतर्गत डोमगाव तालुका जळगाव आश्रम शाळेची आरती बाला बारेला (इयत्ता ८ वी) या विद्यार्थिनीने वर्षे 14 च्या आतील वयोगटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील आदिवासी विकास विभाग आयुक्तालय अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्व आश्रमशाळेतील विविध खेळांमधील जवळपास १८०० विद्यार्थी सहभागी झाले होते, पैकी वैयक्तिक खेळ प्रकार “लांब उडी” वयोगट वर्षे १४ च्या आतील आरती बाला बारेला इयत्ता ८ वी ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा केला जात आहे. अयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार असल्याने जळगावातील शानिपेठ परिसरातील संकल्प महिला मंडळातर्फे घरोघर अक्षदा वितरण करण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयघोषात अक्षदा आणि माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती. देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा आनंदोत्सव सुरू असून प्रत्येक गावात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. जळगाव शहरातील शनिपेठेत असलेल्या जय श्रीराम मित्र मंडळ आणि संकल्प महिला मंडळातर्फे अयोध्या येथून आलेल्या मंत्रित अक्षदांचे परिसरात वितरण करण्यात आले. मुख्य चौकात माजी होमगार्ड समादेशक रमेश दलाल यांच्या हस्ते प्रभू…
साईमत जळगाव प्रतिनिधी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने देश पातळीवर घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ या स्पर्धेचे निकाल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामगिरीत मागील वर्षापेक्षा यावर्षी सुधारणा झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण निकालात जिल्ह्यातील १४ नगरपालिकांना ओडीएफ प्लस प्लस Open Defecation Free (ODF) चा दर्जा मिळाला आहे. ओडीएफ म्हणजे ही शहरे उघड्यावरील शौचालयापासून मुक्त आहेत. ओडीएफ प्लस म्हणजे ही शहरे फक्त उघड्यावरील शौचालयापासून मुक्त नसून या शहरात स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृह पण आहेत. ओडीएफ प्लस प्लस म्हणजे या शहरांमध्ये FSTP- एफएसटीपी (फेकल स्लज ट्रीटमेंट प्लांट) मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित आहेत.याठिकाणी सांडपाण्यावर नियमित प्रक्रिया केली जाते. जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा,…
साईमत जळगाव प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकाला विरोधात निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना जळगाव महानगर तर्फे काळ्या फिती लाऊन आंदोलन करण्यात आले. निकाला विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून जळगाव चे सर्व शिवसैनिक पदाधिकारी हे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे असल्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, नीता संगोळे, जया तिवारी, शारदा तायडे, श्रध्दा घोष, युवा सेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी, महानगर प्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, समनवयक महेश ठाकूर, विभाग…
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ अंतर्गतच्या नियतव्ययात जळगाव जिल्ह्यातील वाढीव निधीच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. जिल्हा वार्षिक योजना २०२४- २५ च्या प्रारूप आराखड्याबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, पालकसचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते. नाशिक येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जळगाव येथून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त…
साईमत मुंबई प्रतिनिधी राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे व ऑल इंडिया फेयर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली यांच्यावतीने देशातील तसेच राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर १ जानेवारी पासून राज्यातील ५३ हजार स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर होते. याबाबत नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने महासंघाला बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. बैठकीत प्रलंबित मागण्या बाबत समाधानकारक चर्चा होऊन महासंघाकडून राज्यातील रास्त भाव दुकानदारांचा संप मागे घेत असल्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे व ऑल इंडिया फेयर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली यांच्यावतीने देशातील तसेच…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणी बैठक १३ व १४ जानेवारी रोजी जळगावात होत असल्याची माहिती बुधवारी दि. १० जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत देण्यात आली. बैठकीस राज्य अध्यक्ष, राज्य कार्याध्यक्ष यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार असून यानिमित्त दि. १२ जानेवारी रोजी समितीच्या दोन विभागांच्या अभियानाचे कार्यक्रमदेखील विविध महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी. एस. कट्यारे यांनी दिली. यानिमित्ताने राज्य अध्यक्ष, राज्य कार्याध्यक्ष यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. तसेच, दि. १२ जानेवारी रोजी समितीच्या दोन विभागांच्या अभियानाचे कार्यक्रमदेखील विविध महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभागाचे राज्य…
साईमत जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलचे जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर यांचे चिरंजीव आदित्य याने सीए परिक्षा उत्तीर्ण केली. दि इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकौऊंट ऑफ इंडिया मार्फेत नोव्हेंबर २०२३ मध्ये सीए ची अंतिम परिक्षा घेण्यात आली होती. त्याच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्यासह सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे. अथक परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले.
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आत्मनिर्भर युवती अभियान” या कार्यशाळेचा समारोप बुधवार दि. १० जानेवारी रोजी झाला. समारोप प्रसंगी मंचावर जळगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयाच्या उपअधिक्षक शीतल लेकुरवाळे, प्रशाळेच्या संचालिका डॉ. मनीषा इंदाणी, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संतोष खिराडे व डॉ. स्वाती तायडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना शीतल लेकुरवाळे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करण्यासाठी निश्चय करून आपल्या मनाशी खुणगाठ बांधणे गरजेचे आहे. प्रयत्नांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. प्रयत्नांमध्ये संपूर्ण समर्पण असणे आवश्यक…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथे जैन इरिगेशन सिस्टीम लि संचालित जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे १६ वर्षा खालील २१ वी जैन चॅलेंज ट्रॉफी स्पर्धा ०८ जानेवारी पासून अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचा उद्घाटन व नाणेफेक जैन फॉर्म फ्रेश चे संचालक अथांग जैन यांचे हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, हेड कोच सुयश बुरकुल, घनश्याम चौधरी, मोहंमद फजल उपस्थित होते व सूत्र संचालन वरून देशपांडे यांनी केले. पहिला सामना रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल व पोतदार इंटरनॅशनल स्कूल यांच्या दरम्यान खेळण्यात आला नाणेफेक जिंकून पोतदार इंटरनॅशनल स्कूल संघाने सर्व गडी बाद २४.५ षटकात ११४ धावा केल्या…